गाढविणीचे दूध: विविध पोषक तत्त्वे, प्रथिने, आणि अँटीऑक्सिडंट्स असतात भरपूर प्रमाणात
गाढविणीचे दूध आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. प्राचीन काळापासून ते आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्वचेच्या समस्यांवर उपाय म्हणून वापरले गेले आहे. गाढविणीच्या दुधात विविध पोषक तत्त्वे, प्रथिने, आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. खाली त्याचे आरोग्यदायी फायदे आणि कोणत्या आजारांवर ते उपयुक्त आहे, याचे वर्णन केले आहे:
गाढविणीच्या दुधाचे आरोग्यदायी फायदे:
1. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे
गाढविणीच्या दुधात लायसोझाइम नावाचा घटक असतो, जो शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला चालना देतो. हे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्मांनी समृद्ध असते, ज्यामुळे शरीरास संसर्गांपासून संरक्षण मिळते.
2. त्वचेसाठी फायदेशीर
गाढविणीचे दूध व्हिटॅमिन E आणि अँटीऑक्सिडंट्स ने समृद्ध आहे, जे त्वचेच्या दुरुस्तीला मदत करतात. हे दूध त्वचेला मऊ, ताजेतवाने आणि तेजस्वी ठेवते. क्लिओपात्रासारख्या प्राचीन राण्या याचा वापर त्वचेला सुंदर ठेवण्यासाठी करायच्या.
3. एलर्जी आणि अस्थमासाठी उपयुक्त
गाढविणीचे दूध हायपोअलर्जेनिक असते, म्हणजेच ते इतर दुधाच्या तुलनेत कमी एलर्जीजनक असते. त्यामुळे दुधाच्या एलर्जीचा त्रास असलेल्या मुलांना हे दूध दिले जाते. तसेच, अस्थमा आणि श्वसनाच्या इतर समस्या असलेल्या लोकांसाठी हे फायदेशीर ठरू शकते.
अलीकडे संशोधनात आढळून आले आहे की लॅक्टोजचे प्रमाण अधिक आणि फॅट कमी असलेले गाढविणीचे दूध अनेक आजारांवर प्रभावी ठरू शकते. त्यामुळेच कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी एके ठिकाणी सांगितले आहे कि, या गाढविणीच्या दुधातील औषधी गुणधर्मांचा अभ्यास महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत असलेल्या उदगीर येथील पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालयातील तज्ज्ञ करीत आहेत.
गाढविणीचे दूध मानवी आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे संशोधनाअंती समोर आले आहे. या संदर्भात डॉ. मोहम्मद रजियोद्दीन यांनी म्हटले की, गाढविणीचे दूध मानवी दुधासारखे असते. लॅक्टोजचे प्रमाण अधिक तर फॅट कमी आहे. दुधातील जिवाणू आणि बुरशीजन्य रोग प्रतिकारशक्तीबाबत अभ्यास केला जाणार आहे. लहान मुलांच्या पोटदुखीवर हे दूध प्रभावी ठरते का, याचाही अभ्यास ‘माफसू’कडून होणार आहे.
हे दूध हायपो अॅलर्जेनिक असून त्यामुळे यात अॅलर्जी कमी करण्याची क्षमता आहे. या दुधाचा साबण, क्रीम आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापर करण्याबाबतही विशेष अभ्यास केला जाणार आहे.
उदगीर येथील पशुवैद्यकीय पशुविज्ञान महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. मोहम्मद रजियोद्दीन यांनी सांगितले आहे की गाढविणीच्या दुधातील आरोग्यदायी घटकांबाबत विशेष संशोधन करण्यात येत आहे. दुधापासून पावडर तयार करण्यासाठी वेगळी प्रक्रिया विकसित करण्यात आली आहे. सध्या फ्रिज-ड्रायिंग आणि स्प्रे-ड्रायर पद्धतीनुसार दूध पावडर तयार केली जाते.
हे देखील वाचा: wood apples: कवठ: चवीला आंबट-गोड असलेल्या या फळाचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या
गाढविण दररोज सरासरी ८०० मिली दूध देऊ शकते. गाढविणीचे आरोग्य, आहार, आणि वातावरण अशा अनेक घटकांचा दूध उत्पादनावर परिणाम होतो. या दुधामध्ये प्रथिने १.५ ते १.८%, फॅट ०.२ ते १.०%, लॅक्टोज ६.० ते ७.०%, कॅल्शियम ०.१ ते ०.२%, लॅक्टोफेरिन ०.२ ते ०.०३%, जीवनसत्त्व बी ०.०३%, जीवनसत्त्व अ ०.०५%, आणि जीवनसत्त्व ड ०.०००५% असते.