सांगली

जतजवळ झालेल्या अपघातात डोक्याला जबर दुखापत झाल्याने एकाचा जागीच मृत्यू

आयर्विन टाइम्स / जत

जत ते डफळापूर मार्गावर खलाटी घाटात दुचाकी व एसटी बसचा समारोसमोर अपघात (accident) होऊन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. जयवंत यशवंत शिंदे (वय ५०, रा. ऐतवडे खुर्द, ता. वाळवा) असे मृताचे नाव असून आज दुपारी ४ च्या सुमारास ही घटना घडली. याबाबत रात्री उशिरा घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया जत पोलिस ठाण्यात सुरू होती. पोलिसांनी व नातेवाईकांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मृत जयवंत शिंदे यांच्याकडे खासगी निवडणूक सर्व्हेचे काम होते.

जत

त्यानिमित्ताने ते निवडणुकीच्या खासगी सर्व्हेच्या कामासाठी दुचाकीवरून जत तालुक्यात आले होते. सायंकाळी काम आटोपून आपल्या गावी ऐतवडे खुर्द इथे निघाले होते. मात्र, खलाटी येथील वळणाचा अंदाज न आल्याने त्यांचा व बसचा समोरासमोर अपघात झाला. यामध्ये जयवंत यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच
मृत्यू झाला. घटनेनंतर जत पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत बस ताब्यात घेतली आहे. रात्री उशिरा जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह आणण्यात आला होता. त्यांच्या मागे आई, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे. जत पोलिस पी. एन. मंडले अधिक तपास करत आहेत.

हे देखील वाचा: sangli crime news: गांजा जप्त: 2 लाख 40 हजार रुपये किंमतीचा 12 किलो गांजा जप्त: आरोपीला अटक; सांगली पोलिसांची मोठी कारवाई

विधानसभेला यंदा जतमधून लिंगायत समाजालाच प्राधान्य द्या: खासदार गोपछडे; जतला वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रा

जत तालुक्यात लिंगायत समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. मात्र, आजअखेर तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे यावेळी लिंगायत समाजाचा आमदार झाला पाहिजे, सन्मान यात्रेचा तोच मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन भाजपचे राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

खासदार गोपछडे हे लिंगायत समाजाचे नेते असून, त्यांनी महाराष्ट्रभर वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा जत येथे पोहोचली. गुड्डापूर, जत व बिळूर या ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या. यावेळी लिंगायत समाजाला एकत्र येत आपली ताकद दाखवावी लागणार आहे, असेही स्पष्ट केले.

खासदार गोपछडे यांची सन्मान यात्रा आयोजित करण्यामध्ये भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांचा पुढाकार होता. केंद्रीय सिमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाचे संचालक डॉ. रवींद्र आरळी, उमदीचे नेते संजय तेली, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रशेखर गोब्बी यांनी यात्रेच्या नियोजनात पुढाकार घेतला होता. मात्र, जतमधून लिंगायत समाजाला भाजपकडून प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. याबाबत खासदार गोपछडे यांनी स्पष्ट भूमिका जाहीर केली.

हे देखील वाचा: crime news: मिरजमध्ये मोठी पोलिस कारवाई: नशेच्या गोळ्या व 2 वाहने हस्तगत, 3 आरोपी अटकेत

येथील डॉ. रवींद्र अरळी शैक्षणिक संकुल येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार गोपछडे पुढे म्हणाले की, लिंगायत समाजाचे महाराष्ट्रात २२ आमदार होते. मात्र त्यांची संख्या घटली आहे. सध्या ५ ते ६ आमदार आहेत. लिंगायत समाजाला योग्य प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी भक्तिस्थळ ते शक्तिस्थळ, अशी सोळा जिल्ह्यांतून जाणारी सन्मान यात्रा काढली आहे.

लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व मिळावे, हा या सन्मान यात्रेचा हेतू आहे. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने एकाच नेत्याच्या पाठीशी उभे राहावे. सर्व गटतट विसरून एकत्र यावे, तरच लिंगायत समाजाचे व या तालुक्याचे कल्याण होईल, असेही खासदार गोपछडे सांगितले.

उमदीमध्ये हिंदू-मुस्लिम बांधवांची एकत्रीत गणेश आरती

 उमदी ग्रामपंचायत कार्यालयातील गणेशमूर्तीची हिंदु मुस्लिम बांधवांनी एकत्र येत आरती करुन जिल्ह्यातील मंडळांना सामाजिक एकतेचा संदेश दिला. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक एकामत्मतेची, देशभक्तीची भावना वाढीस लागावी.या माध्यमातुन सर्वांना एकत्र येण्याचे व्यासपिठ मिळावे. यासाठी गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. त्यातुन आज सर्वत्र गणेशोत्सव विविध उपक्रमांव्दारे साजरा होत आहे.

जत

लोकमान्य टिळकांच्या विविध धर्माच्या एकात्मतेच्या संदेशाचे पालन करत उमदी  येथील ग्रामपंचायत कार्यालयातील गणरायाच्या आरतीसाठी सरपंच धुडाप्पा तेली, अश्फाक मुल्ला व हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येत गणेशाची आरती केली. यावेळी कुमार व्हणमाने, उत्तम संकपाळ, सोमु भरमगोंड, गोपाल सुतार, महेश जाधव, संजय स्वामी, मलु संकपाळ, अंबादास कोळी आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा: Carrot Farming: बक्षीहिप्परगे: गाजर शेतीचे आगार; सोलापूरपासून केवळ 6 किलोमीटर अंतरावर असलेले गाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !