Athani news

Athani news: अथणी तालुक्यातील सत्ती येथे ऊसतोड यंत्राच्या अपघातात ऊस गोळा करताना दोन वृद्ध महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला. Two elderly women labourers died after getting trapped in a sugarcane harvesting machine while collecting cane in Satty village of Athani taluka.

अथणी, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) :

ऊस तोडणीसाठी वापरण्यात येणाऱ्या यांत्रिक उपकरणांमुळे शेतमजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अथणी तालुक्यातील सत्ती (ता. अथणी) येथे ऊसतोड यंत्रात अडकून दोन वृद्ध महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी (ता. १७) दुपारी घडली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

या अपघातात बौरव्वा लक्ष्मण कोबडी (वय ६०) आणि लक्ष्मीबाई मल्लप्पा रुद्रगौडर (वय ६५), दोघीही सत्ती येथील रहिवासी, यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सत्ती गावाच्या बाहेरील शेतात यंत्राद्वारे ऊस तोडणीचे काम सुरू होते. दुपारी सुमारे दोनच्या सुमारास ऊसतोड यंत्राच्या मागील बाजूस तुटलेला ऊस गोळा करण्याचे काम या दोघी महिला करत होत्या.

दरम्यान, अचानक त्या ऊसतोड यंत्राच्या हालचालीत अडकल्या. यंत्राचा वेग आणि आवाज प्रचंड असल्याने चालकाच्या लक्षात येईपर्यंत उशीर झाला आणि यंत्र बंद करण्यापूर्वीच दोघींचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर मृत महिलांच्या कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे मन हेलावून गेले.

Athani news

घटनेची माहिती मिळताच अथणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून, अथणी पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

ऊसतोड यंत्रामुळे वाढतो धोका

शेतात ऊसतोडीसाठी वापरण्यात येणाऱ्या हार्वेस्टर यंत्राचा आवाज अत्यंत मोठा असतो. त्यामुळे यंत्राच्या मागील किंवा पुढील भागात काय घडत आहे, याचा अंदाज चालकाला अनेकदा येत नाही. याशिवाय, सरीतून ऊस तोडताना किंवा मशीन मागे घेताना शेतकरी व मजूर मागे राहिलेला ऊस गोळा करण्यासाठी यंत्राच्या जवळ जातात. मात्र, उसाच्या फडात काम करताना यंत्राचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत नसल्याने अशा दुर्दैवी घटना घडत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

हेदेखील वाचा: सौंदत्ती रेणुका देवी यात्रा 2025: परड्या भरण्याचा पारंपरिक सोहळा; डोंगरावर लाखोंची गर्दी, विशेष सुविधा उपलब्ध

सुरक्षेच्या उपाययोजनांची गरज

या दुर्घटनेनंतर ऊसतोड यंत्र वापरताना सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन, यंत्राच्या आजूबाजूला मजुरांना जाण्यास मनाई, तसेच प्रशिक्षित चालक व सहाय्यकांची नियुक्ती करणे अत्यावश्यक असल्याची मागणी होत आहे. अन्यथा, आधुनिक शेती यांत्रिकीकरण मजुरांच्या जीवावर बेतत असल्याची भावना बळावत आहे.


Athani (Irwin Times Correspondent):
Two elderly women labourers were killed after getting trapped in a sugarcane harvesting machine at Satty village in Athani taluka on Wednesday afternoon. The deceased have been identified as Bauravva Laxman Kobadi (60) and Laxmibai Mallappa Rudragouda (65), both residents of Satty.

The incident occurred around 2 pm while sugarcane harvesting was underway in a field on the outskirts of the village. The women were collecting leftover sugarcane behind the harvester when they accidentally got caught in the machine and died on the spot before it could be stopped. Athani police conducted a spot inspection, sent the bodies for post-mortem examination, and registered an accidental death case.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *