गगनबावडा तालुक्यातील रिसॉर्टच्या मालकासह ३१ जणांवर गुन्हा
कोल्हापूर,(आयर्विन टाइम्स वृत्तसेवा):
गगनबावडा तालुक्यातील आंबेवाडी येथील नयनील फार्म रिसॉर्टमध्ये बेकायदेशीरपणे चालवलेल्या डान्सबारवर गगनबावडा पोलिसांनी बुधवारी रात्री छापा (Police raid) टाकला. या छाप्यात ४ लाख ५१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, रिसॉर्टच्या मालकासह ३१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छाप्यात आढळलेले मुद्देमाल
गोपनीय माहितीनुसार, गगनबावडा पोलिसांनी आंबेवाडी येथील नयनील फार्म रिसॉर्टवर बुधवारी रात्री सुमारे नऊ वाजता छापा (Police raid) टाकला. या छाप्यात पोलिसांना रिसॉर्टमध्ये अवैध मद्यपान, नृत्य आणि इतर आपत्तिजनक साहित्य सापडले. नृत्यांगना तोकड्या कपड्यांत अश्लील हावभाव करताना तरुण मद्यधुंद अवस्थेत होते. या छाप्यात पोलिसांनी साउंड सिस्टीम, दारूचा साठा, मोबाईल आणि अन्य साहित्य जप्त केले, ज्याची किंमत एकूण ४,५१,१०० रुपये आहे.
हे देखील वाचा: Shocking: 4 ऊसतोड मजूर सीना नदीत बुडाले; दीपावलीच्या पूर्वसंध्येला गावावर शोककळा
गुन्हा दाखल केलेले आरोपी
या कारवाईत पोलिसांनी (Police) ३१ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींमध्ये पार्टीतील मद्यधुंद तरुण, नृत्यांगना, मदतनीस तसेच रिसॉर्टचा मालक देखील आहे. आरोपींमध्ये निखिल नंदकुमार सूर्यवंशी (वय ३८), शैलेंद्र सुरेश गोडबोले (५०), शेखर सुखदेव पाटील (३७), हरीश लक्ष्मण चौगले (२८), राजवर्धन रमाकांत साळोखे (३७), सुहास दत्तात्रय घोरपडे (३८), रोहित नंदकुमार विरभद्रे (३८), अमित रघुनाथ घोलप (३८), सतीश शिवाजी पाटील (३७), मंगेश अशोकराव ढोबळे (३५), रोहन संजय माळी (३३), जितेंद्र पांडुरंग पाटील (४१),
अतिश अशोक हिराणी (३४), मोहन मारुतीराव हजेरी (३६), रोहन जयसिंग निकम (४०), किरण राजाराम सूर्यवंशी (३८), मुदस्सर अस्लम रूकडीकर (३८), गणेश दशरथ जाधव (४०) यांचा समावेश आहे. तसेच, पार्टीतील ९ नृत्यांगना, मदतनीस परशुराम दगडू पाटील (२४), पांडुरंग बजरंग पाटील (२६), प्रकाश विलास पाटील (२३) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय रिसॉर्ट मालक रूपेश सुर्वे यांच्यावरही विनापरवाना जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Police raid: छाप्याचे पोलिस पथक आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन
ही कारवाई कोल्हापूर पोलिस (Police) अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक जयश्री जाधव आणि शाहूवाडी विभाग उपविभागीय पोलिस अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गगनबावडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल श्रीकांत मामलेकर, अमोल तेली, मानसिंग सातपुते, संदीप पाटील, सागर पाटील, दिगंबर पाटील आणि चालक अशोक पाटील यांचा पथकात समावेश होता.
अवैध पार्टीवर पोलिसांची करडी नजर
गगनबावडा परिसरात अवैध पद्धतीने चालणाऱ्या पार्ट्यांवर पोलिसांनी नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने ही कारवाई केली. या छाप्यामुळे परिसरात अवैध पार्ट्या आणि बेकायदेशीर क्रियाकलापांना चाप बसणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.