Google Maps

गूगल मॅप (Google Maps) च्या चुकीच्या मार्गदर्शनाचा बसतोय फटका

बदायूं, उत्तर प्रदेश,(आयर्विन टाइम्स वृत्तसंस्था):
गूगल मॅप (Google Maps) च्या चुकीच्या दिशादर्शनामुळे तिघांचे प्राण गेले. रामगंगा नदीवरील एका अपूर्ण पुलावरून कार कोसळल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन सख्ख्या भावांसह तिघांचा जागीच मृत्यू झाला. गुगल मॅपच्या चुकीच्या निदर्शनामुळे अलीकडच्या काळात अनेक अपघात घडाळ्याच्या घटना घडल्या आहेत. बदायूंमध्ये घडलेली घटना तर भयंकरच म्हणावी लागेल. पुलावरून रस्ताच नव्हता पण तरीही Google Maps वर हा रस्ता दाखवण्यात आला होता.

Google Maps

घटनेचा सविस्तर आढावा

बदायूं जिल्ह्यातील समरेर ते फरीदपूर मार्ग जोडण्यासाठी रामगंगा नदीवर पूल बांधण्यात आला होता. मात्र, हा पूल अधूरा असल्यामुळे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. रविवारी पहाटे, गुरुग्राम येथून फरीदपूरला जात असलेल्या सिक्युरिटी कंपनीच्या तिघा कर्मचाऱ्यांची कार या अधूऱ्या पुलावरून थेट २५ फूट खोल नदीत कोसळली.

हे देखील वाचा: Amol Palekar/ अमोल पालेकर 80: ‘रजनीगंधा’मधून सुरू झालेली सिनेमा, रंगभूमी आणि कलात्मक प्रवासाची गाथा

Google Maps वर दाखवलेल्या मार्गावरून हे कर्मचारी प्रवास करत होते. त्यांना या पुलाच्या स्थितीची कल्पना नव्हती. कार वेगात असल्यामुळे चालकाला ती थांबवता आली नाही आणि पुल संपताच ती थेट नदीत जाऊन आदळली.

अपघात इतका भीषण होता की कारमधील तिघांचाही जागीच मृत्यू झाला. सकाळी खल्लपूर गावातील स्थानिक लोकांना नदीच्या काठावर कार पडलेली दिसली. त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली.

पोलिस तपास आणि मृतदेह हस्तांतरण

घटनेची माहिती मिळताच फरीदपूर व दातागंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फरीदपूरचे पोलीस उपअधीक्षक आशुतोष शिवम यांनी अपघातस्थळी पाहणी करून तपशील गोळा केला. मृतदेह बाहेर काढण्यासाठी स्थानिक मदतीने नाव वापरण्यात आली.

Google Maps

मृत व्यक्तींची ओळख

पोलिसांना कारमधून गुरुग्राममधील सिक्युरिटी कंपनीचा ओळखपत्र सापडले. त्यावर विवेक कुमार यांचे नाव ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह म्हणून नमूद होते. फरीदपूरमधील पाढेरा गावातील प्रमोद कुमार यांनी मृतांची ओळख पटवली. मृतांमध्ये नितीन कुमार (३०), अजीत कुमार (३५) आणि अमित यांचा समावेश होता. नितीन आणि अजीत चुलत भाऊ होते. हे दोघे फर्रुखाबाद जिल्ह्यातील एतमादपूर हीरामढी गावचे रहिवासी असून सिक्युरिटी कंपनीत चालक म्हणून कार्यरत होते.

हे देखील वाचा: motor car insurance: मोटर विमा दावा दाखल करताना होणाऱ्या चुका आणि त्यांचे परिणाम टाळण्यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन; 6 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

विवाह सोहळ्यासाठी प्रवास

या दुर्घटनेमागील दुःखद पार्श्वभूमी म्हणजे, नितीन आणि अजीत फरीदपूर येथे त्यांच्या चुलत भावाच्या मुलीच्या विवाहासाठी प्रवास करत होते. रविवारच्या या मंगल सोहळ्याचे वातावरण अपघातामुळे शोकांतिका बनले.

(Google Maps)   गूगल मॅपची भूमिका

या अपघाताचा मुख्य कारण ठरले Google Maps- गूगल मॅपचे दिशादर्शन. पुल वाहतुकीसाठी बंद असल्याची माहिती मॅपवर अद्याप दर्शवली नव्हती, ज्यामुळे प्रवाशांचा अपघात झाला.

Google Maps

अपघाताच्या निष्कर्षाची गरज

हा अपघात प्रशासन व तंत्रज्ञानातील त्रुटींचा परिपाक आहे. बंद पुलांच्या ठिकाणी स्पष्ट सूचना आणि (Google Maps) डिजिटल मॅप्सवरील अद्ययावत माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्रशासनाने अशा अपघातांपासून धडा घेत नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित पावले उचलणे गरजेचे आहे.

दु:खद अंत

या अपघाताने एका कुटुंबाच्या आनंदाला काळोख फासला आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनाकडे प्रशासनाने गंभीर दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे.

हे देखील वाचा: South Indian Films/ दक्षिण भारत: भारतीय सिनेसृष्टीचा नवा चेहरा; पुष्पा 2,केजीएफ चॅप्टर 3,,गेम चेंजर, थलापती 68 आदी दक्षिण चित्रपटांची प्रेक्षकांना प्रतीक्षा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !