जालना

आयर्विन टाइम्स / जालना
काळीपिवळी वडाप विहिरीत कोसळून सात जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना जालना-राजूर मार्गावरील तुपेवाडी परिसरात गुरुवारी (ता. १८) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. या अपघातात सात जण जखमी झाले आहेत. आणखी धक्कादायक म्हणजे पंढरपूरहून परतलेल्या सहा वारकऱ्यांचा या मृतांमध्ये समावेश आहे.

चणेगाव (ता. बदनापूर) येथील नऊ वारकरी पंढरपूरला पायी गेले होते. आषाढी एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेऊन गुरुवारी ते बसने जालन्यात दाखल झाले. जालना येथून गावी जाण्यासाठी काळीपिवळीतून ते राजूरकडे निघाले होते. तुपेवाडी शिवारात समोरून आलेल्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे रस्त्यापासन ५० ते ६० फुटांवर असलेल्या विहिरीत काळीपिवळी कोसळली.

राजूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संजय अहिरे, चंदनझिरा ठाण्याचे निरीक्षक सम्राटसिंग राजपूत व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी नागरिकांनी बचाव कार्य सुरू केले होते. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, विहिरीत कोसळलेली काळीपिवळी क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आली. बचाव कार्यासाठी जालन्यातील अग्निशमन दल दाखल झाले होते.

जालना

मृतांची नावे अशी: ताराबाई भगवान मालुसरे (वय ५५, रा. तपोवन, ता. भोकरदन), चंद्रकला अंबादास घुगे (५०), प्रल्हाद उत्तमराव महाजन (६०), प्रल्हाद आनंदा बटले (७५), नारायण किसन निहाळ (४५), मंदा बाळू तायडे (३५, सर्व रा. चणेगाव, ता. बदनापूर, जि. जालना), रंजना कैलास कांबळे (४५, रा. जालना) यांचा मृत्यू झाला.

जखमींची नावे अशी: अंबादास विश्वनाथ घुगे (६०), ताराबाई भगवान गुळमकर (२५) आरती तायडे, सखुबाई महाजन (चौघे रा. चणेगाव), अशोक विष्ण पुंगळे (३५, राजूर), हिंमत रामधन चव्हाण (तपोवन तांडा- भोकरदन), चालक बाबासाहेब हिवाळे (रा. मानदेऊळगाव, ता. बदनापूर) हे जखमी झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

हे देखील वाचा: Green hill / दंडोबा डोंगर: 1100 हेक्टर क्षेत्रात पसरलाय डोंगर; पर्यटन विकासाला चालना मिळण्याची गरज / Need to promote tourism development

बदनापूर तालुक्यातील चणेगाव येथील जवळपास ७० हून अधिक वारकरी विविध दिंड्यांच्या माध्यमातून पंढरपूर येथे जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेतात. यावर्षीही तेवढ्याच उत्साहाने चणेगाव येथील भाविकांनी पायी पंढरपूर गाठले. आषाढीला विठू माउलीचे दर्शन घेतले. माउलीच्या दर्शनाने धन्य होऊन त्यांनी पंढरपूर ते जालना असा बसने प्रवास केला.

जालन्यात आलो म्हणजे आपण आपल्या गावाला पोचलो, अशी भावना त्यांच्या मनात होती. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. पंढरपूरहून परतलेले चणेगाव येथील नऊ भाविक जालन्याहून गावाकडे जाण्यासाठी काळीपिवळी जीपमध्ये बसले. जालना-राजूर मार्गाने जात असताना ओव्हरटेक करणाऱ्या एका दुचाकीला चुकवत काळीपिवळी पुढे गेली.

जालना

मात्र, चालकाचे नियंत्रण सुटल्याने काळीपिवळी रस्ता सोडून एका शेतातील विहिरीत कोसळली. या अपघातात चणेगाव येथील चंद्रभागाबाई अंबादास घुगे, प्रल्हाद उत्तम महाजन, प्रल्हाद आनंदा बिटले, नारायण किसन निहाळ, नंदा बाळू तायडे या वारकऱ्यांचा अंत झाला.

जालना-राजूर मार्गावरील अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख मदत

आमदार नारायण कुचे यांना राजूर येथील ग्रामीण रुग्णालय गाठून मृतांच्या नातेवाइकांना धीर दिला. जखमींची विचारपूस केली. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. अपघातात मृत्यू पावलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबांना मदत करण्याचे आवाहन केले.

हे देखील वाचा: Maharashtra News / महाराष्ट्र : एकनाथ शिंदे यांची शिवसेना विधानसभेला 100 जागा लढविणार; बैठकीत स्वतंत्र निरीक्षकांची नेमणूक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृत वारकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये आणि जखमी वारकऱ्यांना शासकीय खर्चातून खासगी रुग्णालयात उपचार करण्याची मान्यता दिल्याची माहिती कुचे यांनी दिली.

जालना

दरम्यान आणखी एक बातमी समोर आली आहे. जालना-राजूर मार्गावरील वसंतनगर पाटीजवळ गुरुवारी (ता. १८) झालेल्या काळी-पिवळी अपघातातील एका जखमीने अन्य चौघांचे प्राण वाचविले. अशोक विष्णु पुंगळे (रा. राजूर) असे त्यांचे नाव आहे. जालन्याहून राजूरला जाण्यासाठी ते काळी-पिवळीमध्ये पाठ बसले होते. अपघाताचा थरार त्यांनी प्रत्यक्ष अनुभवला. अपघातात त्यांनाही दुखापत झाली होती. तरीही त्यांनी चार लोकांना विहिरीतील पाण्यात बुडण्यापासून वाचविले.

हे देखील वाचा: राशिभविष्य आजचं 19 जुलै: वृषभ, मिथुन राशीसह 3 राशींना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद / Blessings of Goddess Lakshmi लाभेल, आर्थिक लाभ होतील, इतरांनाही काय लाभ मिळतील जाणून घ्या

त्यांच्यासह या चौघांवर राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. समोर अचानक दुचाकी आली. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या ५० फूट खोल विहिरीत काळी-पिवळी जीप कोसळली. रस्त्यापासून साधारण पाच ते सात फुटांवर ही विहीर आहे. विहिरीत पडण्यापूर्वी या जीपने एक-दोन पलट्या खाल्ल्याचे पुंगळे यांनी सांगितले.

गावात सायंकाळनंतर चूल बंद

गाव केवळ अडीच हजार लोकसंख्येचे अत्यंत छोटे गाव आहे. घटनेची माहिती मिळताच हे गाव दुःखात बुडाले. गावातील पुरुष मंडळींनी थेट राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. गावात सायंकाळनंतर कुणाच्याही घरात स्वयंपाक झाला नाही, अशी माहिती माजी सरपंच उद्धव जायभाये यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !