फ्लाइंग कार

तुर्कीमध्ये फ्लाइंग कारची निर्मिती सुरू

फ्लाइंग कार्स या संकल्पनेने अनेक दशकांपासून लोकांना मोहित केले आहे. शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी भविष्यवाण्या केल्या आहेत की एक दिवस अशी वाहने अस्तित्वात येतील जी रस्त्यावर चालण्यास सक्षम असतील तसेच आकाशात उडतील. ही कल्पना आता तुर्कीच्या नवीन तंत्रज्ञानाने साऱ्यांना चकित करून सोडली आहे. तुर्कीमध्ये फ्लाइंग कारची निर्मिती सुरू झाली आहे आणि २०२५ पर्यंत हे वाहन रस्त्यांवर धावण्याबरोबरच हवेत उडण्यास सक्षम असेल.

फ्लाइंग कार

तुर्कीतील ‘एअरकार’ या कंपनीने ही कार विकसित केली आहे, जी एका विशेष तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात आली आहे. एअरकारची ही फ्लाइंग कार लोकांना वाहतूक कोंडीपासून मुक्त करण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. कंपनीने वर्षाअखेरपर्यंत या कारची विक्रीपूर्ण नोंदणी सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, ज्याची किंमत अंदाजे १.६७ कोटी रुपये आहे.

हे देखील वाचा: economic progress: सर्वसामान्य लोकांची आर्थिक प्रगती का घडून येत नाही? समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी आर्थिक नियोजनाची सिक्स जार पद्धत (6 jar method) वापरा आणि समाधानाने जगा

फ्लाइंग कारच्या क्षेत्रात तुर्की एकमेव देश नाही ज्यांनी हे पाऊल उचलले आहे. हॉलीवूडच्या 1997 मधील ‘फ्लबर’ या चित्रपटातील उडणाऱ्या कारचे दृश्य अजूनही लोकांच्या लक्षात आहे, पण आता अनेक कंपन्या वास्तविक जीवनात फ्लाइंग कार तयार करण्याच्या दिशेने काम करत आहेत. जपानची ‘स्कायड्राईव्ह’ कंपनीही या शर्यतीत पुढे आहे. त्यांनी एका व्यक्तीसाठी उडणारी कार तयार केली आहे, ज्याची यशस्वी चाचणीही घेण्यात आली आहे.

स्कायड्राईव्हच्या या कारने जमिनीपासून एक ते दोन मीटर उंचीवर उड्डाण केले आणि ते चार मिनिटे हवेत तरंगत राहिले. कंपनीचे प्रकल्प प्रमुख तोमोहिरो फुकुजावा यांनी सांगितले की २०२५ पर्यंत या कारचे उत्पादन सुरू होण्याची त्यांना आशा आहे. तथापि, ही कार सुरक्षित बनवणे एक मोठे आव्हान आहे.

फ्लाइंग कार

गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज यांनीही उडणाऱ्या कारच्या विकासात गुंतवणूक केली आहे. त्यांनी ‘झी एरो’ नावाच्या स्टार्टअपमध्ये 2010 पासून काम सुरू केले आहे आणि त्यांनी स्वतःच्या कमाईचे 670 कोटी रुपये या प्रकल्पावर खर्च केले आहेत. लॅरी पेज यांचा हा प्रकल्प टीएफएक्स एअरक्राफ्ट नावाची कार विकसित करत आहे, ज्यामध्ये चार जणांची बसण्याची व्यवस्था आहे. ही कार कॉम्प्युटरने नियंत्रित केली जाऊ शकते, म्हणजे ऑपरेटर टेक ऑफ, लँडिंग आणि डेस्टीनेशन अगोदरच सेट करू शकतो.

या हायब्रिड इलेक्ट्रिक फ्लाइंग कारला पंख आहेत, जे ट्विन इलेक्ट्रिक मोटर पॉडशी जोडलेले आहेत. हे पंख दुमडू शकतात आणि मोटर पॉडमुळे कारची बॅटरी चार्ज होऊ शकते. ही कार व्हर्टिकल आणि हॉरिझॉण्टल पोझिशन घेऊ शकते आणि तिचा कमाल वेग ताशी 806 किमी आहे. ती ऑटो लँडिंग करू शकते आणि ऑपरेटरला लँडिंग रद्द करण्याची सुविधा देखील आहे.

