मुली

अनाथ मुले व मुलींनाही उच्च शिक्षणाच्या शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये १०० टक्के सवलत

मुलींना शिक्षणात प्रोत्साहन मिळावे, यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून मोफत शिक्षण योजना लागू करण्यात आली. ही योजना केवळ व्यवसायिक अभ्यासक्रमासाठीच लागू करण्यात आली आहे. ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा मुलींनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. कला, वाणिज्य व विज्ञान शाखांतील विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या ईडब्लूएस, एसईबीसी, ओबीसी मुलींना उच्च शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये १०० टक्के सवलत मिळणार आहे. यात अनाथ मुले व मुलींनाही उच्च शिक्षणाच्या शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये १०० टक्के सवलत दिली जाणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या, तसेच महिला सक्षमीकरणांतर्गत आर्थिक पाठबळाअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून राज्यातील मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची घोषणा केली होती. या निर्णयाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

मुली

जाणून घ्या कसे आहे योजनेचे स्वरूप?

■ १) राज्यातील शासकीय महाविद्यालये, अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशतः अनुदानित (टप्पा अनुदान) व कायम विनाअनुदानित महाविद्यालये / तंत्रनिकेतने / सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांस लाभ मिळणार आहे. यातून खासगी अभिमत विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळली आहेत.

■ २) शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेशित विद्यार्थ्यापैकी, ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या मुलींना व्यावसायिक शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या ५० टक्के लाभाऐवजी १०० टक्के सवलत दिली जाणार आहे.

हे देखील वाचा: news quickly: बुधवार 10 जुलै: बातम्या वाचा फटाफट; आंतरराष्ट्रीय ते गावपातळीपर्यंत

■ ३) यातून व्यवस्थापन कोट्यातील व संस्थास्तरावरील प्रवेश वगळण्यात आली आहेत. यासाठी राज्य सरकारने ९०६.०५ कोटी रुपये अतिरिक्त आर्थिक भारास मान्यता दिली आहे. हा लाभ शैक्षणिक वर्ष २०२४- २५ पासून लागू असणार आहे. त्यामुळे कला, वाणिज्य आणि विज्ञान आदी पारंपरिक शाखांतील अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या मुलींना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

राज्यातील महायुती सरकारने व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग तसेच इतर मागास वर्ग या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कात ५० टक्केऐवजी १०० टक्के सवलत देण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती.

त्याबाबतचा शासन निर्णय जारी झाल्याने या घोषणेची आता प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे. लाभार्थीना शासनाशी निगडित सर्व मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या कॉलेजेसमध्ये या निर्णयानुसार सवलत प्राप्त करून घेता येईल. या निर्णयामुळे मराठा, ओबीसी समाजासह गरीब कुटुंबातील मुलींच्या शिक्षणाचा खर्च कमी झाला आहे.

मुली

पारंपरिक शाखांतील विद्यार्थिनी वंचित

■ ही योजना केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच लागू आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये मुलींचे प्रमाण ३६ टक्के इतके मर्यादित आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी, मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी मिळण्यासाठी, महिला सक्षमीकरणाअंतर्गत आर्थिक पाठबळाऐवजी, मुली व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून वंचित राहू नयेत म्हणून राज्य मंत्रिमंडळाच्या ५ जुलै रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.

जाणून घ्या कशी आहे योजना?

■ ही योजना केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच लागू आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये मुलींचे प्रमाण ३६ टक्के इतके मर्यादित आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी, मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी मिळण्यासाठी, महिला सक्षमीकरणाअंतर्गत आर्थिक पाठबळाऐवजी मुली व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून वंचित राहू नयेत, म्हणून राज्य मंत्रिमंडळाच्या ५ जुलै रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे कला, वाणिज्य आणि विज्ञान आदी पारंपरिक शाखांतील अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या मुलींना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

मुलींना

या योजनेसाठी उत्पन्नाची अट काय आहे?

शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रिभूत प्रवेशप्रक्रियेद्वारे प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी, ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशांनाच व्यावसायिक शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या ५० टक्के लाभाऐवजी १०० टक्के सवलत दिली जाणार आहे. यातून व्यवस्थापन कोट्यातील व संस्था स्तरावरील प्रवेश वगळण्यात आली आहेत. यासाठी राज्य सरकारने ९०६.०५ कोटी रुपये अतिरिक्त आर्थिक “भारास मान्यता दिली आहे. हा लाभ शैक्षणिक वर्ष २०२४- २५ पासून लागू असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !