सारांश: कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी येथे एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला. आरोपीने मुलीला फूस लावून पळवून नेले आणि एका हॉटेलमध्ये तिचा विनयभंग केला. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि न्यायालयाने आरोपीला पाच वर्षांचा कारावास आणि आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही घटना समाजात महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करते.
इस्लामपूर,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने पाच वर्षांचा कारावास आणि आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना पावणेदोन वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी येथे घडली होती.
सुतार याची पीडित मुलीशी ओळख होती. १८ एप्रिल २०२३ रोजी वसंत याने मुलीला, नृसिंहवाडीला आरतीसाठी जायचे आहे, असे सांगून दुचाकीवर घेतले. त्याची मुलगीही आपल्याबरोबर येणार असल्याचे त्याने पीडित मुलीला सांगितले आणि तो तिला घेऊन नृसिंहवाडी येथे गेला.
वसंत याने पीडित मुलगी त्याचीच असल्याचे सांगून एका हॉटेलमध्ये भाड्याची खोली घेतली. तेथे मुलगी झोपी गेली. तिला जाग आली, त्यावेळी वसंत हा तिचा विनयभंग करत होता. वसंत याला धक्का देऊन तिने खोलीतून पळ काढला. हॉटेल मालकाजवळ जाऊन तिने वसंत हा तिचा वडील नसल्याचे सांगितले. त्यानंतर हॉटेल मालकाने तिच्याकडून घरच्यांचा फोन नंबर घेऊन घरच्यांना याची माहिती दिली. घरच्यांनी नृसिंहवाडी येथे जाऊन मुलीला घरी नेले. दुसऱ्या दिवशी मुलीच्या घरच्यांनी वसंतविरोधात फिर्याद दिली.
पोलिसांनी वसंतच्या विरोधात येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा न्यायाधीश ए. एस. गांधी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सुनावणीत फिर्यादी, पीडिता, पंच, तपासी अंमलदार, सहायक पोलिस निरीक्षक रेखा जाधव यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. वसंत याला कलम ३५४ अ व पोक्सो १०, १२ कायद्यांतर्गत दोषी धरून ५ वर्षे साधा कारावास, ८ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील शुभांगी पाटील यांनी काम पाहिले.