हे देखील वाचा: Superfoods: सुपरफूड्सचा समतोल आहार: एकाच प्रकारच्या अन्नावर अवलंबून न राहता, विविध सुपरफूड्सचा आपल्या रोजच्या आहारात समावेश केल्यास त्यांचे मिळतात संपूर्ण फायदे; 9 प्रकारचे सुपरफुड्स जाणून घ्या

सिलिकॉन व्हॅलीतील किटी हॉक या स्टार्टअपने देखील ‘फ्लायर’ नावाची फ्लाइंग कार बनविली आहे, ज्याचा व्हिडिओ त्यांनी प्रसिद्ध केला आहे. सिमरन मॉरिस यांनी या कारची टेस्ट घेतली आहे आणि त्यांच्या मते ही कार उडवताना त्यांना फार मजा वाटली. ही 100 टक्के इलेक्ट्रिक पॉवरवर चालणारी कार हेलिकॉप्टरप्रमाणे व्हर्टिकल उडते आणि लँड करते.

या सर्व घटनांमुळे एक गोष्ट स्पष्ट होते की, जगभरात फ्लाइंग कार बनवण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू आहेत. सध्या जगभरात 100 पेक्षा जास्त फ्लाइंग कार प्रकल्प सुरू आहेत. काही मोजक्याच प्रकल्पांमध्ये यश आले आहे, जिथे एका व्यक्तीला अशा वाहनातून आकाशात नेण्यात यश मिळाले आहे.

सध्या हे वाहने केवळ दहा मिनिटेच उडू शकतात, पण लवकरच त्याचा वेळ तीस मिनिटांपर्यंत वाढवला जाईल. चालकाशिवाय कार रस्त्यावर उतरवण्याचे काम गुगल आणि उबरने केले आहे. या कारची यशस्वी चाचणी झाली असली तरी अजूनही काही समस्या उभ्या राहिल्या आहेत. गुगलच्या चालकाविना कारने अपघात केल्याने या प्रकल्पाला काही प्रमाणात खीळ बसली आहे.

फ्लाइंग कार

उडणाऱ्या कारच्या संदर्भात अजूनही अनेक अडचणी आहेत. हेलिकॉप्टरप्रमाणे ही कार उडवणे आणि उतरवणे अजूनही सोयीस्कर झालेले नाही. त्यासाठी हेलिपेडची गरज लागते, पण फ्लाइंग कारला भर रस्त्यावरून उडवायचे आहे. हे काम अर्थातच मोठे आणि खर्चिक आहे. यात लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्त्वाचा आहे.

फ्लाइंग कारच्या निर्मितीचा उद्देश जलद वाहनसेवा देणे आणि वाहतूक अडथळा टाळणे हा आहे. हवाई उड्डाणाचे काही नियम आहेत, त्यात शिथिलता आणण्याची गरज आहे. कारचा वेग, उड्डाणाची उंची आणि इंधन कोणत्या प्रकारचे लागेल हे सर्व गोष्टी स्पष्ट व्हाव्या लागणार आहेत.

सध्या जॉय राईडसाठी फ्लाइंग कारची निर्मिती झाली आहे, ज्याचा पाण्यावरून उड्डाणाचा प्रयत्न झाला आहे. रस्त्यावरची चाचणी अजून व्हायची आहे. उडणाऱ्या कारची निर्मिती आणि चाचणी जसजशी यशस्वी होईल तसतसे त्याबाबतच्या वापराचे नियम प्रत्यक्षात येतील.

हे देखील वाचा: rhetorical skills / वक्तृत्व कौशल्य: तुम्हाला उत्तम वक्ता व्हायचं आहे का? मग जाणून घ्या वक्तृत्व कौशल्याचे महत्त्व आणि त्याचा विकास; वक्तृत्वाचे 4 पैलूदेखील जाणून घ्या

भारतामध्ये फ्लाइंग कार यायला बराच कालावधी लागणार आहे, पण तोपर्यंत परदेशात कारच्या रस्त्यावरील आणि हवेतील वावराचे नियम स्पष्ट होत जातील. सध्या मानवरहित ड्रोनबाबत काही कडक नियम आहेत, त्यामुळे फ्लाइंग कारलाही वेगळ्या परवानगीची गरज भासणार आहे.

अशा प्रकारे, फ्लाइंग कार प्रत्यक्षात येण्यास अनेक अडचणी आहेत. त्याचा सामना कार निर्मात्यांना करावा लागणार आहे. मात्र निर्मितीचा वेग आणि प्रयत्न पाहता, काही वर्षेच या कारची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

फ्लाइंग कारच्या विकासाच्या दिशेने तंत्रज्ञ आणि संशोधकांचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये तुर्की, जपान आणि अमेरिकेतील काही कंपन्यांनी उल्लेखनीय प्रगती केली आहे. भविष्यात फ्लाइंग कार्स दैनंदिन जीवनाचा भाग बनण्याची शक्यता आहे, पण त्या साठी अजून काही अडचणी आणि नियमांची पूर्तता करणे गरजेचे आहे. – मच्छिंद्र ऐनापुरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !