केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (central employees) पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ अपेक्षित
नवी दिल्ली,(आयर्विन टाइम्स वृत्तसंस्था):
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (central employees) मोठी घोषणा लवकरच होण्याची शक्यता असून, ८ व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची अधिकृत घोषणा येत्या काळात होण्याची अपेक्षा आहे. या घोषणेमुळे लाखो कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होईल, असे संकेत सरकारकडून मिळत आहेत.
पगारवाढीचा अंदाज
नॅशनल कौन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी (जेसीएम) च्या स्टाफ साइडचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ व्या वेतन आयोगात २.८६ चा फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची अपेक्षा आहे. सध्या ७ व्या वेतन आयोगानुसार २.५७ फिटमेंट फॅक्टर लागू आहे. नव्या फिटमेंट फॅक्टरमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (central employees) किमान मूळ वेतनात सध्या मिळणाऱ्या १८,००० रुपयांवरून ५१,४८० रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
पेन्शनधारकांनाही याचा मोठा लाभ होईल. सध्या ९,००० रुपये पेन्शन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना (central employees) पेन्शनमध्ये १८६% वाढ होऊन ती २५,७४० रुपये होऊ शकते.
८ व्या वेतन आयोगाची स्थापना कधी?
आतापर्यंत ८ व्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तथापि, मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात याबाबत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. कर्मचारी संघटनांनी मागील २०२४-२५ च्या अर्थसंकल्पाच्या वेळी कॅबिनेट सचिव आणि वित्त मंत्रालयाकडे यासंदर्भात मागण्या मांडल्या होत्या.
डिसेंबरमध्ये होणाऱ्या नॅशनल कौन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीच्या बैठकीनंतर या संदर्भात अधिक स्पष्टता येईल. ही बैठक आधी नोव्हेंबरमध्ये होण्याची अपेक्षा होती, परंतु ती डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
सरकारची भूमिका आणि कर्मचाऱ्यांच्या (central employees) अपेक्षा
सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी, कर्मचारी संघटनांनी पगारवाढीसाठी ठाम भूमिका घेतली आहे. ८ व्या वेतन आयोगाच्या स्थापनेमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (central employees) आर्थिक स्थितीत मोठा बदल घडणार असल्याने त्यांना ‘अच्छे दिन’ येतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचे (central employees) फायदे
जर एकाद्या कर्मचाऱ्याचा पगार १८००० ( अठरा हजार रुपये) असेल तर त्याच्या पगारात काय बदल होईल, त्याचे एक उदाहरण इथे देण्यात आले आहे.
– मूळ वेतन: १८,००० रुपयांवरून ५१,४८० रुपये.
– पेन्शन: ९,००० रुपयांवरून २५,७४० रुपये.
– फिटमेंट फॅक्टर: २.५७ वरून २.८६.
कर्मचाऱ्यांसाठी ही घोषणा आशादायक ठरू शकते आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवू शकते. आता सर्वांच्या नजरा डिसेंबरच्या बैठकीकडे लागल्या आहेत.