Golden Pheasant

Golden Pheasant: सरासरी वजन असते ५५० ते ७१० ग्रॅमच्या दरम्यान

गोल्डन फेजंट (Golden Pheasant) हा एक सुंदर आणि रंगबेरंगी पक्षी आहे. त्याचा वरचा भाग हिरव्या रंगाचा असून, त्याचे शरीर विविध रंगांनी नटलेले असते. विशेषतः त्याची लांब आणि नक्षीदार शेपटी हे त्याच्या सौंदर्यातील मुख्य आकर्षण आहे. मादी गोल्डन फेजंट नराच्या तुलनेत अधिक रंगबेरंगी असते. या पक्ष्याची एकूण लांबी साधारणतः ६० ते ११५ सेंटीमीटरपर्यंत असते. जेव्हा हा पक्षी आपले पंख पसरवतो, तेव्हा ते ६५ ते ७५ सेंटीमीटरपर्यंत पसरतात, ज्यामुळे तो अधिक देखणा दिसतो. गोल्डन फेजंटचे सरासरी वजन ५५० ते ७१० ग्रॅमच्या दरम्यान असते.

Golden Pheasant

गोल्डन फेजंट (Golden Pheasant) चा बहुतांश वेळ जमिनीवर जातो. हा पक्षी चीन, युनायटेड किंगडम, कॅनडा, अमेरिका, मेक्सिको, जर्मनी, कोलंबिया, बेल्जियम, फ्रान्स, आयर्लंड, न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या डोंगराळ प्रदेशांत आढळतो.

हे देखील वाचा: वाचा छान छान गोष्टी 6: …आणि चीनू आईला बिलगली:

उड्डाणापेक्षा वेगाने धावण्याची क्षमता

गोल्डन फेजंट (Golden Pheasant) च्या लांब शेपटी आणि लहान पंखांमुळे तो जास्त उंच उडू शकत नाही. मात्र, त्याची धावण्याची क्षमता चांगली आहे, त्यामुळे तो वेगाने पळू शकतो. हा पक्षी नैसर्गिक वातावरणात ५ ते ६ वर्षे जगतो, तर बंदिस्त अवस्थेत तो सुमारे १५ वर्षे जगू शकतो.

Golden_pheasant

नैसर्गिक जीवन आणि शत्रू

गोल्डन फेजंट (Golden Pheasant) हा सुंदर पक्षी असला तरी त्याला अनेक नैसर्गिक शत्रू आहेत. मानव, कुत्रे, लांडगे, कोल्हे आणि विविध शिकारी पक्षी त्याचा शिकार करतात. मादी गोल्डन फेजंट गवताळ मैदानात ५ ते १२ अंडी घालते. अंडी दिल्यानंतर ती साधारणतः २ ते ३ आठवडे त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेते. साधारणतः दोन आठवड्यांच्या काळानंतर पिल्ले उडण्यासाठी सक्षम होतात.

हे देखील वाचा: Sparrow sighting / चिमणी दिसणे: शुभ संकेतांचा संदेश; घरात आणि घराच्या आसपास चिमणी दिसण्याचे पारंपारिक दृष्टिकोनातून काय संकेत आहेत, हे जाणून घेऊया

सांस्कृतिक महत्त्व

चीनमधील लोक गोल्डन फेजंट (Golden Pheasant) ला शुभलाभ आणि सुदैवाचे प्रतीक मानतात. त्यांच्या दृष्टीने हा पक्षी निसर्गाच्या सौंदर्याचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. त्याच्या आकर्षक रंगांमुळे आणि अद्वितीय सौंदर्यामुळे हा पक्षी जगभरातील पक्षीप्रेमींच्या मनात विशेष स्थान मिळवून आहे.

-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !