जत

जत,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी मोठी कारवाई करत विद्युत मोटार चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत तीन विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या असून एकूण ५०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

जत

घटनेचा तपशील
जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत २२ एप्रिल २०२४ ते २६ एप्रिल २०२४ या कालावधीत विविध ठिकाणी विद्युत मोटार चोरीचे गुन्हे घडले होते. यासंदर्भात फिर्यादी अजय भूपाल जैन (रा. हिवरे, ता. जत) यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला होता.

हे देखील वाचा: Crime Story: गणेशप्रसाद यांचा मुलगा राहुलचा रहस्यमय शोध / Rahul’s mysterious discovery

संशयित आरोपीची माहिती
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, संशयित आरोपी योगेश ईश्वर पाटील (वय ३४, रा. अनंतपूर, ता. अथणी, जि. बेळगाव, कर्नाटक) हा चोरी केलेल्या विद्युत मोटारींसह रामपूर येथील जत-सांगली रोडवरील वशान फाटा परिसरात येणार आहे.

त्यानुसार पोलीस निरीक्षक सतिश शिंदे व सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला. आरोपी संशयास्पदरीत्या थांबल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. झडती घेतल्यानंतर त्याच्या ताब्यातून एक विद्युत मोटार पंप सापडला. चौकशीत त्याने आणखी दोन मोटारी झुडपात लपवून ठेवल्याची कबुली दिली.

जप्त मुद्देमाल
– ७.५ एचपी विद्युत मोटार पंप (किंमत – २०,०००/-)
– ५ एचपी विद्युत मोटार पंप (२ नग, किंमत – प्रत्येकी १५,०००/-)
– एकूण किंमत – ५०,०००/- रुपये

हे देखील वाचा: विदेशात वैद्यकीय शिक्षण : भारतीय विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शन; परदेशी वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया 6 महत्त्वाच्या बाबी समजून घ्या / Medical Education Abroad: A Complete Guide for Indian Students

गुन्हे व अटक कारवाई
संशयित आरोपीवर जत पोलीस ठाण्यात गु.र.नं. २३७/२०२४, भादंवि कलम ३७९, तसेच गु.र.नं. १५/२०२५ व २६/२०२५, बी. एन. एस. कलम ३०३ (२) नुसार गुन्हे दाखल आहेत. आरोपीला दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी अटक करण्यात आली.

पुढील तपास
या कारवाईत पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि पोलीस पथक यांनी सहभाग घेतला. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून विश्रामबाग, जत, तासगाव, मिरज ग्रामीण, कुरळप पोलीस ठाणे तसेच कर्नाटक राज्यातही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास जत पोलीस ठाणे करीत आहे. (jat crime news)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed