सांगली परिसरातील बातम्या

सांगली परिसरातील बातम्या: कवठेमहांकाळ तालुक्यात कारने पेट घेतला; तरुण होरपळून मृत्यू / सांगलीतील उद्योजकाची अठरा लाखांची फसवणूक: मुंबईच्या सात जणांवर कुपवाड पोलिसांत गुन्हा दाखल

सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली जिल्ह्यातील बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील टोलनाक्याजवळ सीएनजी मोटारीने पेट घेतल्याने एका युवकाचा होरपळून मृत्यू झाला. गणेश दत्तात्रय माळवदे (वय २४, रा. कवठेमहांकाळ) असे त्याचे नाव आहे. हा अपघात रविवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या दरम्यान घडला. या अपघाताची नोंद कवठेमहांकाळ पोलिसांत रात्री दाखल झाली.

सांगली परिसरातील बातम्या

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, की गणेश हा बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील एका पेट्रोल पंपावर आपल्या मोटारीत (एमएच ०२, सीझेड ३५२९) सीएनजी गॅस भरण्यासाठी आला होता. मात्र तेथील पंपावर सीएनजी उपलब्ध नसल्याने अलकूड (एम) येथील पंपावर निघाला होता.

हे देखील वाचा: nashik crime news: नाशिक: प्रेमप्रकरणातून शिक्षिकेची हत्या: 32 वर्षीय आरोपीस जन्मठेप

टोल नाक्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर त्याच्या गाडीने अचानक पेट घेतला. याचवेळी पुढे उभा असलेल्या कंटेनरजवळ येऊन त्याची गाडी उभी राहिली. पेट घेतल्याने व वाहनाचा दरवाजा लॉक असल्याने गणेशला बाहेर येता आले नसल्याने तो पूर्णपणे जळाला. त्याच्या हाडाचा सांगाडा फक्त वाहनामध्ये राहिला. दरम्यान, ज्वाली बोर्ड येथील पाण्याच्या बंबाने आग आटोक्यात आली. मात्र, वाहन जळून खाक झाले होते. घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिसांत झाली असून, अधिक तपास सुरू आहे.

हे देखील वाचा: Sangli accident news: शनिवार ठरला सांगली जिल्ह्यासाठी घातक: विविध अपघातांत 9 ठार; जत तालुक्यातील सात जणांचा समावेश

सांगलीतील उद्योजकाची अठरा लाखांची फसवणूक: मुंबईच्या सात जणांवर कुपवाड पोलिसांत गुन्हा दाखल

सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
सांगलीतील कुपवाड औद्योगिक वसाहतीतील राजधानी युनिव्हर्सल फॅब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड या टेक्स्टाईल व गारमेंट कारखाना मालकाची मुंबईतील सातजणांनी संगनमत करून १८ लाख ९५ हजारांची फसवणूक केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद झाली असून पोलिसांत सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सांगली परिसरातील बातम्या

यामध्ये संशयित अमरित जमनु आहुजा, विशाल लुल्ला (दोघे लोअर परेल पश्चिम मुंबई), अमन मुजावर, संतोष सुद, रविकांत नार्वेकर, राम यादव तसेच अंकिता (पूर्ण नावे व पत्ता माहीत नाही) यांचा समावेश आहे. त्यांच्या विरोधात प्रवेश पवनकुमार कोचेटा ( वय ३३, माधवनगर रोड, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. कारखान्यामध्ये मालाची ऑर्डर देऊन मालाची जावक झाल्यानंतर फसवणूक करण्याचा उद्देश ठेवून उर्वरित बिलाची अठरा लाख ९५ हजार ७२६ रुपयांची रक्कम देण्यास टाळाटाळ करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हे देखील वाचा: महाराष्ट्र मंत्रिमंडळ: फडणवीस यांच्याकडे गृह, शिदे नगरविकास, अजित पवार यांच्याकडे अर्थ मंत्रालय; महायुतीचे अखेर 8 दिवसांनंतर खाते वाटप जाहीर; जाणून घ्या कोणाला मिळाले कोणते खाते…

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी प्रवेश कोचेटा यांच्या मालकीचा कुपवाड वसाहतीत राजधानी युनिव्हर्सल फॅब्रिक्स नावाने टेक्स्टाईल व गारमेंट कारखाना आहे. या कारखान्यात संशयित सातजणांनी मिळून जानेवारी ते जून २०२४ या कालावधीत कारखान्यातील टेक्स्टाईल मालाच्या १८ लाख ९५ हजार ७२६ रुपयांची उत्पादनाची ऑर्डर दिली होती. त्या मालाची कंपनीने पूर्तताही केली होती. माल पोहोचल्यानंतर संशयितांनी फिर्यादी पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने पैसे मागण्यासाठी फिर्यादी संशयितांच्या ऑफिसमध्ये गेले.

त्यावेळी संशयित आणि फिर्यादीस वाईट बोलून पैसे देत नसल्याचे सांगून जिवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार कुपवाड (सांगली) पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास कुपवाड पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !