बेदाण्याचा

शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश होण्याची गरज

आयर्विन टाइम्स / सांगली
सांगली जिल्ह्याचे प्रमुख ‘कॅश क्रॉप’ असलेल्या बेदाण्याला राज्य शासनाने घोषणा करुनही बेदखल ठरवले आहे. चार महिन्यांपूर्वी बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करण्याचा शासन आदेश (जीआर) निघाला. पण घोषित केलेल्या यादीत बेदाण्याचा समावेशही न झाल्याने शेतकरी नाराज आहेत. नवा मेनू शासनाने जाहीर केला आहे, त्यात बेदाण्याचा समावेश नाही.

त्यामुळे शासनाने बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली अशीच भावना झाली आहे. साहजिकच गेल्या कित्येक वर्षांची शेतकऱ्यांची मागणी केवळ ‘जीआर’ पुरतीच सीमित राहिल्याची सद्यस्थिती आहे.

बेदाण्याचा

सांगली जिल्ह्यात सुमारे सव्वालाख एकर द्राक्षबागाचे क्षेत्र आहे. मात्र गेल्या काही वर्षात द्राक्ष बागायतदारांना कधी पाऊस, कधी धुके, कधी कडाक्याचे ऊन तर कधी थंडी अशा विचित्र आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. डाऊनी, भुरी, करपा, घडकूज यासह अन्य रोगांना दरवर्षी सामोरे जावे लागते. त्यामुळे मार्केटची द्राक्षे खराब होत आहेत. त्यासाठी रोग नियंत्रणाचा खर्च दरवर्षी कैकपटीने वाढतच आहे. मिरज, पलूस, वाळवा, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील अनेक शेतकरी त्यामुळे मेटाकुटीला आले आहेत.

वाढता उत्पादन खर्च, नैसर्गिक प्रतिकूल वातावरण यासह दराची शाश्वती नसल्याने द्राक्ष क्षेत्र अडचणीत येत आहे. त्यातून मध्यम मार्ग म्हणून शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मितीचा मार्ग आजमावला. मात्र गेल्या तीन वर्षात द्राक्षासारखीच गत बेदाण्याची झाली आहे. बेदाण्यालाही अपेक्षित वर नसल्याने शेतकऱ्यांची आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी अवस्था आहे.

हे देखील वाचा: Importance of reading : अमिताभ बच्चन Brand Ambassador ; महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये 22 जुलैपासून महावाचन उत्सव

महाराष्ट्रात नाशिकनंतर फक्त सांगली जिल्ह्यातच बेदाणानिर्मिती होते. सांगलीच्या बेदाण्याची चव व गुणवत्ता जगभर नावाजलेली आहे. तो शालेय पोषण आहारात दिला तर शेतकऱ्यांच्या मालाचा उठाव होईल. त्याला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा होती. अवकाळी पावसाने आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. त्यात उरलेल्या मालाचा बेदाणा करुन तो चांगल्या दराने विकला जाईल, ही शेतकऱ्यांची अपेक्षाही फोल ठरत आहे.

गेल्या दहा वर्षांपूर्वी बेदाण्याला किमान दर होते, तेवढेच आजही आहेत. त्या तुलनेत उत्पादन खर्च पाचपटींनी वाढला आहे. नुकतेच नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले. यंदा पोषण आहारात बेदाणा देण्याची अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा होती.

बेदाण्याचा

स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, ‘बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करावा, जेणेकरुन दराअभावी नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळेल, अशा भावनेने संघटनेने मागणी लावून धरली. त्यासाठी आंदोलने केली. मोर्चे काढले. शेवटी १२ मार्च रोजी शासनाने मागणीची दखल घेत ‘जीआर’ काढला. शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक करु नये. पोषण आहारात बेदाणा तातडीने द्यावा. त्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्विकारण्याची वेळ शासनाने आणू नये.’

बेदाणा: आरोग्यदायी फायदे

बेदाण्याचे आयुर्वेदात अनेक फायदे सांगितले आहेत. पोटॅशियम, लोह, कॅल्शियम यांची शारीरिक गरज बेदाणा पूर्ण करू शकतो. तसेच मूत्रपिंडाचे काम कार्यक्षम करण्यास उपयुक्त ठरतो असे आहारतज्ज्ञांचे मत आहे. दिवसभराच्या श्रमाने शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी २४ तासांत केवळ ३० ग्रॅम बेदाणा उपयुक्त ठरू शकतो.

हे देखील वाचा: Eknath Shinde : राज्यात मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना ; 12th उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6 हजार रुपये, पदविका उत्तीर्ण असणाऱ्यांना 8 हजार आणि पदवी उत्तीर्ण असणाऱ्यांना 10 देणार

आयुर्वेदामध्ये बेदाण्याला महत्त्व आहेच. शरीराची रोजची झीज भरून काढण्यासाठी बेदाणा उपयुक्त तर आहेच, पण जिभेवर रेंगाळणारी चव देण्याची क्षमताही बेदाण्यामध्ये आहे. च्यवनप्राशसारख्या आयुर्वेदिक औषधामध्ये बेदाण्याचा मूलभूत घटक म्हणून वापर करण्यात येतो. सुक्या मेव्यातील अन्य घटकापेक्षा बेदाणा स्वस्त असल्याने याचा भरपूर वापर यामध्ये करण्यात येतो.

बेदाण्याचा

नाशिकनंतर सांगली जिल्ह्यात बेदाणानिर्मिती

महाराष्ट्रात नाशिक, तासगाव (सांगली), पंढरपूर आणि विजापूर ही बेदाणा निर्मितीची मुख्य केंद्रे आहेत. यापैकी तासगावचा बेदाणा हा अन्य ठिकाणच्या बेदाण्यापेक्षा सरस ठरतो. याचे कारण इथल्या माती, हवा आणि पाणी यामध्ये आहे. कोरडे आणि शुष्क हवामान, निचऱ्याची जमीन आणि प्रदूषणमुक्त पाणी हे मूलभूत घटक मुबलक असल्याने बेदाण्याचा दर्जा कायम ठेवण्यात येथील शेतकरी यशस्वी होत आहेत.

उत्तम दर्जाचा बेदाणा कोणता?

ज्या बेदाण्यात गर आणि गोडी जास्त, चिकटपणा कमी एकसारखा गोल बेदाणा असेल तर तो उत्तम दर्जाचा बेदाणा मानला जातो. ज्या द्राक्ष मण्यामध्ये पाणी जादा असते गर कमी असतो, तो निम्न स्तराचा बेदाणा म्हणून प्रतवारी निश्चित करता येते. प्रतवारीनुसार बेदाण्याचे दर निश्चित होते.

हे देखील वाचा: Sangli Crime : गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जून 2024 अखेर सांगली जिल्ह्यातील गुन्ह्यात घट / A reduction in crime

बेदाणा कसा तयार होतो?

हिरवा आणि पिवळा अशा दोन पद्धतीचा बेदाणा तयार करण्यात येतो. फळछाटणीनंतर किमान १२० दिवस झाल्यानंतर द्राक्ष मण्यामध्ये साखर निर्मिती होते. बेदाण्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या द्राक्षामध्ये २२ ब्रिक्स आढळले, की माल बेदाण्यासाठी तयार झाल्याचे मानले जाते.

द्राक्ष वेलीवरून काढल्यानंतर त्यातील पाण्याचा भाग लवकर निघून जावा यासाठी डिपिंग ऑइल आणि पोटॅशियम काब्रेनेटच्या द्रावणामध्ये बुडवले जाते. त्यानंतर सुकविण्यासाठी रॅकवर द्राक्षे पसरली जातात. जर तपमान ३० ते ३२ सेल्सियस असेल तर नवव्या दिवशी बेदाणा तयार होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !