Valwa taluka murder news

तरुणी आठवड्यापासून होती बेपत्ता; आरोपी प्रियकराला अटक

आयर्विन टाइम्स / नागपूर
लग्नासाठी दबाव आणल्याने २४ वर्षीय तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह जंगलात पुरल्याची घटना मंगळवारी उघड झाली. या प्रकरणात मानकापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे नाव महेश वळसकर (५७) असून, तो न्यू सोमवारी पेठ येथील रहिवासी आहे.

तरुणी

महेशने खुनाची कबुली दिली असून, बुधवारी पोलिसांनी जंगलातून तरुणीचा मृतदेह बाहेर काढला. मृत तरुणीचे नाव प्रिया बागडी ऊर्फ प्रिया गुलक (२९) आहे. तिच्या कुटुंबात आई आणि दोन बहिणी आहेत. मोठ्या बहिणीचे लग्न झालेले असून, प्रिया आणि तिची लहान बहीण आईसोबत राहत होत्या. कौटुंबिक वादामुळे प्रिया गेल्या सहा वर्षांपासून फरस, गोधनी येथे एकटी राहत होती. ती १५ ऑगस्टपासून अचानक बेपत्ता झाली होती.

हे देखील वाचा: sangli crime news : सांगली जिल्ह्यातील एका प्राथमिक शाळेतील 3 विद्यार्थिनींचा विनयभंग: आईच्या तक्रारीवरून शिक्षकावर गुन्हा नोंद

तिच्या आईने तिचा फोन बंद आल्यामुळे खोलीवर जाऊन पाहिले असता, कुलूप लावलेले आढळले. शेजाऱ्यांकडे चौकशी केल्यावर समजले की प्रिया एक आठवडा घरी आली नव्हती. त्यामुळे आईने मानकापूर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.

पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्या सूचनेनुसार प्रियाचे शेवटचे लोकेशन तपासले असता, ते रामटेक येथील एका रिसॉर्टमध्ये मिळाले. हे रिसॉर्ट महेश वळसकर यांच्या मालकीचे आहे. गेल्या आठ वर्षांपासून महेश आणि प्रियाची मैत्री होती, आणि ती नेहमी महेशच्या रिसॉर्टमध्ये मुक्कामी राहत असे.

हे देखील वाचा: Electric Vehicle Safety / इलेक्ट्रिक वाहनांची सुरक्षितता: पावसाळ्यात आणि नंतरही काळजी आवश्यक

लग्नासाठी दबाव आणि हत्येची कबुली

महेशची दुधाची भूकटी तयार करणारी कंपनी होती, जिथे प्रिया नोकरीला होती. दोघांची ओळख तेव्हापासूनच झाली होती आणि ते एकमेकांचे मित्र बनले. तीन दिवसांपूर्वी प्रिया महेशच्या रिसॉर्टवर गेली आणि तिने त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणला. यामुळे महेशने तिचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह रिसॉर्टपासून तीन किलोमीटर अंतरावर जंगलात पुरला.

बदनामीच्या भीतीने आत्महत्येचा प्रयत्न

प्रियाच्या आईने महेशवर संशय व्यक्त केल्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले. महेश घाबरला आणि त्याने विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्याची प्रकृती सुधारताच पोलिसांनी त्याला अटक केली. तपासादरम्यान महेशने खुनाची कबुली दिली.

हे देखील वाचा: Triple Homicide/ तिहेरी हत्याकांड: पती, पत्नी व लहान मुलाची हत्या; हत्या झालेली विवाहित महिला 7 महिन्यांची गरोदर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !