जतमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

जत, (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा):
जत तालुक्यातील शेगाव येथे गांजा वाहतूक करत असताना पोलिसांनी ३० हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात परशुराम गणपतराव काळे (वय ४०, रा. शेगाव) यास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केली.

प्रकरणाचा तपशील
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील आप्पा नावाच्या इसमाकडून गांजा घेऊन शेगावमधील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ शेगाव-वाळेखिंडी रस्त्यावर वाहतूक करताना शनिवारी दुपारी साडेतीन वाजता पोलिसांनी परशुराम गणपतराव काळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पांढऱ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या पिशवीत ९४० ग्रॅम वजनाचा, हिरवट- काळसर रंगाचा गांजा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे ३०,००० रुपये आहे.

हे देखील वाचा: Kavthemahankal crime news : कवठेमहांकाळ तालुक्यात अनैतिक संबंधातून चुलत भावाकडून बहिणीचा खून; पोलिसांनी उघडकीस आणला खून; 28 वर्षीय आरोपीला अटक

कायदेशीर कारवाई
संशयितावर गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस नाईक सोमनाथ कुमार गुंडे यांनी जत पोलीस ठाण्यात काळे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांची सतर्कता
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यक्षमतेमुळे जत तालुक्यात गांजासारख्या अमली पदार्थांच्या वाहतुकीवर आळा बसला आहे.

जत

हातात विळा घेऊन फिरणाऱ्या तरुणास पोलिसांनी केली अटक

जत तालुक्यातील निगडी बुद्रुक येथे एका तरुणास हातात विळा घेऊन भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी उमदी पोलिसांनी अटक केली आहे. प्रविण भाऊसाहेब म्हेत्रे (वय २०, रा. गिरगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

हे देखील वाचा: Kadegaon crime news : कडेगांव पोलिसांची कठोर कारवाई; प्रदीप मंडले टोळीला सांगली आणि सातारा जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार

प्रकरणाचा तपशील
प्रविण म्हेत्रे हा मोटारसायकलवरुन हातात मोठा, धोकादायक विळा घेऊन फिरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा विळा ३३ इंच लांबीचा, ३ सेमी रुंदीचा आणि पुढच्या बाजूस निमुळता आकाराचा असल्याचे तपासात आढळले. म्हेत्रेने कोणतेही सबळ कारण किंवा परवाना न घेता हा विळा हातात धरला होता. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

पोलिसांची कारवाई
संशयित म्हेत्रे यास उमदी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून २०० रुपये किमतीचा लोखंडी विळा आणि मोटारसायकल (क्रमांक एम एच १० डी एस ४७२६) जप्त करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस नाईक सोमनाथ कुमार गुंडे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

शस्त्रबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद
हातात धोकादायक शस्त्र बाळगून दहशत निर्माण केल्याबद्दल शस्त्रबंदी कायद्यांतर्गत उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा: umadi crime news: उमदी पोलिसांची धडक कारवाई; बेकायदेशीर जुगार खेळणाऱ्या आरोपींना रंगेहाथ पकडले; 5,24,134 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !