15 तोळे सोन्याचे दागिने

घरातील सर्व बनाळी येथील जत तालुक्यातील बनशंकरी मंदिरात गेले होते देवीचा कार्यक्रमाला

आयर्विन टाइम्स / जत
जत तालुक्यातील शेगाव येथील सिद्राम अण्णाप्पा पट्टणशेट्टी यांचे बंद घर दिवसाढवळ्या फोडून एक लाख ४० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यानी चोरून नेला. शनिवारी (ता. २०) सकाळी १० ते ४ च्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत जत पोलिस ठाण्यात पट्टणशेट्टी यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सिद्राम पट्टणशेट्टी यांच्या घरातील सर्व बनाळी येथील बनशंकरी मंदिरात देवीचा कार्यक्रम असल्याने गेले होते.

तेथील कार्यक्रम संपवून दुपारी चारच्या सुमारास घरी आले. त्यावेळी हा चोरीचा प्रकार लक्षात आला. या घरफोडीत एक लाख २० हजार रुपये किमतीचे दोन तोळ्याचे गंठण व नेकलेस, १५ हजार रुपये किमतीचे कानातील अर्धा तोळ्याचे सोन्याचे टॉप्स, सोन्याची पट्टी, कानातील रिंगा ५ हजार रुपये रोख रक्कम असा १ लाख ४० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. या चोरीची जत पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

जत

जत तालुक्यातील संख येथे ‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी रास्ता रोको; लेखी आश्वासनानंतर माडग्याळ ग्रामस्थांचे आंदोलन मागे

म्हैसाळ योजनेचे पाणी माडग्याळ येथे आले असून ते व्हसपेठ, गुड्डापूर, संख, अंकलगी तलावात सोडण्याच्या मागणीसाठी येथे श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम महाराज यांच्यासह ग्रामस्थांनी सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले. उपोषणाची दखल शासनाने घेतली आहे. याचे काम आजच सुरू करत आहोत, काम करण्यासाठी मशिनही जागेवर आली असल्याचे सांगत म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती आंदोलनकर्त्यांना केली.

हे देखील वाचा: Shocking: गर्भपातावेळी विवाहित प्रेयसीचा मृत्यू : तिचा मृतदेह फेकला इंद्रायणीत; जिवंत 2 लेकरांनाही दिली जलसमाधी

ठोस लेखी आश्वासन व मशिनरी जागेवर आल्याचे फोटो व व्हिडिओ अधिकाऱ्यांनी दाखवल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले. सोमवारी सकाळी १० आंदोलनाला सुरवात झाली. आंदोलकानी गोंधळी गीत सादर केले. आंदोलनामुळे रस्त्याच्या तिन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी झाली होती. आंदोलनस्थळी कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी अभियंता सचिन पवार, म्हैसाळ योजनेचे जत शाखा उपअभियंता ग. ब. खरमाटे, शाखा अभियंता वाघमारे, पवन शिंदे, बगली यांनी भेट दिली. यावेळी तुकाराम महाराज, मोहन गायकवाड, तानाजी पाटील, सिध्दू गायकवाड यांनी भाषण केले.

सोरडीचे माजी सरपंच मोहन गायकवाड, सोर्डीचे सरपंच तानाजी पाटील, संजय धुमाळ, डॉ. रविकिरण म्हेत्री, महातेश स्वामी, सलीम अपराध, बसवराज बिराजदार, गगय्या स्वामी, महेश भोसले, संजय हादीमणी आदी सहभागी झाले होते.

जत

जत तालुक्यात अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षाच

जतच्या पूर्व भागासह संपूर्ण तालुक्यात पावसाने ओढ दिली असून परिसरात अद्यापही मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. पुष्य नक्षत्रास सुरवात झाली आहे. या भागात अद्याप तलाव भरलेले नाहीत. ओढा व नाले खळखळून वाहिलेले नाहीत. सध्या खरीप हंगामातील पिके जोमात आली आहेत. मात्र, अद्याप या भागात या पिकांना पाऊस होणे आवश्यक आहे. सध्या कृष्णा नदी पूर्ण क्षमतेने वाहत आहे. या भागात म्हैसाळ योजनेचे पाणी माडग्याळ कालव्यातून सोडल्यास हे पाणी उमदीपर्यंत जाऊ शकते.

जत पूर्व भागात ओळख कायम दुष्काळ अशीच स्थिती आहे. खरीप हंगामातील माळरानावरील पिके पावसाच्या भरवशावर असतात. पुनर्वसू नक्षत्राचा एकच पाऊस या भागात मोठा पडला आहे. मात्र, या पावसामुळे या भागातील तलावे, बांध भरलेले नाहीत. ओढ्यानाही पाणी आलेले नाही.

हे देखील वाचा: राशिभविष्य आजचं 23 जुलै: वृषभ, सिंह राशीसह 5 राशीच्या लोकांना मंगळवारी आर्थिक लाभ / Financial benefits होईल, जाणून घ्या बाकीच्या लोकांनीही आजच्या राशीत त्यांचे भविष्य

या भागात ऊन-सावल्याचा खेळ सुरू आहे. या परिसरात मोठा पाऊस होऊन या भागातील तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास पाण्याचा प्रश्न निकाली लागणार आहे. भागात सध्या खरीप हंगामातील पिके जोमात आहेत. त्यांची उगवण चांगली झाली आहे. माळरानावरील खरीप हंगामातील पिकांना सध्या पावसाची आवश्यकता आहे. म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांनी पावसाळ्यात या भागातील माडग्याळच्या कालव्यातून पाणी सोडल्यास येथील दोडकल तलाव भरेल व सोन्याळ, उटगी व निगडी बुद्रुक येथील दोड्डुनाला मध्यम प्रकल्प भरून पाणी पुढे उमदीपर्यंत जाऊ शकते.

तेव्हा ‘म्हैसाळ’च्या अधिकाऱ्यांनी पावसाळ्यात कृष्णा नदीला पूर येऊन पुढे जाणारे पाणी जत तालुक्याच्या पूर्व भागात पावसाळ्यात सोडल्यास या भागाला त्या पाण्याचा शेतीसाठी लाभ होणार आहे. म्हणजे शाखा अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन त्वरित या भागात पाणी सोडणे आवश्यक आहे.

जत

जिल्हा बँकेच्या नूतनीकृत नूतनीकरण झालेल्या जत शाखेचे उद्घाटन रविवारी

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जत मार्केट यार्ड येथील नूतनीकरण झालेल्या शाखेचे उद्घाटन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (शरदचंद्र पवार) आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते रविवारी (ता. २८) दुपारी एक वाजता होणार आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक अध्यक्षस्थानी आहेत, अशी माहिती संचालक प्रकाश जमदाडे यांनी दिली.

हे देखील वाचा: Sangli Crime : सांगलीतील कुपवाडच्या तरुणाकडून 10 तलवारी जप्त; सांगली – आष्टा मार्गावर गस्त सुरू असताना लागला पोलिसांच्या हाती

संचालक जमदाडे म्हणाले, “बँकेच्या जत येथील शाखेची स्थापना सन १९७८ मध्ये झाली. बँकेच्या जुन्या इमारतीचे फर्निचर, रंगकाम आदीमध्ये बदल करून शाखा अद्यावत केली आहे. सुमारे ९० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. ” उपाध्यक्ष जयश्री पाटील प्रमुख करीत पाहुण्या आहेत. आमदार विक्रम सावंत, माजी आमदार विलासराव जगताप, बाजार समितीचे उपाध्यक्ष सुरेश शिंदे, माजी स्वीकृत संचालक सरदार पाटील, सीईओ शिवाजीराव वाघ, सहायक निबंधक अमोल डफळे उपस्थित राहणार आहेत. संचालक मन्सुर खतिब, प्रभाकर कोळी, शाखाधिकारी तानाजी काशीद संयोजन केले आहे.
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !