अल्झायमर

मराठी भाषेत सांगायचं तर अल्झायमर म्हणजे विसरभोळेपणा

अल्झायमर हा मेंदूशी संबंधित एक गंभीर आजार आहे, जो प्रामुख्याने वयस्कर व्यक्तींमध्ये आढळतो. सामान्यतः ६० वर्षांनंतर या आजाराची लक्षणे दिसू लागतात. अल्झायमर्स हा डिमेंशिया या मोठ्या व्याधीचा एक उपप्रकार आहे, ज्यामध्ये स्मृती गमावण्यासह मेंदूच्या इतर कार्यक्षमतेत अडथळे येतात. १९०६ साली डॉक्टर अल्झायमर्स यांनी या आजाराचे प्रथम निदान केले, म्हणून याला त्यांचे नाव देण्यात आले.

अल्झायमर

डिमेंशियाचे अनेक प्रकार आहेत, परंतु सर्वात सामान्य प्रभाव म्हणजे व्यक्तीची स्मृती हळूहळू कमकुवत होऊ लागते. हा विसरभोळेपणा (Alzheimer’s means forgetfulness) सुरुवातीला साधारण वाटतो, जसे की एखादी वस्तू ठेवून ती विसरणे, परंतु जसजसा आजार वाढत जातो तसतशी साध्या दैनंदिन क्रियांचे विस्मरण होऊ लागते, जसे की जेवण झालं का ते आठवत नाही. काही रुग्णांना स्वच्छतेच्या मूलभूत क्रियाही लक्षात राहत नाहीत.

हे देखील वाचा: health trend Vegan diet / व्हेगन आहार : ‘लठ्ठपणा’पासून बचावासाठी युवकांचा वाढतोय व्हेगन आहाराकडे कल: नवीन आरोग्यप्रवृत्ती

भारतातील स्थिती आणि महत्व

सध्या भारतात अंदाजे ४३-५० लाख लोकांना डिमेंशियाचा त्रास आहे. या आजारावर आर्थिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक पार्श्वभूमीचा कोणताही परिणाम होत नाही. गरीब, श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित कोणालाही हा आजार होऊ शकतो. प्रत्येकाच्या आयुष्यात ताणतणाव, मानसिक ओझे किंवा शरीरातील बदल होऊ शकतात, त्यामुळे कोणत्याही वयातील व्यक्तींनी नियमित आरोग्य तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

अल्झायमर

डॉक्टर्स डिमेंशिया किंवा अल्झायमरचे निदान करण्यासाठी विविध चाचण्या करतात. यात MMSE (Mini-Mental State Examination) नावाची प्रश्नावली वापरली जाते, ज्यातून व्यक्तीच्या स्मरणशक्तीची तपासणी केली जाते. याशिवाय, MRI किंवा मेंदूची इतर प्रतिमा चाचण्यांद्वारे मेंदूतील बदल तपासले जातात.

अल्झायमरची स्टेजेस आणि लक्षणे

अल्झायमरचा हा आजार टप्प्याटप्प्याने वाढतो. सुरुवातीच्या स्टेजमध्ये रुग्णाला नुकत्याच घडलेल्या गोष्टी आठवायला त्रास होतो, जसे की सकाळी काय खाल्ले होते हे विसरणे. ही लक्षणे साधी वाटतात परंतु त्याकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते. पुढच्या टप्प्यात, रुग्णाला दैनंदिन कामे करणे अवघड जाते, जसे की भाजी बनवण्यासाठी कोणत्या क्रमाने काय करायचे हे आठवणे. रुग्णांची चिडचिड वाढते, त्यांच्या झोपेत बदल होतात आणि एकूणच मानसिक स्वास्थ्य खालावत जाते.

हे देखील वाचा: surprising : काय म्हणता! रक्तातील पेशींची वाढ करण्यासाठी पेरू हे किवीपेक्षा अधिक प्रभावी? काय कारण आहे जाणून घ्या; महागड्या किवीपेक्षा स्वस्तातल्या पेरूचा आहारात समावेश करा

सर्वात गंभीर अवस्थेत रुग्ण घरातील व्यक्तींनाही ओळखू शकत नाही. हे टप्पे कधी धीम्या गतीने तर कधी झपाट्याने वाढू शकतात. काही रुग्णांना पहिल्या टप्प्यातच दीर्घकाळ राहताना दिसते तर काहींना चार महिन्यातच लक्षणे तीव्र स्वरूप घेऊ शकतात.

अल्झायमर

उपचार आणि व्यवस्थापन

अल्झायमर्स हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, परंतु योग्य उपचार आणि औषधोपचारांनी त्याची वाढ थांबवता येते. सुरुवातीच्या टप्प्यात जर निदान झाले तर रुग्णाला १०-१५ वर्ष किंवा त्याहून अधिक सामान्य आयुष्य जगता येऊ शकते. औषधे मेंदूच्या कार्यक्षमता स्थिर ठेवण्यास मदत करतात.

मनोरुग्णांवर चांगले उपचार केल्यास त्यांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवता येतात. त्यांना योग्यप्रकारे जगण्यास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. अनेक वेळा आपण आपल्या प्रिय व्यक्तीला मदत न करता त्यांना दुर्लक्षित करतो, ज्यामुळे त्यांची स्थिती आणखी वाईट होऊ शकते.

हे देखील वाचा: Donkey Milk / गाढविणीचे दूध: आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, माहीत आहे का? गाढविणीच्या दुधात कोणकोणते घटक असतात जाणून घ्या

प्रतिबंधात्मक उपाय

डिमेंशिया किंवा अल्झायमरसारख्या आजारांचा धोका टाळण्यासाठी खात्रीशीर उपाय नाहीत, परंतु काही जीवनशैली बदलांनी तो टाळण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. निरोगी जीवनशैली जपणे, नियमित व्यायाम करणे, संतुलित आहार घेणे, दारू-तंबाखूसारख्या व्यसनांपासून दूर राहणे आणि चांगली झोप घेणे यामुळे या आजाराचा धोका कमी होऊ शकतो.

Alzheimer’s means forgetfulness. या आजाराविषयी जागरूकता वाढवणे आणि योग्य उपचार घेणे ही काळाची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !