खून

खूनप्रकरणी राधा मिश्रा आणि तिचा प्रियकर अनुभव पांडे  यांच्याविरोधात गुन्हा दाखल

आयर्विन टाइम्स / मुंबई
भिवंडीच्या काल्हेर भागात एका महिलेने अनैतिक संबंधातून तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी राधा मिश्रा (२५) आणि तिचा प्रियकर अनुभव पांडे (२३) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अनुभवला अटक केली आहे.

पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने राधा आणि अनुभव यांनी मृतदेह ठाणे खाडीत फेकला होता. मात्र, मृतदेह अद्याप सापडलेला नाही. काल्हेर येथील दुर्गेश पार्क परिसरात बलराम मिश्रा (२७) हे त्यांच्या पत्नी राधासह राहत होते. बलराम यांचा मित्र अनुभवही त्याच इमारतीत समोरील सदनिकेत राहत होता.

हे देखील वाचा: sangli crime / सांगली: 14 वर्षांची जन्मठेप झालेल्या गुन्हेगाराकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पॅरोलवर बाहेर आल्यावर कृत्य; सांगली शहरातील संतापजनक घटना; संशयितास अटक

७ ऑगस्टला मध्यरात्री बलराम यांच्या मोबाईलवरून त्यांच्या भावाला एक संदेश व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आला, ज्यात ते तीन ते चार दिवस पुण्याला नातेवाईकांकडे जाणार असल्याचे नमूद होते. परंतु, पुण्यात त्यांचे कोणतेही नातेवाईक नसल्याने बलराम यांच्या भावाला संशय आला. ते बलराम यांच्या घरी गेले, तेव्हा घराला कुलूप होते. बलराम आणि राधा यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु दोन्ही मोबाईल बंद होते. त्यामुळे बलराम यांच्या भावाने नारपोली पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

हे देखील वाचा: Atrocious murder / निर्घृण खून : शिक्षिकेने सुपारी देऊन केला आपल्या प्रियकराचा निर्घृण खून; पोलिसांनी घेतले 5 संशयितांना ताब्यात

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नारपोली पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी इमारतीतील सीसीटीव्ही तपासले असता, ७ ऑगस्टच्या मध्यरात्री अनुभवने इमारतीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा बदलल्याचे आढळले. त्यानंतर राधा मोठ्या बॅगा घेऊन बाहेर पडताना दिसली. पोलिसांनी त्यांच्या मोबाईलच्या तपशिलांचा मागोवा घेतला असता, त्यांनी एका कार चालकाशी संपर्क साधल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत कार चालकाने त्यांना एलटीटी रेल्वे स्थानकात सोडल्याचे उघड झाले. पुढील तपासात ते गोरखपूर एक्सप्रेसने प्रवास करत असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी गोरखपूरला जाऊन अनुभवला ताब्यात घेतले आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ६ ऑगस्टच्या रात्री राधा आणि अनुभव यांनी बलरामचा चाकूने खून करण्यात आला आणि त्याचा मृतदेह एका बॅगेत भरून खाडीपर्यंत नेला. तिथे त्यांनी मृतदेह खाडीत फेकून दिला. नंतर, पुन्हा ऑनलाईन कार नोंदणी करून त्यांनी एलटीटी स्थानक गाठले. सध्या पोलिस बलराम यांच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *