ईडीचे प्रमुख उद्दिष्ट देशातील आर्थिक गुन्ह्यांचा तपास करणे
अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ‘ईडी’ ही भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी एक प्रमुख तपासणी एजन्सी आहे, ज्याची स्थापना १९५६ साली झाली होती. याचे प्रमुख उद्दिष्ट देशातील आर्थिक गुन्ह्यांचा तपास करणे व मनी लॉन्डरिंग, परकीय चलन विनिमय व्यवस्थापन कायदा (FEMA) आणि धनशोधन प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत केलेल्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणे आहे. अलीकडच्या काही वर्षात या कार्यालयाची चर्चा सर्वत्र होताना दिसते आहे. त्यांच्या भारतभर होत असलेल्या कारवाया आपल्याला वाचायला मिळत आहेत.
त्यामुळे साहजिकच अनेकांना असा प्रश्न पडला असेल की, या कार्यालयात होणारी भरती कशी होत असेल. त्यासाठी काय करावं लागेल. नोकरभरतीच्या जागा कधी सुटतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखात जाणून घेणार आहोत. हा लेख तुम्हाला अंमलबजावणी संचालनालयाबद्दल आणि त्यातील नोकरीच्या संधींविषयी सखोल माहिती देतो. या लेखाच्या माध्यमातून वाचकांना ईडीमध्ये करिअर करण्यासाठीची आवश्यक तयारी व प्रक्रियेची कल्पना येईल.
अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीमधील प्रमुख पदे
ईडीमध्ये विविध प्रकारची पदे उपलब्ध आहेत. खालीलप्रमाणे या पदांची यादी केली आहे:
1. संचालक (Director): ईडीचा प्रमुख अधिकारी असून, तो संपूर्ण संचालनालयाचे नेतृत्व करतो.
2. विशेष संचालक (Special Director): संचालकांच्या अधीन कार्यरत असतात आणि विविध विभागांचे प्रभारी असतात.
3. संयुक्त संचालक (Joint Director): विशेष संचालकांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करतात.
4. सहायक संचालक (Assistant Director): संयुक्त संचालकांना सहाय्य करण्यासाठी कार्यरत असतात.
5. प्रवर्तन अधिकारी (Enforcement Officer): या पदावरील अधिकारी आर्थिक गुन्ह्यांचा तपास करतात.
6. वरिष्ठ निरीक्षक (Senior Inspector) आणि निरीक्षक (Inspector): हे अधिकारी तपासणी व प्रवर्तन कार्यात सहकार्य करतात.
ईडीमध्ये नोकरी कशी मिळते?
ईडीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांची निवड विविध परीक्षा व मुलाखतींद्वारे केली जाते. सहायक संचालक पदासाठी ‘युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC)’ द्वारे निवड केली जाते. यासाठी उमेदवारांना ‘सिव्हिल सेवा परीक्षा’ उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. प्रवर्तन अधिकारी आणि निरीक्षकांसाठी ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)’ आयोजित परीक्षा व मुलाखतींमधून निवड केली जाते.
भरती प्रक्रिया आणि वेळापत्रक
ईडीमध्ये भरती प्रक्रिया ठराविक कालावधीत होत असते. ‘UPSC’ आणि ‘SSC’ यांच्या परिक्षांचे वेळापत्रक वर्षभरात जाहीर केले जाते आणि त्यानुसार उमेदवार अर्ज करू शकतात. सामान्यतः भरती प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये होऊन, प्रारंभिक व मुख्य परीक्षा यांचा समावेश असतो. यानंतर पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाते.
अंमलबजावणी संचालनालयात नोकरी मिळवणे हे एक प्रतिष्ठेचे कार्य आहे. यासाठी उमेदवारांना कठोर तयारी, अचूक माहिती व तपासाच्या कार्याबद्दलची आवड आवश्यक आहे. आर्थिक गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ईडीचा महत्वाचा वाटा आहे आणि देशाच्या सुरक्षेसाठी याचे कार्य अत्यंत मोलाचे आहे.