सुधाकर खाडे

सुधाकर खाडे यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार

मिरज,(आयर्विन टाइम्स वृत्तसेवा):
भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे (वय ५२, रा. मिरज) यांचा शनिवारी सकाळी निर्घृण खून करण्यात आला. खाडे यांच्यावर मिरज-पंढरपूर रस्त्यावरील वादग्रस्त जमिनीत कुंपण घालण्यासाठी गेलेल्या वेळी कुऱ्हाडीने सपासप वार करण्यात आले. घटनास्थळी जमिनीच्या हक्कावरून झालेल्या वादात त्यांचा खून झाला, त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सुधाकर खाडे

घटना कशी घडली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधाकर खाडे यांनी पंढरपूर रस्त्यावरील सुमारे पावणेचार एकर जमीन विकसनासाठी घेतली होती, मात्र या जमिनीवर मालकी हक्काबद्दल त्यांचं स्थानिक युवराज लक्ष्मण चंदनवाले यांच्यासोबत वाद सुरू होता. शनिवारी सकाळी खाडे त्यांच्या कामगारांसह या जमिनीवर कुंपण मारण्यास गेले असता, दोघांमध्ये जोरदार वाद झाला. अचानक, चंदनवाले याने खाडे यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केला. हा वार अतिशय वर्मी बसल्याने खाडे जागीच कोसळले. त्यांना तत्काळ रुग्णालयात हलवले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हे देखील वाचा: athani crime news: अथणीत पती-पत्नीचा मृतदेह घरात आढळला: घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

पोलिसांची तातडीची कारवाई

घटनेची माहिती मिळताच, पोलिस अधीक्षक संदीप घुगे आणि उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करण्यात आला. संशयित चंदनवाले याला तात्काळ अटक करण्यात आली असून, महात्मा गांधी चौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सुधाकर खाडे

राजकीय पटलावर पडलेलं परिणाम

मिरजेच्या राजकारणात सुमारे वीस वर्षांपासून सक्रिय असलेले सुधाकर खाडे सुरुवातीला शिवसेना आणि मनसेसोबत होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि स्टार्टअप आघाडीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली. राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी अवैध धंद्याविरोधात लढा दिला होता. याशिवाय, मिरज अर्बन बँकेतील वाद, आणि काही अन्य प्रकरणांमध्येही त्यांचं नाव चर्चेत आलं होतं. त्यांचा समाजसेवेतील वाटा मोठा असून, सध्या ते ‘मी मिरज फाऊंडेशन’च्या माध्यमातून समाजकार्य करत होते.

हे देखील वाचा: Sangli crime news: सांगलीत विवाहितेचा छळ करून सामूहिक अत्याचार: अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन मूल होत नसल्याच्या कारणावरून पती, दीर आणि मांत्रिकाचे घृणास्पद कृत्य; 3 जणांना अटक

खून मोबाईल व्हिडिओत कैद

खाडे यांच्या हत्येचा प्रसंग एका मोबाईल व्हिडिओत कैद झाल्याचे समजते. या व्हिडिओमध्ये खाडे वादग्रस्त जमिनीत प्रवेश करताना आणि नंतर झालेल्या घटनाक्रमाची दृश्ये दिसतात. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामुळे हा खून अधिक चर्चेत आला आहे.

सुधाकर खाडे यांच्या हत्येमुळे सांगली जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात घडलेल्या या घटनेचे राजकीय परिणाम काय असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा: sangli crime news: सांगलीत 10 किलो गांजा जप्त, दोन आरोपी अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची यशस्वी कामगिरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !