Valwa taluka murder news

सासू ठेवत होती पाळत म्हणून सुनेने दिली खुनाची सुपारी

आयर्विन टाइम्स / नागपूर
विधवा सुनेने प्रेमाच्या आड येणाऱ्या सासूचा काटा काढल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन चुलत भावांच्या मदतीने सासूचा गळा आवळून खून केल्यानंतर तिचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव केला. दुसऱ्या दिवशी सासूचे अंत्यसंस्कारही आटोपले. मात्र, नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या संशयाने प्रकरणाचा उलगडा झाला. तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी केली असता संपत्तीसाठी सुनेनेच दोन चुलत भावंडांना घेऊन सासूचा खून केल्याचे तपासात उघडकीस आले.

सासू

नागपूर येथील श्रीमती सुनीता राऊत या मुलगा अखिलेश, सून वैशाली आणि पाच वर्षांची नात स्विटीसोबत राहत होते. २०२३ मध्ये अखिलेशचा आजारपणात मृत्यू झाला. तेव्हापासून विधवा सून मुलगी व सासूसोबत राहायला लागली. एकाकी पडलेल्या वैशालीचे काही दिवसांत अनिल नावाच्या युवकासोबत सूत जुळले. तो तिच्या पतीचा मित्र होता. दोघांचे प्रेमसंबंध बहरू लागल्यावर त्यांनी चोरून भेटायला सुरुवात केली. तो सासू बाहेर गेल्यावर घरी यायला लागला.

हे देखील वाचा: sangli crime news : सांगली जिल्ह्यातील एका प्राथमिक शाळेतील 3 विद्यार्थिनींचा विनयभंग: आईच्या तक्रारीवरून शिक्षकावर गुन्हा नोंद

विधवा सूनेच्या प्रेमसंबंधाची कुणकुण सासू सुनीता यांना लागली. त्यामुळे त्यांनी कुटुंबाची इभ्रत वाचविण्यासाठी सुनेची समजूत घातली. तरीही दोघांचे प्रेमसंबंध कायम होते. त्यामुळे सासू वारंवार तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिविगाळ करायची. त्यामुळे सुनेने सासूचा काटा काढायचे ठरविले. तिने आपले दोन्ही चुलत भाऊ, श्रीकांत ऊर्फ समीर नरेंद्र हिवसे (२५) आणि रितेश प्रकाश हिवसे (२७, रा. भांडारगोंडी, ता. पांदुर्णा- मध्यप्रदेश) यांना कटात सामील करून घेतले. तिच्या मृत्यूनंतर दोन भूखंड आणि घर विकून पैसे मिळाल्यानंतर दोन लाख रुपये देण्याचे ठरविले.

दोघांनीही सुनीता यांचा खून करण्यासाठी सहमती दर्शविली. अजनीचे ठाणेदार नितीनचंद्र राजकुमार आणि लक्ष्मण केंद्रे यांना श्रीमती सुनीता राऊत यांच्या मृत्यूबाबत संशय आला.

घटनेच्या १२ दिवसांपर्यंत सूक्ष्म तपास केला. त्यांनी पाच वर्षांच्या मुलीला चॉकलेट – शेजाऱ्यांमध्ये जाऊन घटनेची आईसक्रिम देऊन घटना विचारली. चौकशी केली. वैशालीच्या हालचालींवर थोडा संशय बळावला. अंत्यसंस्कार झाल्यामुळे कोणताही धागा नसताना देखील तांत्रिक पुरावे गोळा केले. त्यात खात्री झाल्यानंतर वैशालीला ताब्यात घेतले. तिला वारंवार खोटे बोलत असल्याने तिला  पोलिसी खाक्या दाखविला. त्यामुळे तिने सुपारी देऊन खून केल्याची कबुली दिली.

हे देखील वाचा: sangli crime news: सांगलीतील संजयनगर पोलिसांची धडक कारवाई : मोटरसायकल चोर जेरबंद; 5 मोटरसायकली चोरी केल्याचे मान्य

सून होती संपत्तीची दावेदार

पती आणि मुलगा गेल्यापासून सुनीता एकट्या पडल्या होत्या. वैशालीचा पाय घसरू नये म्हणून तिच्यावर पाळत ठेवत होती. मात्र, तिला मोकळेपणा हवा होता. सासू तिच्यासाठी अडसर ठरत होती. त्यामुळे वैशालीने सासूच्या खुनाचा कट रचला. सासूचा खून केल्यानंतर संपत्तीवर कुणी दावेदार राहणार नाही, या उद्देशाने तिने चुलत भावांना दोन लाखात सुपारी दिली.

सुनेने भावांच्या मदतीने असा केला गेम

२८ ऑगस्टला ठरल्याप्रमाणे वैशालीने तिच्या साथीदारांना आधीच बोलावून घेतले. घरात नवऱ्याची आई सुनीता, वैशाली आणि मुलगी असे तिघे होते. सर्वांनी जेवण केले. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास वैशालीने मागचे दार उघडले. दोन साथीदार घरात आले. वैशाली सुनीता यांच्या छातीवर बसली तर दोघांनी तिचा गळा आवळला.

हे देखील वाचा: शासनाचे योजनादूत व्हा, दरमहा 10 हजार मिळवा: 13 सप्टेंबरपर्यंतच ऑनलाइन नोंदणी : प्रत्येक गावात संधी;राज्यभरात ५० हजार ‘योजनादूत’ नेमले जाणार

हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा केला बनाव

सकाळी  सुनीता यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची बातमी वैशालीने तिचे नातेवाईक व परिसरातील नागरिकांना दिली. अंत्यसंस्काराची तयारी झाली. घाटावर अंत्यसंस्कारही झाले. मृताच्या गळ्यावर आवळल्याच्या खुणा दिसल्या. कुठलाच आजार नसताना अचानक कसे काय निधन झाले, असा प्रश्न पडला. वैशालीचा मोबाईल तपासला असता त्यात दोन युवकांशी संवाद झाल्याचे लक्षात आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली.

दोन मामा मागच्या दाराने आले आणि …

पाच वर्षांच्या चिमुकलीने पोलिसांना सांगितले की, मध्यरात्री दोन मामा मागच्या दाराने आले. त्यांनीच आजीचा खून केला. यावरून पोलिसांनी वैशालीची चौकशी करून रहस्य उलगडले. ही कारवाई पोलिस उपायुक्त अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार, पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, सुशांत उपाध्ये, पंकज बावणे, स्वाती माळी, नितीन सोमकुंवर, अश्विनी सहारे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !