जत

जत,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
जत शहरातील सी.बी. पवार हॉस्पिटलसमोरील रस्त्यावरून चोरीस गेलेली मोटारसायकल शोधून काढण्यात पोलिसांना यश आले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

जत

घटनेचा तपशील
दि. २३ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ११.०० ते २४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ८.३० या कालावधीत फिर्यादी श्रीकांत शरणाप्पा तेली (वय २४, रा. उटगी, ता. जत) यांची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस (क्रमांक MH-10-BK-3953) ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. या प्रकरणी  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे देखील वाचा: jat crime news: जतमध्ये विद्युत मोटारी चोरी करणारा आरोपी जेरबंद: 3 मोटारी जप्त; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

संशयित आरोपीची माहिती
गुन्हे प्रकटीकरण पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चोरीची मोटारसायकल घेऊन लक्ष्मण तानाजी चव्हाण (वय २७, मूळ रा. सोरडी, ता. जत, सध्या रा. हीरेपडसलगी, ता. जमखंडी, जि. बागलकोट, कर्नाटक) हा जत शहरात येणार आहे.

या माहितीच्या आधारे दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी शेगाव चौक येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

जत

हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (किंमत: २०,००० रुपये) जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल सांकुखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने आरोपीला अटक केली. तपास पोलीस हवालदार पंकज मंडले करीत आहेत.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे शहरातील वाहनचोरीचा गुन्हा उघडकीस आला असून आरोपीला अटक करण्यात यश आले आहे.

हे देखील वाचा: Crime Story: गणेशप्रसाद यांचा मुलगा राहुलचा रहस्यमय शोध / Rahul’s mysterious discovery

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *