jat accident news: A head-on collision between a truck and a motorcycle near Muchandi in Jat taluka claimed the life of 35-year-old forest department contract worker Dilip Jadhav.
जत, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
जत तालुक्यातील मुचंडी परिसरात मंगळवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मुचंडीपासून काही अंतरावर ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दिलीप मारुती जाधव (वय ३५, रा. तोळबोळवाडी, मुचंडी, ता. जत) यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप जाधव हे वन विभागात कंत्राटी पद्धतीने वन मजूर म्हणून कार्यरत होते. मंगळवारी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास ते आपल्या दुचाकीवरून विजापूर राष्ट्रीय महामार्गावरून तोळबोळवाडीच्या दिशेने जात होते. त्याचवेळी विजापूरकडे जाणाऱ्या एका ट्रकसोबत मुचंडीच्या काही अंतरावर त्यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला.

अपघात इतका तीव्र होता की दिलीप जाधव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच मुचंडी येथील ग्रामस्थांनी तत्काळ त्यांना खासगी वाहनातून जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
डॉक्टरांनी घटनेची माहिती जत पोलिस ठाण्याला दिल्यानंतर रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. जत पोलिस अधिक तपास करत असून, अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
दिलीप जाधव यांचे तीन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक वर्षाची चिमुकली मुलगी आहे. घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने तोळबोळवाडी गावात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबावर दुःखाचा मोठा आघात झाला आहे.
या अपघातामुळे विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, नागरिकांकडून सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
Jat (Irwin Times Correspondent):
A 35-year-old man was killed in a head-on collision between a truck and a motorcycle near Muchandi village in Jat taluka on Tuesday evening. The deceased has been identified as Dilip Maruti Jadhav, a resident of Tolbolwadi, Muchandi, who was working as a contract forest labourer.
The accident occurred around 5.15 pm on the Vijapur National Highway when the motorcycle he was riding collided with a truck heading towards Vijapur. He died on the spot due to the impact. Villagers rushed him to the Jat Rural Hospital, where doctors declared him dead. Jat police have initiated further investigation into the incident.
