कर्नाटकचे मुख्यमंत्री

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याबरोबर होणार प्रलंबित प्रश्नांवर चर्चा

आयर्विन टाइम्स / जत
जत तालुक्यातील कन्नड भाषिकांशी खास संवाद साधण्यासाठी तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उदघाटन सोहळ्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह कर्नाटकचे सांस्कृतिक मंत्री शिवराज तंगडगी, मंत्री तथा विजयपूरचे पालकमंत्री एम. बी. पाटील, मंत्री शिवानंद पाटील सोमवारी (दि. ३०) सकाळी अकरा वाजता गुड्डापूर येथे येणार असल्याची माहिती कर्नाटक शासन सिमाभाग प्राधिकरणाचे अध्यक्ष सोमण्णा बेविनामरदा, जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कर्नाटकचे प्रकाश मत्तेहळळी उपस्थित होते.

कर्नाटकचे मुख्यमंत्री
साभार: wikipedia

सोमण्णा बेविनामरदा म्हणाले, महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कन्नड व मराठी द्विभाषिक यांचे प्रश्न समजावून घेवून तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे श्री क्षेत्र गुड्डापूर येथे येणार आहेत. श्री. दानम्मा देवीचे दर्शन घेतल्यानंतर सकाळी अकरा वाजता कर्नाटक शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

हे देखील वाचा: smartphone Vivo’s ‘V40E’: विवोचा ‘व्ही ४० इ’ स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर

नाटकासह अन्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कन्नड भाषेचा विस्तार करणे, कन्नड भाषिकांची संस्कृतीची माहिती व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र- कर्नाटक सिमेवर असलेल्या जत तालुक्यातील कन्नड व मराठी भाषिकामध्ये संवाद साधून त्यांना कर्नाटक शासनाकडून कोणत्या प्रकारे मदत करता येईल हे ही या माध्यमातून जाणून घेण्यात येणार आहे.

आ. विक्रमसिंह सावंत म्हणाले, महाराष्ट्र व कर्नाटक सिमाभागातील लोकांना आजही अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. त्यांच्या समस्येचे निराकारण करण्याच्या दृष्टीने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा हा दौरा निश्चितच फलदायी ठरेल. कर्नाटक शासन गडीनाडला सध्या पाच टक्के आरक्षण देते त्याऐवजी १० टक्के आरक्षण द्यावे, द्विभाषकांना आरोग्य व शैक्षणिक सवलतीत पाच टक्के आरक्षण द्यावे, त्यांच्या निवासाची व्यवस्था करावी अशी मागणी आपण कर्नाटच्या मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत.

हे देखील वाचा: Important Skills / कौशल्य : ग्रॅज्युएशन करण्यापूर्वी शिकायला हव्यात अशा 5 महत्त्वाच्या कौशल्याच्या गोष्टी

तुबची बबलेश्वर योजनेचा करणार पाठपुरावा

कर्नाटकातील तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी सायपन पद्धतीने जत पूर्व भागात येवू शकते तसेच ते पाणी पुढे कर्नाटकातील चडचण तालुक्यातील सात गावांना सहज जावू शकते हे सर्व्हेत स्पष्ट झाले आहे. मागील दोन वर्षात हे पाणी जतला अप्रत्यक्ष आलेही आहे. सध्या संख तलावात तुबची बबलेश्वरचे पाणी सोडण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने ज्याप्रमाणे २०१६ पासून कर्नाटकला माणुसकीच्या दृष्टीकोनातून पाणी दिले त्याच पद्धतीने कर्नाटकने जतला पाणी द्यावे ही आग्रही मागणी कर्नाटकच्या कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे करणार असल्याचे आ. विक्रमसिंह सावंत यांनी सांगितले.

हे देखील वाचा: jat crime news : जत तालुक्यातील बसरगीत चोरट्यांचा धुमाकूळ: जिल्हा बँक फोडण्याचा प्रयत्न, 8 घरे फोडली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !