बक्षीहिप्परगे

बक्षीहिप्परगे वसले आहे सोलापूर-हैदराबाद महामार्गावर

सोलापूर जिल्ह्यातील बक्षीहिप्परगे हे एक छोटेसे गाव असून, या गावाने गाजर शेती (Carrot Farming) च्या माध्यमातून आपली खास ओळख निर्माण केली आहे. सोलापूरपासून केवळ ६ किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव, सोलापूर-हैदराबाद महामार्गावर वसले आहे, ज्यामुळे गावाला सोयीची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

बक्षीहिप्परगे

गाजर शेतीची सुरुवात आणि प्रगती

बक्षीहिप्परगे गावात भाजीपाला, कांदा यांसारखी पारंपारिक पिके घेतली जायची. मात्र, गाजर शेतीमुळे या गावाचे संपूर्ण अर्थकारण बदलले. आज बक्षीहिप्परगे हे गाव सोलापूर जिल्ह्यात गाजर शेतीसाठी प्रसिद्ध आहे. गावाच्या ८०% भौगोलिक क्षेत्रात गाजर शेती केली जाते, जी रब्बी हंगामापासून ते उन्हाळी हंगामापर्यंत चालते. गावातील शेतकरी प्रामुख्याने देशी वाणाचे गाजर घेतात, जे आकाराने मध्यम, केशरी रंगाचे, आणि चवीला गोड असते. यामुळे ग्राहकांची पसंती गाजरांना असते.

हे देखील वाचा: exportable pomegranates: गुणवत्तापूर्ण आणि निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी काय करावं लागेल, जाणून घ्या ‘या’ 7 टिप्स

गाजर शेतीचे नियोजन

गाजर शेतीसाठी जमिनीची तयारी ऑगस्ट महिन्यात सुरू होते. काळ्या-भारी जमिनीत उभी-आडवी नांगरट करून सरी तयार केली जाते. लागवडीसाठी साधारण १२ ते १५ किलो बियाणे एकरी लागते. गाजर पिकवण्यासाठी लागणारी मेहनत व खर्च तुलनेने कमी असते. साधारण ७५ ते ८० दिवसांत गाजर काढणीस तयार होते. या पिकासाठी आठवड्यातून एकदा पाणी देणे आवश्यक असते. हंगाम एप्रिलपर्यंत चालतो, आणि शेतकरी एक हंगाम संपल्यानंतर वेगवेगळे पीक फेरपालट करून घेतात.

बक्षीहिप्परगे

गावाची वार्षिक उलाढाल सुमारे ७५ लाख ते कोटी रुपयांच्या घरात

बक्षीहिप्परगे गावातील शेतकऱ्यांचे गाजर उत्पादन हे एकरी ७ ते १० टनांपर्यंत जाते. सुरुवातीच्या हंगामात गाजराचे दर किलोला १० ते २० रुपये असतात, तर हंगामाच्या शेवटी ते ३० ते ४० रुपयांपर्यंत वाढतात. त्यामुळे शेतकरी एकरी अंदाजे दीड लाख ते दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवतात, ज्यामुळे गावाच्या अर्थकारणात मोठा बदल घडला आहे. या पिकातून गावाची वार्षिक उलाढाल सुमारे ७५ लाख ते कोटी रुपयांच्या घरात जाते.

हे देखील वाचा:Red Banana/ लाल केळी: सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील उच्चशिक्षित युवकाचा यशस्वी प्रयोग; चार एकरांत लाल केळीतून कमावले 35 लाख

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढल्याने झाला गावाचा विकास

बक्षीहिप्परगे हे गाव केवळ शेतीतच नव्हे, तर सोयीसुविधांमध्येही प्रगत झाले आहे. गावात पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प, सिमेंट रस्ते, वाचनालय, विद्यार्थी वसतिगृह यांसारख्या विविध सोयी उपलब्ध आहेत. स्वच्छ भारत अभियान, सांडपाणी व्यवस्थापन, सौरऊर्जा यांसारख्या उपक्रमांनी गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली आहे.

बक्षीहिप्परगे

गाजर शेतीतून (Carrot Farming) गावाच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले असून, त्यामुळे त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. बक्षीहिप्परगे गावाचा हा यशस्वी प्रवास इतर गावांसाठी प्रेरणादायी आहे.

हे देखील वाचा: modern farming: ‘डाळिंब लाल भडक अन् भाव कडक’: 50 गुंठ्यांत घेतले 19 लाखांचे उत्पन्न; आधुनिक शेतीची धरली कास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !