मिरजेत पदाधिकारी निवड पत्र वाटप सोहळ्यामध्ये पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे केले आवाहन
आयर्विन टाइम्स / मिरज
लोकसभा निवडणुकीत महायुतीकडे कोणतीही जागा मागणी केली नव्हती पण विधानसभेला जनस्वराज पक्षाकडून जागांची मागणी केल्याची आठवण जनसुराज पक्षाचे समित कदम यांनी करून दिली. मिरज आणि जत विधानसभा जनसुराज्य पक्षाचा बालेकिल्ला असल्याचा दावा विनय कोरे यांनी केला. या दोन्ही जागा जनसुराज्य शक्ती पक्षाला सोडाव्यात, अशी मागणी महायुती नेत्यांच्याकडे त्यांनी केली आहे. दरम्यान मिरजेत पदाधिकारी निवड पत्र वाटप सोहळ्यामध्ये पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले.
भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे उपस्थित
जनसुराज्य शक्ती पक्ष सांगली जिल्हा यांच्या वतीने आज मिरजेत जनसुराज्य शक्ती पक्ष सांगली क्षेत्रातील नूतन पदाधिकाऱ्यांना निवड पत्र वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनयजी कोरे सावकार, प्रदेश अध्यक्ष समितदादा कदम, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरांमधील विविध समस्या सोडवण्यासाठी विनयजी कोरे सावकार आणि समितदादा कदम यांच्या प्रयत्नातून कोट्यावधीचा निधी उपलब्ध झाल्याने द्वयींचा भव्य नागरी सत्कार यावेळी करण्यात आला. नूतन पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते निवड पत्र देण्यात आले. जनसुराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरसेवक तसेच शेजारी बसलेल्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी समित कदम यांनी विनय कोरे यांच्याकडे यावेळी केली.
तसेच जनसुराज्य शक्ती शहर जिल्हा पदाधिकारी निवड करण्यात आली. जनसुराज्य शक्ती जिल्हा प्रमुख पदी आनंदसागर सुभाष पुजारी, जनसुराज्य शक्ती सांगली शहर जिल्हा अध्यक्ष पदी डॉ पंकज महादेव म्हेत्रे, जनसुराज्य शक्ती युवा शक्ती सांगली शहर जिल्हा अध्यक्ष पदी अल्ताफ कदर रोहिले, जनसुराज्य शक्ती युवक सांगली जिल्हा अध्यक्ष पदी सुशांत दिनेश काळे, जनसुराज्य शक्ती जिल्हा उपप्रमुख पदी चैतन्य कलकुटगी, जनसुराज्य शक्ती सांगली जिल्हा संघटक पदी सलीम पठाण, जनसुराज्य शक्ती सांगली शहर जिल्हा उपाध्यक्षपदी राहुल डोंगरे, सांगली शहर जिल्हा उपाध्यक्षपदी सुमित सुनील भोसले,
त्याचबरोबर जनसुराज्य युवाशक्ती सांगली जिल्हा उपाध्यक्ष तुषार ब्रम्हदेव भोसले, जनसुराज्य युवाशक्ती सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी ओंकार सुकुमार जाधव, जनसुराज्य शक्ती अल्पसंख्यांक सांगली जिल्हा उपाध्यक्ष अलीम पठाण, जनसुराज्य शक्ती मिरज शहर अध्यक्ष योगेश दरवंदर, जनसुराज्य शक्ती पक्ष अल्पसंख्यांक सांगली शहर जिल्हाध्यक्षपदी कासम मुल्ला, जनसुराज्य शक्ती पक्ष मिरज तालुकाध्यक्ष सुनील बंडगर, जनसुराज्य शक्ती महिला मिरज शहर अध्यक्ष डॉ.संगीता प्रदीप सातपुते,
जनसुराज्य शक्ती ओबीसी मिरज शहराध्यक्ष विनायक रुईकर, जनसुराज्य युवाशक्ती सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल जामदार यांच्यासह इतर सर्व पदाधिकाऱ्यांची सांगली मिरज कुपवाड अध्यक्ष उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली.