Fake SBI bank news

बनावट एसबीआय बँक (SBI bank): देशभरात खळबळ

रायपूर/ आयर्विन टाइम्स

छत्तीसगडमधील सक्ती जिल्ह्यातील छापोरा गावात बनावट एसबीआय बँक (SBI bank) उघडून लोकांना फसवण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हेगारांनी भारतीय स्टेट बँकेची हुबेहूब शाखा उभारून लोकांच्या विश्वासाला गंडा घालण्याचे धाडस केले. या बँकेच्या स्थापनेपासून अवघ्या दहा दिवसांतच पोलिस आणि एसबीआय अधिकाऱ्यांनी या फसवणुकीचा पर्दाफाश केला.

bank
symbolic image

बनावट शाखेची व्यूहरचना

गुन्हेगारांनी या बनावट (SBI bank) बँकेसाठी गावात गाळे भाड्याने घेतले होते. या शाखेला पूर्णपणे वास्तववादी स्वरूप देण्यासाठी त्यांनी नवे फर्निचर, अधिकृत कागदपत्रे, आणि कार्यरत बँक काऊंटरसह इतर सर्व प्रकारच्या आवश्यक गोष्टींची व्यवस्था केली होती. इतकेच नव्हे तर, त्यांनी बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांची नियुक्तीही केली. या तरुणांना मार्केटिंग अधिकारी, संगणक ऑपरेटर यासारख्या विविध पदांवर नोकरी देण्यात आली, ज्यासाठी बँकेच्या SBI bank) लेटरहेडवर बनावट ऑफर लेटर दिली गेली.

हे देखील वाचा: crime news : 5 वर्षीय मुलीवर अत्याचार करून खून: मृतदेहाची दुर्गंधी लपवण्यासाठी आरोपींनी फिनायल व परफ्यूमचा केला वापर

गुप्त माहितीने उघडकीस आलेला घोटाळा

२७ सप्टेंबर रोजी, अजय कुमार अग्रवाल नावाच्या स्थानिकाला या बँकेवर संशय आला. त्याने तत्काळ डाबरा येथील एसबीआय शाखेच्या व्यवस्थापकाला याबाबत माहिती दिली. या माहितीच्या आधारे, पोलिस आणि एसबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी छापोरा गावातील बँक शाखेत चौकशी केली. चौकशीदरम्यान, या बँकेचे अस्तित्वच बनावट असल्याचे उघड झाले. वरिष्ठ पोलीस अधिकारी राजेश पटेल यांच्या म्हणण्यानुसार, बँकेतील (SBI bank) कर्मचारी आणि व्यवस्थापक सुद्धा बनावट निघाले.

bank

आरोपींनी केलेली फसवणूक

तपासात, रेखा साहू, मंदिर दास आणि पंकज या तीन आरोपींसह अन्य एका व्यक्तीची ओळख पटवण्यात आली आहे. हे सर्वजण बँकेचे व्यवस्थापक असल्याचे भासवत होते. गावकऱ्यांना खात्री पटवण्यासाठी या आरोपींनी अत्यंत व्यवस्थितपणे बनावट बँकेची स्थापना केली होती. या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. बँकेचा पर्दाफाश लवकर झाला नसता, तर कोट्यवधींची फसवणूक होण्याची शक्यता होती, अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.

हे देखील वाचा: Kiara Advani in New Action Role: कियारा आडवाणी नव्या ॲक्शन भूमिकेत: ‘वॉर 2’साठी तयारी सुरू

बेरोजगारांना बनवले शिकार

या बनावट बँकेच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना लक्ष्य केले गेले. त्यांना नोकरीची आशा दाखवून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यात आले. युवकांना २ ते ६ लाख रुपयांची लाच देऊन नोकरी लागेल, असा विश्वास दिला गेला. मात्र, बँकच बनावट निघाल्यामुळे आता या पीडितांना आर्थिक नुकसानीबरोबरच कायदेशीर अडचणींचा देखील सामना करावा लागत आहे.

छत्तीसगडमधील हा फसवणुकीचा प्रकार हे दर्शवतो की, गुन्हेगार किती सफाईदारपणे लोकांच्या विश्वासाला गंडा घालू शकतात. मात्र, यामधून बोध घेऊन सामान्य नागरिकांनी अधिक सजग राहणे आवश्यक आहे. कोणतीही बँक ( bank) किंवा आर्थिक संस्था असली तरी ती अधिकृत असल्याची खात्री करणे, हे ग्राहकांचे कर्तव्य आहे.

हे देखील वाचा: Shocking: शाळेच्या भरभराटीसाठी इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा नरबळी ; या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !