नेर्ले

नेर्लेसह भाटवाडी गावाच्या इतिहासाला चालना मिळणार

आयर्विन टाइम्स / सांगली
सांगली जिल्ह्यातील नेर्ले (ता. वाळवा) येथील पश्चिमेला असणाऱ्या सुळकीच्या डोंगराच्या दक्षिण बाजूला मानवी उत्क्रांतीच्या काळात मानवाने निर्माण केलेले कातळ शिल्पे आढळून आली आहेत. पिंडीच्या आकाराची लहान शिल्प तयार केली आहेत. तालुक्यातील भाटवाडी गावातही अशी कातळ शिल्पे सापडली आहेत. त्यामुळे नेर्लेसह भाटवाडी गावाच्या इतिहासाला चालना मिळणार आहे.

नेर्लेसह भाटवाडी परिसराला हजारो वर्षांचा प्राचीन इतिहास

प्राचीन काळात इंडो-रोमन व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे गाव म्हणून नेलें गावाचा उल्लेख आहे. नवाश्मयुगीन काळातील आदिमानवाचा वावर वाळवा तालुक्यातील डोंगरावर झाल्याचे दिसून येते. मल्लिकार्जुन डोंगर ते डोंगरवाडी या डोंगररांगेत कातळशिल्प चिन्हे आढळून आली आहेत. ज्यामुळे वाळवा तालुक्यामध्ये मानवी उत्क्रांतीतील महत्त्वाच्या पाऊलखुणा सिद्ध झाल्या आहेत. नेलें व भाटवडे परिसरातही अशा चित्रांचा समावेश आहे. यामुळे या भागाला हजारो वर्षांचा प्राचीन इतिहास निर्माण झाला असल्याचे लक्षात येते.

नेर्ले

सांगली जिल्हा ऐतिहासिक आणि प्राचीन स्थळांसाठी परिचित आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात मणेराजुरी गावाजवळ एक कोड्याच्या माळाला देखील ऐतिहासिक झालर आहे. कलावंतीणीचे कोडे म्हणून हे प्रसिद्ध आहे. कोड्यातील चकवे आणि अटी सोडवण्यात लोकांना यश आले आहे. श्रीराम वनवासात असताना जत तालुक्यातून प्रवास केल्याचे आणि तसे काही खुणा दिसून आल्याचे जाणकार सांगतात. या परिसरात वीरगळ देखील मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. सांगली जिल्ह्यात अशाच ठिकाणी ऐतिहासिक आणि पौराणिक खाणाखुणा आढळून येतात. मात्र यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे.

हे देखील वाचा: take care : पावसाळ्यात वाहने चालवताना या 6 गोष्टींची काळजी घ्या; अपघात टाळण्यासाठी वेगावर नियंत्रण ठेवा, सतर्क राहा

कातळात खोदलेली पाण्याची टाकीही आढळून आली

नेर्ले येथील पै. संजय पाटील व विक्रम पाटील यांनी सुळकीच्या डोंगराच्या पायथ्याला कातळशिल्प असल्याची माहिती इतिहास अभ्यासक अतुल मुळीक यांना दिली. यामध्ये डोंगराच्या पायथ्याला जास्त चिन्हे आहेत. डोंगरावर एकच प्रकारचे चिन्हे असून, या ठिकाणी कातळात खोदलेली पाण्याची टाकीही आढळून आली आहे. या ठिकाणचे चिन्ह नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. डोंगराच्या पायथ्याशी असणारी कातळशिल्प चिन्हे हजारो वर्षे जुनी असूनही सुस्थितीत आहेत. भाटवडेत म्हातारा डोंगर परिसरात तामजाई लवण परिसरात डोंगरावर कातळशिल्प चिन्हे आहेत. आकाराने ही चिन्हे मोठी असून, अतिशय चांगल्या स्थितीत आहेत.

मातृपूजक संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या सृजनेंद्रियांच्या वैशिष्ट्यपूर्ण खुणा

भाटवडे येथील शंकर पाटील यांनी ही चिन्हे अतुल मुळीक यांना दाखवली. नेर्ले तसेच भाटवडे परिसरात आढळलेली कातळशिल्प चिन्हे ही व्हॉल्वा आहेत. म्हणजेच प्रजनन पंथाची प्रतिके आहेत. जी सृजनशक्तीची व मातृपूजक परंपरेचा वारसा सांगणारी चिन्हे आहेत. असे आढळून आले आहे. मानवी उत्क्रांतीच्या काही वैशिष्ट्यांचा विचार केला जातो. यामध्ये परस्परसंवादासाठी प्रतीके व सर्जनशील मन आदींचा समावेश होतो. मातृपूजक संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या सृजनेंद्रियांच्या वैशिष्ट्यपूर्ण खुणा नेलें व भाटवडे परिसरात आढळल्या आहेत, अशी माहिती इतिहास अभ्यासक अतुल मुळीक यांनी दिली.

नेर्ले

गैरसमजाला पूर्णविराम शक्य

सांगली जिल्ह्यातील नेर्लेच्या (ता. वाळवा) नवाश्मयुगीन काळातील या खुणा मानवाच्या उत्क्रांतीचे द्योतक आहे. याचे सखोल संशोधन होणे गरजेचे आहे. अनेक वर्षांपासून या ‘महादेवाच्या पिंडी’ आहेत अशा गैरसमजाला पूर्णविराम मिळेल, गावातील विरघळ यांचेही संशोधन व्हावे, अशी मागणी या परिसरातील लोकांनी केली आहे.

हे देखील वाचा: Herbal Zone : गुळवेलच्या पानांचे औषधी गुणधर्म; गुळवेलच्या वापराचे 4 फायदे / benefits जाणून घ्या

पुरातत्त्व खात्याने अधिक संशोधन करण्याची गरज

सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यात इतर ठिकाणी आढळलेल्या चिन्हांपेक्षा नेर्ले व भाटवडे येथे कातळशिल्प चिन्हे संख्येने जास्त प्रमाणात आढळून आली आहेत. यामध्ये व्हॉल्वामधून प्लेसेंटा म्हणजेच गर्भनाळ कोरल्याचे दिसून येत आहे. गर्भनाळ दर्शविणारी चिन्हे या ठिकाणी अधिक प्रमाणात आहेत. यावर पुरातत्त्व खात्याने अधिक संशोधन करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात कातळशिल्पे आढळून आली आहे. या कातळशिल्पाच्या परिसरात विकास होण्याची गरज आहे.
– अतुल मुळीक, इतिहास अभ्यासक

कातळशिल्पांचे संरक्षण करण्याची गरज

गेल्या आठ-दहा वर्षांपासून आम्ही नेर्ले गावचा ऐतिहासिक वारसा जतन होण्यासाठी प्रयत्न करत आहोत. गावात अनेक मध्ययुगीन व प्राचीन इतिहासाच्या पाऊलखुणा सापडल्या असून, यामधून हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासाचा उलगडा होणार आहे. नव्या पिढीसमोर हा ऐतिहासिक वारसा येणे गरजेचे आहे. पुरातत्त्व विभागाने या कातळशिल्पाची पाहणी करून याचे संरक्षण करायला हवे.
– पै. संजय पाटील, नेर्ले.

हे देखील वाचा: Keeps diseases away : ड्रॅगन फ्रूट ठेवते अनेक आजारांना दूर : मधुमेह, कर्करोग, संधिवात, दमा नियंत्रित करण्यास होते मदत ; सध्या दर 210 रुपये प्रतिकिलो

सांगली जिल्ह्यात काय काय पाहण्यासारखे आहे.

१. हरिपूरमधील कृष्णाघाट: याठिकाणी कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांचा संगम पाहायला मिळतो. या ठिकाणी संगमेश्वर मंदिर आहे.
२. चांदोली अभयारण्य : महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यात हे अभयारण्य विस्तारलेले आहे. विश्व विरासत केंद्र म्हणून या अभयारण्याला मान्यता मिळाली आहे.
३. रामलिंग बेट : सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यात इस्लामपूर शहरापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीच्या पात्रात हे बेट वसलेले आहे. शांत आणि रमणीय असे हे बेट आहे.
४. बाहुबली हिल मंदिर : ऋषी बाहुबली यांचा २८ फूट उंच पुतळा आहे.
५. कंधार धबधबा: चांदोली धरणाजवळ हा धबधबा आहे. दाट जंगलांनी वेढलेला हा धबधबा प्रेक्षणीय आहे.

हे देखील वाचा: Beware! पावसाळ्यात कोणत्या भाज्या खाव्यात? कोणत्या टाळाव्यात; या 4 भाज्यांकडे करा दुर्लक्ष

६. दंडोबा हिल स्टेशन: मिरज तालुक्यात देशिंग गावाच्या हद्दीत डोंगरावर महादेवाचे मंदिर आहे.
७. मीरासाहेब दर्गा : मिरजेत असलेला हा दर्गा हिंदू-मुस्लिम भक्तांचे श्रद्धास्थान आहे.
८. सांगली किल्ला: सांगली शहराच्या मध्यभागी हा किल्ला असून या ठिकाणी पूर्वी कलेक्टर (जिल्हाधिकारी ) कार्यालय आहे. याच परिसरात एक वस्तू संग्रहालय आहे.
९. सागरेश्वर अभयारण्य: सागरेश्वर डोंगरावर वसलेले हे अभयारण्य पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे.
१०. सांगलीतील गणपती मंदिर : आप्पासाहेब पटवर्धन या राजांनी १९४३ मध्ये हे मंदिर उभारल्याचे सांगितले जाते. हे एक ऐतिहासिक वैभव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed