सारांश: सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सांगलीवाडी येथे कारवाई करत ११ किलो ३१४ ग्रॅम भांगेच्या गोळ्यांसह दिपक केवट याला अटक केली. या कारवाईत २,२७,२८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी हा उत्तरप्रदेशहून भांगेचा साठा विक्रीसाठी आणत असल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपास sangli शहर पोलीस ठाणे करीत आहे.
सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) :
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, sangli यांनी रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने केलेल्या विशेष मोहिमेत ११ किलो ३१४ ग्रॅम वजनाच्या भांगेच्या गोळ्यांसह एकाला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत २,२७,२८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाईचा तपशील
दि. १५ मार्च २०२५ रोजी सकाळी ११:१५ वाजता सांगलीवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दिपक राधेशाम केवट (वय २६, रा. सांगलीवाडी, मूळ रा. उत्तरप्रदेश) हा सांगलीवाडीतील स्क्रॅप दुकानाजवळ भांगेच्या गोळ्यांची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून संशयितास रंगेहाथ पकडले.
जप्त केलेला मुद्देमाल
– ११ किलो ३१४ ग्रॅम भांगेच्या गोळ्या (किंमत : २,२६,७८० रुपये)
– ५००/- रुपये रोख रक्कम
गुन्हा दाखल व पुढील तपास
याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम १४, ६५ (अ), ६५ (ब), ६५ (ई), ६५ (जी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी sangli शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास sangli शहर पोलीस ठाणे करत आहे. sangli crime news