मूत्रपिंडा

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणाच्या समस्या तरुण वयातही दिसून येत आहेत. हे सर्व घटक दीर्घकाळात मूत्रपिंडावर घातक परिणाम करतात. मूत्रपिंडाचे आरोग्य टिकवण्यासाठी या कारणांकडे गांभीर्याने पाहणे अत्यावश्यक आहे.

 

मूत्रविकारतज्ज्ञ सांगतात की, मधुमेह आणि उच्च रक्तदाब या दोन प्रमुख कारणांमुळे मूत्रपिंडाचे कार्य हळूहळू बिघडते. यासोबतच मुतखडा व मूत्रमार्गातील जंतूसंसर्ग हेही मूत्रपिंडाचे विकार वाढवणारे महत्त्वाचे घटक आहेत. चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, धूम्रपान, मद्यपान आणि औषधांचे अति सेवन देखील या आजारांमागील लपलेली कारणे आहेत.

मूत्रपिंडा

मूत्रपिंडाच्या आजारांची लवकरात लवकर ओळख होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठ साध्या चाचण्या — जसे की लघवीची चाचणी, सोनोग्राफी, रक्तातील साखर व रक्तदाब मोजणे — या नियमितपणे करून घेतल्यास गंभीर टप्प्यावर पोहोचण्याआधीच आजार ओळखता येतो. वेळेवर निदान झाले नाही तर डायलिसिस किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपण याशिवाय पर्याय उरत नाहीत.

हेदेखील वाचा: हाडे मजबूत ठेवण्यासाठी उपाय : महिलांमध्ये हाडांची झिज, कारणे आणि आयुर्वेदिक उपाय; 35 व्या वर्षापासून सुरू ठेवा कॅल्शियमचे पूरक सेवन

मूत्रपिंडाच्या आजारांची प्रमुख लक्षणे:
* हातापायांवर किंवा चेहऱ्यावर सूज येणे
* लघवीचा गडद रंग किंवा लघवीचे प्रमाण कमी होणे
* सतत थकवा जाणवणे
* श्वास घेण्यास त्रास होणे
* मळमळ, उलट्या होणे

मूत्रपिंड विकार वाढवणारे जोखमीचे घटक:
* मधुमेह आणि उच्च रक्तदाब
* लठ्ठपणा आणि वाढलेले सिरम लिपिड्स
* धूम्रपान, मद्यपान आणि आनुवंशिक कारणे
* चुकीच्या सवयी आणि अयोग्य आहार

हेदेखील वाचा: वय वाढतं तसं मांसपेशी कमजोर होतात : वाढत्या वयातदेखील तंदुरुस्त राहण्यासाठी जाणून घ्या उपाय आणि आहाराच्या सवयी; 9 महत्त्वाच्या गोष्टी वाचायच्या टाळू नका

मूत्रपिंडा

मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी घ्या पुढील काळजी:
1. दररोज पुरेसे पाणी प्यावे, आणि संतुलित आहाराचे पालन करावे
2. मूत्राचा आवेग रोखू नये, आणि मीठाचे प्रमाण मर्यादित ठेवावे
3. सोडा, कोल्ड्रिंकऐवजी आरोग्यदायी पेयांचा अवलंब करावा
4. नियमित व्यायाम करावा, आणि मधुमेह, रक्तदाब नियंत्रणात ठेवावे
5. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेणे टाळावे
6. सप्लिमेंट्स किंवा हर्बल औषधांबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
7. धूम्रपान व मद्यपान यांचे पूर्णपणे टाळावे

मूत्रपिंड हे शरीरातील अत्यंत महत्त्वाचे अंग असून त्याच्या कार्यक्षमतेवर संपूर्ण शरीराचे आरोग्य अवलंबून असते. म्हणूनच मूत्रपिंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळोवेळी तपासणी, योग्य जीवनशैली आणि वैद्यकीय सल्ला यांचा अवलंब करणे हा दीर्घकालीन आरोग्यासाठी आवश्यक टप्पा आहे.

🩺 (टीप: वरील लेख माहिती आणि जागरूकतेसाठी आहे. वैद्यकीय सल्ल्यासाठी कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *