धनगर

धनगर आरक्षणासाठी सोन्याळमध्ये रस्ता रोको; शिंदे सरकारवर डागली तोफ

आयर्विन टाइम्स / जत
राज्यातील महायुतीचे सरकार आरक्षणावरून समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. ज्या स्वातंत्र्यवीर शिंग्रोबा धनगरांनी इंग्रजाला सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यातून वाट दाखवली त्याच धनगर समाजाला आज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे, ही शोकांतिका असल्याची खंत व्यक्त करत चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा, मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा महाराज यांनी राज्य शासनाने धनगर समाजाला आरक्षण द्यावे अन्यथा येणाऱ्या काळात जिल्हाधिकारी, तहसिल कार्यालयात मेंढरे घुसवू असा इशारा दिला.

धनगर
जत- सोन्याळ फाटा येथे तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

जत तालुक्यातील सोन्याळ फाटा येथे हभप तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाच्या आरक्षणासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. सकाळी दहा वाजता सोन्याळ फाट्यावर रस्ता रोको आंदोलनास सुरुवात झाली. रस्ता रोको आंदोलनाने जत-उमदी मार्गावरील वाहतुकीची मोठी कोंडी झाली. रस्ता रोकोमध्ये मेंढपाळ तानाजी कुलाळ यांनी आपली मेंढरे रस्त्यावर उभी करत वेगळ्या पद्धतीने रस्ता रोको आंदोलनात सहभाग नोंदविला.

हे देखील वाचा: murder news: शेतीच्या वादातून कोतवालाची हत्या: 3 जणांना अटक, एक पसार

यावेळी सोमण्णा हाक्के, भाऊसाहेब कटरे, एकनाथ बंडगर, शिवानंद पुजारी, विक्रम पुजारी, सुरेश कोकरे, विठ्ठल पुजारी, अमोल वाघमोडे, पांडुरंग वाघमोडे, हणमंत पुजारी, सिद्दाप्पा पुजारी, माजी सरपंच जक्कांना निवर्गी, वतन गारळे, अनिल सरगर, नागेश गारळे, सिधु सरगर, कलमेश पुजारी, महांतेश बिरादार यासह मेंढपाळ तानाजी कुलाळ उपस्थित होते.

महायुतीने जातीत भांडणे लावू नयेत

राज्यातील महायुतीने आरक्षणावरून जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू केले आहे.आरक्षणाबाबत ठोस निर्णय न घेतल्याने समाजासमाजामध्ये तेढ निर्माण होत आहे तसेच समाजाला आरक्षण मिळत नसल्याने नाराजी पसरली आहे. महायुतीने जातीत भांडणे न लावता आरक्षणावर निर्णय घ्यावा व समाजाला योग्य ते आरक्षण द्यावे असे आवाहन करत हभप तुकाराम बाबा महाराज यांनी महायुतीच्या धोरणावर जोरदार टिका केली.

हे देखील वाचा: murder news: प्रियकराच्या मदतीने 42 वर्षीय पतीचा खून: अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीला ठार केल्याची धक्कादायक घटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !