हत्ती आणि चाणाक्ष घुबड

दोन मित्र: हत्ती आणि घुबड

चंदनवनात एक विशाल आणि सुंदर चंदनाचे झाड होते. त्या झाडावर एका हुशार घुबडाने आपलं घर बनवलं होतं. रात्रीच्या वेळी इतर प्राणी झोपेत असायचे, पण हा घुबड मात्र जागा असायचा. त्याच झाडाखाली दररोज एक भला मोठा हत्ती येऊन रात्रीची विश्रांती घ्यायचा. सुरुवातीला घुबड आणि हत्ती एकमेकांकडे दुर्लक्ष करत, पण हळूहळू त्यांच्या मधले अंतर कमी होत गेले, आणि दोघांत घट्ट मैत्री निर्माण झाली.

हत्ती आणि चाणाक्ष घुबड

नवा दिवस, नवे संकट

एक दिवस हत्तीला काहीतरी वेगळं करायवंस वाटलं, म्हणून तो चंदनवनातून बाहेर पडला आणि नवीन अन्नाच्या शोधात लांब निघून गेला. तो चालत चालत एका घनदाट जंगलात पोहचला, तिथे मोठी मेजवानी सुरू होती. ही मेजवानी काही साध्या प्राण्यांची नव्हे, तर भयानक राक्षसांची होती. त्या जंगलात राक्षसांचा राजा आपल्या सेवकांसह दावत मांडून बसला होता.

हत्तीला पाहताच राक्षसांचा राजा जोरात ओरडला, “हा तोच आहे! हा तोच आहे!” त्याच्या आवाजाने सगळे राक्षस स्तब्ध झाले. सेवकांनी आश्चर्याने विचारलं, “महाराज, हा कोण आहे? तुम्ही असं का म्हणताय?”

हे देखील वाचा: Children’s story 4 : स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा / Believe in your own abilities

राक्षसराज गंभीर स्वरात म्हणाला, “काल रात्री मला एक स्वप्न पडलं होतं. स्वप्नात मी एका भव्य हत्तीचा भोजन केलं. हा हत्ती अगदी त्याच्यासारखाच दिसतो! याला पकडा, मी माझं स्वप्न सत्यात आणणार आहे!”

हत्तीचं संकट

सेवकांनी हत्तीला पकडलं. बिचारा हत्ती घाबरून गेला होता. तो एवढा घाबरला होता की त्याने स्वतःला सोडवायचा प्रयत्नही केला नाही. तो विचार करत होता की आता त्याचं जीवन संपलंच. राक्षसराज आनंदात होता, कारण त्याचं स्वप्न पूर्ण होणार होतं.

राक्षसराजाने आपल्या राणीला बोलावलं आणि तिच्या सोबत हत्तीसमोर उभा राहिला. हत्तीच्या मनात भीतीचं वादळ होतं, त्याला काही सुचत नव्हतं.

हत्ती आणि चाणाक्ष घुबड

चाणाक्ष घुबडाची युक्ती

दरम्यान, चंदनवनात घुबड आपल्या मित्राची वाट पाहत होतं. हत्ती नेहमी झाडाखाली वेळेवर येत असे, पण आज तो कुठेच दिसत नव्हता. घुबडाला काहीतरी अघटित घडलं असावं असं वाटू लागलं. घुबडाने उडत-उडत हत्तीला शोधायला सुरुवात केली. शोधता शोधता ते त्या ठिकाणी पोहोचलं, जिथे राक्षसांनी हत्तीला पकडलं होतं.

घुबडाने तिथे घडणाऱ्या गोष्टी ऐकल्या आणि त्याला सगळा प्रकार समजला. घुबडाने आपल्या मित्राला वाचवायचं ठरवलं. तो चाणाक्ष होता आणि त्याला माहीत होतं की त्याला काहीतरी युक्ती करावी लागेल.

हे देखील वाचा: विजेयचा अहंकार: मुलांसाठी गोष्ट 3 / Vijay’s ego: A story for children

घुबड हत्तीच्या डोक्यावर बसलं आणि जोरजोरात ओरडायला लागलं, “हा तोच आहे! हा तोच आहे!”

राक्षसराजाने चिडून विचारलं, “तू कोणाबद्दल बोलतोस?”

घुबडाने शांतपणे उत्तर दिलं, “राणीबद्दल. काल रात्री मला स्वप्न पडलं की मी राक्षसराणीसोबत लग्न केलं आहे. आता माझं स्वप्न सत्यात आणा, आणि माझं लग्न राणीशी लावा.”

हे ऐकताच राक्षसराणी घाबरून म्हणाली, “मी एका घुबडाशी लग्न कसं करू शकते?” तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती.

राक्षसराजाचं शहाणपण

राणीला एवढं घाबरलेलं पाहून राक्षसराजाच्या लक्षात आलं की घु-बड चाणाक्षपणे त्याला मूर्ख बनवत आहे. त्याने हसत म्हणलं, “तुझं लग्न होणार नाही, कारण ते फक्त घु-बडाचं स्वप्न होतं. स्वप्नांना खरं धरलं जातं का?”

मग राक्षसराज पुढे म्हणाला, “आणि म्हणूनच हत्तीचंही काही होणार नाही. कारण मी स्वप्नात हत्ती खाल्ला होता, पण वास्तविक जीवनात ते करणार नाही.”

हे ऐकून सगळ्यांनी हसून मान हलवली.

हे देखील वाचा: Kindness of King / दिलदारपणा: मुलांसाठी गोष्ट 1: गोष्टीचे नाव: चंद्रशेखर राजाचा दिलदारपणा

मित्राची यशस्वी सुटका

राक्षसराजाच्या आदेशानुसार सेवकांनी हत्तीला सोडलं. हत्तीने सुटल्याबरोबर घु-बडाकडे पाहून त्याचे आभार मानले आणि दोघांनी एकत्र परत चंदनवनात जाण्यास सुरुवात केली.

या घटनेनंतर हत्ती आणि घु-बडाची मैत्री आणखी घट्ट झाली. हत्तीने आपला जीव वाचवणाऱ्या मित्राचे उपकार कधीही विसरले नाही. आणि घु-बडानेही आपल्या चातुर्याने हत्तीला संकटातून सोडवल्याचा अभिमान बाळगला.

दोघं पुन्हा चंदनवनात सुखानं आणि आनंदानं राहू लागले.
(Dreamy elephants and clever owl)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed