जतमध्ये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल
जत,(आयर्विन टाइम्स):
जत तालुक्यातील वाळेखिंडी येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत बेकायदेशीर दारूचा साठा जप्त केला. या कारवाईत एकूण २० लाख १६ हजार १३० रुपयांचा दारू साठा आणि एक चारचाकी वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींमध्ये धोंडीराम शिंदे आणि इतर तिघांचा समावेश आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई
दिनांक ५ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ५.५८ वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिल साळुंखे आणि फिर्यादी केरुबा पांडुरंग चव्हाण यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यावर, पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई राबविण्यात आली.
कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी
या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी जत उपविभागाचे श्री. सुनिल साळुंखे, जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सुरज बिजली, सहायक पोलीस निरीक्षक श्री. बिरप्पा लातुरे आणि इतर पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता.
आरोपींची नावे
१. सुरेश गणपती खोत, रा. माळवाडी, कोल्हापूर
२. धोंडीराम शिंदे, रा. वाळेखिंडी, ता. जत
३. हिरा वाईन शॉप, जतचे मालक
४. बाबर, रा. वाळेखिंडी, ता. जत
जप्त केलेला मुद्देमाल
सदर कारवाईत विविध ब्रँडचे दारू बॉक्स, ज्यामध्ये २०० पेक्षा अधिक बॉक्सचा समावेश होता, जप्त करण्यात आले. या साठ्यात बडवायझर, टयुबर्ग, रॉयल स्टॅग, किंगफिशर, रोमानो ओडका, देशी दारू संत्रा, रॉयल चॅलेंज, इम्पूरियल ब्ल्यू, मॅकडॉल्स नंबर वन, ब्लॅक डीएसपी, स्टर्लिंग रिजर्व इत्यादी ब्रँडचा समावेश आहे.
– बडवायझर: ३१,६८०/- रुपये किंमतीचे ११ बॉक्स
– टयुबर्ग: ३०,४२०/- रुपये किंमतीचे १३ बॉक्स
– रॉयल स्टॅग: ११,७००/- रुपये किंमतीचा १ बॉक्स
– किंगफिशर: ४५६०/- रुपये किंमतीचे २ बॉक्स
– रोमानो ओडका: १६३२०/- रुपये किंमतीचे २ बॉक्स
– इतर विविध ब्रँड्सचे मुद्देमाल
या सर्व मुद्देमालासह एक पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी (MH 09 CU 7453) देखील जप्त करण्यात आली आहे.
कारवाईचा तपशील
आरोपी सुरेश खोत याने मिरज येथून व शिरोली MIDC परिसरातील ट्रेडमधून बेकायदेशीररीत्या चारचाकी वाहनामार्फत दारू आणली. आरोपी धोंडीराम शिंदे याच्या घरात उतरण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी हा दारूचा साठा ताब्यात घेतला. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे करत आहेत.