मुख्याध्यापक

मुख्याध्यापक अतिरिक्त होण्याचा धोका टळला

आयर्विन टाइम्स / सांगली
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांत मुख्याध्यापक पदासाठी शंभर पटसंख्या गृहीत धरून पद मान्य केले जाणार आहे. याबाबत आज शासन आदेश काढण्यात आला. राज्यातील मुख्याध्यापकांची अतिरिक्त होणारी हजारो पदे यामुळे वाचली आहेत. शिक्षक आमदार, मुख्याध्यापक संघटना, शिक्षक संघटना यांनी केलेल्या आंदोलनास यश आले.

मुख्याध्यापक

शासनाने १५ मार्च २०२४ रोजी काढलेला संच मान्यता आदेश हा बऱ्याच शाळांना मारक ठरणारा होता. या आदेशामुळे मुख्याध्यापक पद तसेच शाळेतील शिक्षकांची पदे कमी होणार होती. याचा मराठी माध्यमांच्या शाळांना मोठा फटका बसणार होता. या आदेशामुळे विद्यार्थी संख्या कमी होणार असून, दर्जेदार शिक्षण मिळणार नाही. त्यामुळे याबाबतीत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनांनी केली होती.

हे देखील वाचा: Infinix Zero 40: इन्फिनिक्स झीरो 40 स्मार्टफोन लाँच; सुरुवातीची किंमत 27999 रुपये : एआयसह 12 जीबी रॅम

शासनाने १५ मार्च २०२४ चा आदेश केला रद्द

शासनाने १५ मार्च २०२४ रोजी काढलेला नवीन संचमान्यतेचा आदेश रद्द करावा, यासाठी शिक्षकांच्या विविध संघटनांकडून पाठपुरावा सुरू होता. यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची मुंबईत वारंवार भेट घेऊन हा आदेश रद्द करण्याबाबत चर्चा केली. पुणे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांची भेट घेऊन शासनाला सकारात्मक अहवाल सादर करण्याबाबत मागणी केली होती. आज हा अन्यायकारक आदेश रद्द करून त्यानुसार शासनाने १०० पटाला मुख्याध्यापक पद, असा आदेश काढून दिलासा दिला आहे.

मुख्याध्यापक

राज्य सरकारने अन्यायकारक १५ मार्चचा head-master पद अतिरिक्त करणारा शासन आदेश रद्द करून मुख्याध्यापकपदांना दिलासा दिला आहे; परंतु पूर्वीच्या आदेशातील शिक्षक पदे मंजुरीबाबतचे निकष बदललेले नाहीत. त्यामुळे शासनाचा निर्णय मुख्याध्यापकांसाठी आनंदाचा, तर शिक्षकांसाठी दुःखी आहे, असा सूर शिक्षक संघटनांनी काढला आहे. शिक्षकांच्या निकषासाठीचा आदेशादेखील रद्द केला जावा, अशी मागणी होत आहे.

हे देखील वाचा: murder news : पत्नीच्या अफेअरमुळे शिक्षकाने आखला खूनाचा कट: 1800 किमी दूर असलेल्या प्रियकराचा केला खून आणि पुढेही होती भयानक योजना…

संचमान्यता निकषात बदल करून head-master पदासाठी १५० पटसंख्या ऐवजी १०० पट गृहीत धरून मुख्याध्यापक पद मान्य केले जाईल, तसेच head-master पद रद्द झाल्यास त्या पदाला संबंधित head-master सेवानिवृत्त होईपर्यंत किंवा पटसंख्या वाढ होईपर्यंत संरक्षण दिले जाईल, असे आदेशात नमूद केले आहे; परंतु शिक्षकांच्या पद निकषात बदल केलेला नाही.

मुख्याध्यापक

१५ मार्च २०२४ च्या संचमान्यता नवीन निकषातील दुरुस्तीबाबत जवाहर बालभवन मुंबई येथे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. यावेळी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, जयंत आसगावकर, किशोर भाऊ दराडे, ज. मो. अभ्यंकर यांनी चर्चेत भाग घेतला होता. यावेळी दुरुस्ती करण्याचे आश्वासन मंत्री केसरकर यांनी संघटना प्रतिनिधींना दिले होते.

हे देखील वाचा: आरोग्यदायी आणि पौष्टिक भगर / Healthy and Nutritious Bhagar: जाणून घ्या संपूर्ण माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !