जत तालुक्यातील कोंतेवबोबलाद

संशयितांना अटक न केल्यास जत येथे उपोषणास बसण्याचा नातेवाईकांचा इशारा

जत/ आयर्विन टाइम्स
कोंतेवबोबलाद (ता. जत) येथे दोन युवकांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या नातेवाईकांनी उमदी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. मात्र, या घटनेला दीड महिना उलटूनही पोलिसांनी अद्याप संशयितांना अटक केलेली नाही. याबाबत लक्ष्मण खांडेकर यांनी पत्रकार बैठकीत माहिती दिली आणि आठ दिवसांच्या आत संशयितांना अटक न केल्यास जत येथील पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.

जत तालुक्यातील कोंतेवबोबलाद

तक्रारीनुसार, ३० ऑगस्ट रोजी संशयित बेळयानसिद्ध शेंडगे व पवन सुभाष शेंडगे या दोघांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. यापूर्वी त्यांनी मुलीची छेड काढल्याची तक्रार देखील नोंदवली होती, त्यामुळे त्यांनी रागाच्या भरात हे कृत्य केल्याचा आरोप आहे. मात्र, या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.

हे देखील वाचा: sangli crime news: सांगलीत खुनाचा प्रयत्न आणि गंभीर दुखापत प्रकरणी दोन आरोपींना अटक; 4 दिवसांची पोलीस कोठडी

खांडेकर यांनी सांगितले की, अपहरण करणारे युवक आणि त्यांचे कुटुंबीय राजकीय आणि गुंड प्रवृत्तीचे असल्यामुळे मुलीच्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. त्यांनी उमदी पोलिसांना तपास जलदगतीने करून मुलीला ताब्यात देण्याची विनंती केली आहे. याचबरोबर, पोलिसांनी आठ दिवसांत कारवाई न केल्यास पोलीस उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस प्रमुख आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

संपूर्ण  तालुक्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले असून, पोलिसांची पुढील कारवाई काय असेल याकडे सर्वांची नजर आहे.

हे देखील वाचा: Best wishes: हर्षदीप चौखंडे याचा जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक: जत तालुका शिक्षक समितीकडून सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !