महिला मतदारांसाठी (women voters) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चर्चेत
सांगली,(आयर्विन टाइम्स):
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांना (women voters) आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी आर्थिक मदतीची मोठी आश्वासनं दिली आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या निवडणुकीच्या प्रचाराचा मुख्य विषय बनली आहे. महिलांच्या समस्या ओळखून सत्ताधारी महायुती सरकारने प्रतिमहिना 1500 रुपये देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय सत्तेवर आल्यानंतर आर्थिक मदतीत वाढ करून 2100 रुपये देण्याचं आश्वासनही दिलं आहे.
महाविकास आघाडीची महिला मतदारांसाठी ‘महालक्ष्मी योजना’
तसेच, महाविकास आघाडीने महिलांना अधिक मदत देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांनी “महालक्ष्मी योजना” सादर केली असून, या योजनेद्वारे सत्तेत आल्यानंतर महिलांना प्रतिमहिना 3000 रुपयांची आर्थिक मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे. महाविकास आघाडीचे हे आश्वासन महिला मतदारांमध्ये लोकप्रिय होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन या योजनेची घोषणा केली आहे.
याशिवाय, वंचित बहुजन आघाडीने महिलांसाठी आणखी मोठं आश्वासन दिलं आहे. त्यांनी प्रतिमहिना 3500 रुपयांची मदत देण्याचं जाहीर करून women मतदारांचं लक्ष वेधलं आहे. सत्तेत आल्यानंतर महिलांना दर महिना हा निधी मिळवून देण्याचा वंचितचा दावा आहे.
निवडणुकीपूर्वीची तयारी
महायुती सरकारने जुलै महिन्यात लाडकी बहीण योजना सुरू केली असून, ऑगस्टपासून पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळू लागला आहे. त्याचबरोबर, नोव्हेंबरमध्ये आचारसंहितेमुळे महिलांना नोव्हेंबर महिन्याचं अनुदान ऑक्टोबरमध्येच देण्यात आलं आहे. आता महायुतीने महिलांसाठी २१०० रुपये दरमहा देण्याचं आश्वासन दिलं आहे.
कोण किती देणार? – पक्षांनुसार आश्वासित मदतीचा आढावा
1. महायुती – प्रतिमहिना 2100 रुपये.
2. महाविकास आघाडी – महालक्ष्मी योजना द्वारे प्रतिमहिना 3000 रुपये.
3. वंचित बहुजन आघाडी – प्रतिमहिना 3500 रुपये.
women voters मतदान कोणाच्या पारड्यात जातं आणि या आश्वासनांनुसार महिलांना (women voters) आर्थिक मदत मिळणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ( ट्रेंडिंग न्यूज टीम)