आयर्विन टाइम्स / बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यात लागोपाठ दोन मुलांचे खून झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घरून शिकवणी वर्गासाठी गेलेल्या तेरा वर्षीय बालक दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा खून करून मृतदेह बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ-मडाखेड मार्गावरील जंगलातील नाल्यात टाकून दिल्याचे उघडकीस आली आहे. दरम्यान याप्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंबाशी बुधवारी येथेही अशीच घटना उघडकीस आली होती. त्यानंतर लगेच घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा राजेश्वर कराळे (वय तेरा) हा मंगळवारी (ता. २३) नागझरी येथून शेगावमधील चित्रकला चौकातील शिकवणी वर्गात आला होता. शिकवणीनंतर संध्याकाळी तो घरी परतला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी कृष्णाचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. त्यामुळे शेवटी त्याचे काका गोपाल देविदास कराळे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध कृष्णाचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करणारी तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
पोलिस तपासात शहरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कृष्णा एका व्यक्तीच्या मागे मोटरसायकलवर बसून जाताना दिसून आला. त्या व्यक्तीने तोंडाला रुमाल बांधला होता. त्यावरून पोलिसांनी गतीने तपासचक्र फिरवली. त्यात त्यांना नागझरी येथील रूपेश वारोकार (वय २२) या आरोपीचा सुगावा लागला. पोलिसांनी सापळा रचून रूपेशला काल बुधवारी (ता. २४) रात्री जळगाव जामोद येथून ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने कृष्णाचा खून करून त्याचे प्रेत जंगलातील नाल्यात फेकून दिल्याचे कबूल केले.
हे देखील वाचा: Paris Olympics : पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेतून भारताला 2 अंकी पदकांची अपेक्षा : या स्पर्धेत भारताचे 117 खेळाडू होत आहेत सहभागी
या गुन्ह्यात साथ देणाऱ्या त्याच्या साथीदाराला, पृथ्वीराज मोरे (वय २१) यालाही ताब्यात घेण्यात आले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी भेंडवळ- भास्तन शिवारातील वन विभागाच्या बंदी जंगलात काल रात्री उशिरापर्यंत कृष्णाचा शोध घेतला. परंतु अंधारामुळे मृतदेह सापडला नाही. त्यामुळे आज गुरुवारी सकाळीच शोधमोहीम परत सुरू केली. अखेर आरोपीने सांगितल्यानुसार भेंडवळ ते मडाखेड रस्त्यावरील एका नाल्यात कृष्णाचा मृतदेह सापडला. मृतदेहाजवळ एक लोखंडी घन हातोडाही आढळून आला.
या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र एकच शोककळा पसरली आहे. सदर घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच नागझरीसह शेगाव शहर व इतर गावातील मृत बालकांचे नातेवाईक व नागरिकांनी शेगाव शहर पोलिस ठाण्यासमोर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी कृष्णाचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली. कोणताही अनुचित प्रसंग उद्भवू नये म्हणून पोलिस ठाण्यासमोर कडर बंदोबस्त लावण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी शेगाव शहर पोलिस स्टेशन तसेच घटनास्थळाला भेट दिली. मृत बालक व आरोपी एकाच गावाचे असल्याने नागझरी गावात सुद्धा चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
दरम्यान मृत कृष्णा हा आईवडिलांना एकुलता मुलगा होता व त्याला तीन बहिणी आहेत. प्रारंभी पोलिसांनी आरोपींची नावे प्रसारमाध्यमांना दिली नव्हती. मात्र नंतर खामगावचे अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात यांनी पत्रपरिषद घेऊन रूपेश वारोकार व पृथ्वीराज मोरे या दोन आरोपींची नावे सांगितली. या घटनेतील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यताही थोरात यांनी व्यक्त केली. खंडणीच्या उद्देशाने आरोपींनी कृष्णाचे अपहरण केल्याचा व नंतर प्रकरण चिघळल्यामुळे त्याची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी वर्तवला आहे. कृष्णाचे शवविच्छेदन शुक्रवारी अकोला येथे होणार असून त्याचे व्हिडीओ शुटिंग करण्यात येणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यात आणखी एका मुलाची हत्या करून मृतदेह उकिरड्यात पुरला: आतेभावानेच आवळला गळा
बुलढाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यातील अंबाशी येथील १० वर्षीय अरहान सोमवारपासून (ता. २२) बेपत्ता होता. त्याच्या सख्ख्या आतेभावानेच अपहरण करून त्याचा खून केल्याचे व मृतदेह शेणाच्या उकिरड्यात पुरल्याचे चौकशीत उघड झाले आहे. या घटनेने संपूर्ण तालुका हादरला असून कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्राप्त माहितीनुसार, २२ जुलै रोजी सकाळी बाहेर खेळण्यासाठी गेलेला चिमुकला महम्मद अहरान शेख हारून ( वय १०) उशिरापर्यंत परत आला नाही. त्यामुळे अज्ञात इसमाने त्याला पळवून नेले असावे, अशी तक्रार २२ जुलै रोजी अंबाशी येथील शेख हारून त्याआधारे पोलिसांनी संशयित शेख शेख गनी (वय ३५) यांनी चिखली अन्सारला ताब्यात घेऊन विचारपूस पोलिसात दिली होती. पोलिसांनी सदर केली असता सुरवातीला त्याने प्रकरणी अपहरण झालेल्या बालकाचा उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला अटक व अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी अंबाशी आणि आजूबाजूचा परिसर पिंजून काढला.
हे देखील वाचा: take care : पावसाळ्यात वाहने चालवताना या 6 गोष्टींची काळजी घ्या; अपघात टाळण्यासाठी वेगावर नियंत्रण ठेवा, सतर्क राहा
चौकशीत गावातच राहणारा त्याचा अन्सार शेख नासिर (वय २२, रा. अंबाशी) यांच्यासोबत जाताना काहींनी पाहिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. करून अधिक विचारपूस केली असता त्याने अहरानचे अपहरण केल्याचे व त्यानंतर दोरीने त्याचा गळा आवळून खून केल्याचे मान्य केले. पुरावा नष्ट करण्यासाठी अरहानचा मृतदेह पोत्यात टाकून घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या शेणाच्या उकिरड्यात पुरून ठेवल्याची कबुली दिली.
आरोपीकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिस अधिकारी अंमलदारांचे पथक, कार्यकारी दंडाधिकारी, शासकीय पंच, फॉरेन्सिक व्हॅनसह घटनास्थळी रवाना झाले. आरोपीने पंचासमक्ष शेणामातीच्या उकिरड्यातून एक पोते बाहेर काढले. या पोत्यात अपहृत बालकाच मृतदेह दोरीने गळा आवळलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनास्थळाचा पंचनामा करून अरहानचा मृतदेह बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला.