कवठेमहांकाळ

सारांश: कवठेमहांकाळ येथे शानाबाई जाधव यांच्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी छडा लावला. आरोपी किरण गडदे याला मालगाव येथे अटक करण्यात आली. अनैतिक संबंधांवरून झालेल्या वादातून गळा आवळून खून केल्याची त्याने कबुली दिली. या यशस्वी तपासासाठी पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.

कवठेमहांकाळ

सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
कवठेमहांकाळ येथे एका महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तपासाची चोख दिशा ठेवीत अवघ्या काही दिवसांत गुन्ह्याचा छडा लावला. या प्रकरणी किरण आकाराम गडदे (वय २०, रा. बाज, ता. जत, जि. सांगली) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

हेदेखील वाचा: crime news: मोबाईलच्या वादातून 7 वीतील मुलाने महिलेचा केला खून – मराठवाडा हादरला!

घटनेचा तपशील
दि. २६ मार्च २०२५ रोजी धुळगाव रोडवरील डायमंड हॉटेलजवळील एका घरातून उग्र वास येत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यास दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता, सदर घर कुलूपबंद होते. कुलूप तोडून आत प्रवेश केला असता, ५८ वर्षीय शानाबाई शंकर जाधव यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या गळ्याभोवती स्टोन गुंडाळलेला होता. शवविच्छेदन अहवालात गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांची जलद कारवाई
सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल सांळुखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे (स्थानीय गुन्हे अन्वेषण शाखा), पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील (कवठेमहांकाळ पोलीस ठाणे) व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला.

तांत्रिक व भौतिक पुराव्यांचा अभाव असल्याने पोलीसांनी गुप्त बातमीदारांचे जाळे वापरले. पोलीसांना माहिती मिळाली की आरोपी किरण गडदे सध्या लक्ष्मीनगर, मालगाव येथे लपून बसला आहे. पोलीस पथकाने मालगाव येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

हेदेखील वाचा: sangli crime news: सांगलीत घातक शस्त्रांवर पोलिसांचा बडगा: वर्षभरात 306 हत्यारे जप्त; 162 जणांना अटक

अनैतिक संबंधातून खून
प्राथमिक चौकशीत आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, कौशल्यपूर्ण तपासानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अनैतिक संबंधांवरून वाद झाल्यामुळे आरोपीने २३ मार्च २०२५ च्या रात्री पीडित महिलेचा गळा आवळून खून केल्याचे कबूल केले.

पोलिसांकडून प्रशंसा
या क्लिष्ट खूनप्रकरणाचा कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीला अटक केल्यामुळे पोलिसांच्या कार्याची प्रशंसा करण्यात येत आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. कवठेमहांकाळ पोलीस ठाणे पुढील तपास करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed