डीसीसी

सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
जिल्हा मध्यवर्ती बँके (डीसीसी) च्या बेळोंडगी (ता. जत) शाखेत एका महिलेची रोजंदारी शिपाई पदावर परस्पर नियुक्ती करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती न देता शाखाधिकारी आणि लिपिकांनी ही नियुक्ती केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिला आहे.

डीसीसी बँकेच्या बेळोंडगी

ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर उघड झाला प्रकार

गावातील ग्रामस्थांनी डीसीसी बँक मुख्यालयाकडे तक्रार केल्यानंतर या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली. चौकशीसाठी वरिष्ठ अधिकारी शाखेत दाखल झाले असता, संबंधित महिला बँकेत प्रत्यक्ष काम करत असल्याचे आढळले. तसेच, बँकेतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही करण्यात आली.

हे देखील वाचा: Kolhapur crime news: व्याजाच्या पैशासाठी शरीरसुखाची मागणी करून वारंवार बलात्कार केल्याच्या प्रकरणी 46 वर्षीय सावकारास अटक; बदनामी करण्याची दिली धमकी

बँक प्रशासनाचा इशारा

या संदर्भात बोलताना डीसीसी बँकेचे सीईओ शिवाजीराव वाघ म्हणाले, “बँकेच्या नियमांना बगल देऊन महिला शिपाईची नियुक्ती केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून, त्याची सखोल चौकशी सुरू आहे. दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.”

गावात उलटसुलट चर्चा, कडक कारवाईची मागणी

या घटनांनंतर गावात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. संबंधित शाखाधिकारी आणि लिपिकांना तात्काळ निलंबित करून अधिक चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. डीसीसी बँक प्रशासन लवकरच या प्रकरणाचा अहवाल सादर करणार असल्याने आगामी कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *