जत

मृत इंदुमती टेलरिंगचा व्यवसाय करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या

आयर्विन टाइम्स /जत
जत तालुक्यातील खंडनाळ (ता. जत) येथे नातेवाइकांना भेटण्यास गेलेल्या महिलेचा घरापासून जवळच असलेल्या विहिरीत मृतदेह आढळला आहे. इंदुमती पांडुरंग बिराजदार (वय ४० रा. खंडनाळ) असे त्यांचे नाव आहे. बुधवारी (ता. १०) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याबाबत उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

दरम्यान, नातेवाइकांनी इंदुमती यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. याबाबत उमदीचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांनी तपास सुरू असल्याचे सांगितले. घटनास्थळी व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जत पूर्व भागातील खंडनाळ येथील पाटील वस्तीवर मृत इंदुमती कुटुंबासमवेत राहतात. टेलरिंगचा व्यवसाय करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. काल मंगळवारी रात्री एका नातेवाइकाना भेटायला जातो म्हणून त्या गावी गेल्या होत्या. नातेवाइकांना भेटून रात्री साडेनऊच्या सुमारास घराकडे निघाल्या.

दहा वाजले तरी आई घरी न आल्याने मुलाने फोन केला. पण फोन बंद लागत होता. तिचा रात्री वस्तीवर रात्री वस्तीवर व आजूबाजूला शोध घेतला असता मिळून आली नाही. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास तिचा मृतदेह पाटील वस्तीलगत एका विहिरीत आढळला. गुरे चारण्यास गेलेल्या व्यक्तीने ही घटना पोलिसपाटील नवनाथ पुजारी सांगितली. पोलिसपाटील पुजारी यांनी उमदी पोलिसांना घटना सांगितली. मृत इंदुमती यांच्या मागे पती, मुलगा, सून, तीन मुली असा परिवार आहे.

जत

जत जवळ टायर फुटून बोलेरो झाडावर आदळली; दोन ठार

विजापूर – गुहागर मार्गावरील जत शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हवालदार वस्ती जवळ बोलोरो गाडीचे टायर फुटून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. राजेंद्र आनंदराय बिराजदार (वय 35 रा. उटगी) व दर्याप्पा संगप्पा बिराजदार (वय 34 रा. जाडर बोबलाद) असे मयत झालेल्यांची नावे आहेत. तर संजय हनुमंत कोळगिरी रा. उटगी हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

अधिक माहिती अशी, उटगी येथील हे तिघेही मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास कोल्हापूर येथे देवदर्शनासाठी बुलेरो गाडी क्रमांक (एम. एच. 04/2121) मधून निघाले होते. जत नागज रस्त्यावरून त्यांची गाडी भरधाव वेगात जात असतानाच, गाडीचे टायर फुटल्याने ती झाडावर जाऊन आदळली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. रात्री अकराच्या सुमारास घडलेली घटना 12:30 च्या आसपास एका वाहनधारकाला लक्षात आल्याने त्यांनी जत पोलिसांना माहिती दिली.

जत

त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन तिघांनाही बाहेर काढले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. पहाटे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यातील मयत राजेंद्र यांचे उटगी येथे कृषी दुकान आहे. तर अन्य दोघे शेती करतात. या घटनेने उटगी व जाडर बोबलाद परिसरात हळूहळू व्यक्त होत आहे.

कोकळेत पूर्ववैमनस्यातून खुनीहल्ल्यात एक जण जखमी

पूर्ववैमनस्यातून एकावर कुऱ्हाडीने व धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. सुशांत अनिल महाजन (रा. कोकळे) असे जखमीचे नाव असून ही घटना कोकळे (ता. कवठेमहांकाळ) येथे मंगळवारी (ता. ९) रात्री साडेनऊ वाजता ओलेकर मळा येथे घडली. यातील संशयित भीमराव बाळासाहेब ओलेकर, अक्षय बाळासाहेब ओलेकर यांच्यावर कवठेमहांकाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील संशयित अक्षय ओलेकर यास पोलिसांनी अटक केली आहे.

हे देखील वाचा: Maharashtra GR: मुलींना ‘व्यावसायिक’च शिक्षण मोफत: 8 लाख उत्पन्नाची मर्यादा; कला, वाणिज्य व विज्ञान शाखा वगळल्या; काय आहे शासन निर्णय जाणून घ्या

याची फिर्याद प्रशांत अनिल महाजन (कोकळे) यांनी कवठेमहांकाळ पोलिसात दिली आहे. याबाबत पोलिसांतून समजलेली अधिक माहिती अशी की, जखमी सुशांत हा त्याचे मित्र पवन हिप्परकर, विकास बंडगर, रुपेश कांबळे, अमित कदम, योगेश ओलेकर यांच्यासह संशयिताने अमित कदम याला कन्या शाळा, कोकळे येथे झालेल्या वादाचा जाब विचारण्याकरिता त्यांच्या ओलेकर मळा येथील घरी गेले होते.

यावेळी संशयितांनी संगनमत करून यातील आणखी एक संशयित भीमराव कोळेकर याने सुशांत महाजन याच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला, तर अन्य संशयित अक्षय ओलेकर याने हातातील धारदार शस्त्राने छातीवर, पायावर व डाव्या हातावर वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. हा खुनीहल्ल्याचा प्रयत्न मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान ओलेकर मळा येथे घडला, अशी फिर्याद प्रशांत अनिल महाजन याने कवठेमहांकाळ पोलिसांत दिली आहे.

त्यानुसार आज कवठेमहांकाळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी महाजन याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस कर्मचारी अधिक तपास करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !