ड्रॅगन फ्रूट

जाणून घ्या ड्रॅगन फ्रूटच्या सेवनाने शरीराला होणारे अनेक फायदे

लाइफस्टाइल हेल्दी राहावे. याकरिता बहुतांश जण डाएटमध्ये ड्रॅगन फ्रूटचा आवर्जून समावेश करतात. या फळामध्ये आरोग्यास पोषक असणाऱ्या अनेक घटकांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. या फ्रूटमध्ये प्रोटीन, कर्ब, फायबर, लोह आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक आढळतात. या फ्रूटच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे होतात. बरेच आजार शरीरापासून दूर राहतात.

सध्या त्याचे दर २१० रुपये प्रतिकिलो आहे. या फळामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई यांसारखे अँटिऑक्सिडंट्सदेखील असतात. महत्त्वाचे म्हणजे यात फॅट्सचे प्रमाण खूप कमी आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. यामुळेच वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी हे फळ खूप फायदेशीर आहे.

ड्रॅगन फ्रूट

रक्तातील साखरेची पातळी कमी ठेवण्यासाठी फायदेशीर

यामध्ये कॅलरीज कमी असतात, परंतु त्यात आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. यासोबतच यामध्ये फायबरदेखील असते. फ्लेव्होनॉइड्स, फिनोलिक्स इत्यादी अँटिऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे कर्करोग आणि इतर समस्या निर्माण होत नाहीत. रक्तातील साखरेची पातळी कमी ठेवण्यासाठी हे फळ फायदेशीर आहे, परंतु या स्थितीत किती प्रमाणात सेवन करणे फायदेशीर ठरू शकते, याचा सल्ला डॉक्टरांना विचारून घ्या.

हे देखील वाचा: Accident : जालना-राजूर मार्गावरील तुपेवाडीजवळ अपघात ; पंढरपूरहून परतलेल्या वारकऱ्यांवर काळाचा घाला; काळीपिवळी विहिरीत कोसळून 7 ठार, 7 जखमी

हे नैसर्गिकरीत्या फॅट फ्री आणि जास्त फायबर असलेले फळ आहे. हा एक चांगला नाश्ता असू शकतो, जे खाल्ल्यानंतर तुमचे पोट भरलेले राहते आणि तुम्हाला लवकर भूक लागत नाही. या फळामध्ये प्रोबायोटिक्स असतात. जास्त प्रोबायोटिक्स घेतल्याने आतड्यातील चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियाचे संतुलन राखले जाते. यामुळे अन्न पचण्यासही मदत होते.

यामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर अँटिऑक्सिडंट्स जास्त असतात, जे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी चांगले असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. शरीरातील ऑक्सिजनच्या योग्य पातळीकरिता लोह आवश्यक आहे आणि ते आपल्याला ऊर्जा देते. लोहचा चांगला स्रोत आहे.  फ्रूट पोट निरोगी ठेवते. यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असते, जे पचनसंस्था निरोगी ठेवते.

ड्रॅगन फ्रूट

बद्धकोष्ठतेची समस्या टाळण्यासाठी तुम्ही या फ्रूटचे सेवन करू शकता. रक्ताची कमतरता असणे चांगले नाही. यामुळे तुम्हाला थकवा, अशक्तपणा; तसेच चक्कर आल्यासारखे वाटू शकते. हिमोग्लोबिनची पातळी कमी असलेल्या लोकांसाठी हे फळ खूप फायदेशीर आहे.

हे देखील वाचा: Green hill / दंडोबा डोंगर: 1100 हेक्टर क्षेत्रात पसरलाय डोंगर; पर्यटन विकासाला चालना मिळण्याची गरज / Need to promote tourism development

आहारतज्ज्ञ सांगतात की, या फ्रूटचे अनेक फायदे आहेत. या फ्रूटमध्ये फ्लेव्होनॉइड्स, फिनोलिक्स इत्यादी अँटिऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे कर्करोग आणि इतर समस्या निर्माण होत नाहीत. रक्तातील साखरेची पातळी कमी ठेवण्यासाठी हे फळ फायदेशीर आहे, परंतु या स्थितीत किती प्रमाणात सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.

ड्रॅगन

येथे होते ड्रॅगन फ्रूटची लागवड

या फ्रूटची शेती आपल्याकडे दुष्काळी भागात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कमी पाण्यात तग धरून राहणारी ही वनस्पती चांगले उत्पन्न देत आहे. आकर्षक रंगाचे  फ्रूट हे मूळचे मेक्सिको आणि अमेरिका या देशातील आहे. याचे फळ चांगले उत्पन्न देऊन शेतकऱ्याला त्याची आर्थिक उन्नती करण्यास हातभार लावत आहे. महाराष्ट्रातील कमी पावसाच्या क्षेत्रात उदा. सोलापूर, पुणे (शिरूर), सांगली (जत) येथेसुद्धा व्यापारी तत्त्वावर या पिकाची लागवड सुरू झाली . आहे.

ड्रॅगन फ्रूट हे मूळचे मेक्सिको आणि दक्षिण अमेरिकेतील असून कंबोडिया, थायलंड, तैवान, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि फिलिपाइन्स या देशांमध्ये; तसेच भारतामध्ये त्याची लागवड केली जाते. भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तमिळनाडू, केरळ आणि आंध प्रदेश या राज्यांमध्ये या फळाची लागवड केली जाते. देशात गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यांतसुद्धा लहान क्षेत्रावर व्यापारीदृष्ट्या त्याची लागवड होत आहे.

ड्रॅगन फ्रूट

 फ्रूटपासून जॅम, जेली आणि सरबत

या फ्रूटच्या जातींमध्ये विविधता आढळते. यामध्ये पांढऱ्या रंगाचे गर असलेले लाल रंगाचे फळ, लाल रंगाचे गर असलेले लाल रंगाचे फळ आणि पांढऱ्या रंगाचे गर असलेले पिवळ्या रंगाचे फळ असे प्रकार दिसतात.ही फळे आता मोठ्या प्रमाणात बाजारात दिसू लागली आहेत.या फ्रूटपासून जॅम, जेली आणि सरबत करता येत असल्याने फ्रूट प्रक्रियेला संधी आहे.

हे देखील वाचा: Beware! पावसाळ्यात कोणत्या भाज्या खाव्यात? कोणत्या टाळाव्यात; या 4 भाज्यांकडे करा दुर्लक्ष

फळ त्वचेवर आहे उपयोगाचे

या फळामध्ये उपलब्ध असणारे पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स, ओमेगा-3 आणि ओमेगा-6 वाईट कोलेस्टेरॉलला वाढू देत नाही. यातील लोह रक्तातील हिमोग्लोबिन वाढवते आणि अॅनिमिया होऊ देत नाही. फळाचा आहारात समावेश असल्यास संधिवाताच्या वेदना कमी होतात. दात व हाडे मजबूत होतात. फळांचे सेवन केले तर रोगप्रतिकार शक्ती वाढते. फळांमधील लायकोपेन विकर आणि ‘क’ जीवनसत्त्व असते. फळाच्या सालीमध्ये पॉलीफेनॉल असते. चेहऱ्यावरचे फोड, रुक्ष केस, केस गळणे, उन्हाने काळवंडून गेलेल्या त्वचेवर हे फळ उपयोगाचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !