राशिभविष्य आजचं 9 जुलै 9 जुलै 2024: आज वार मंगळवार दि. ९ जुलै २०२४ आषाढ शुक्ल चतुर्थी १९४६ नक्षत्र: आश्लेषा चंद्ररास: सिंह सूर्योदय: ६ वाजून ९ मिनिटांनी सूर्यास्त: ७ वाजून ६ मिनिटांनी विनायक चतुर्थी राहू काल : दुपारी ३:०० ते दुपारी ४:३० आजचे राशीभविष्य सूचित करते की 9 जुलै रोजी कर्क, सिंह राशीसह 4 राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल. आजच्या राशीभविष्यातील तुमचे भविष्य जाणून घ्या (Today’s Horoscope 9th July)…
राशिभविष्य आजचं 6 जुलै मेष (Aries)
आजचे मेष राशीभविष्यनुसार, अहंकाराला तुमच्या जीवनावर वर्चस्व गाजवू देऊ नका, अन्यथा नातेसंबंध कमकुवत होतील. सामाजिक कार्यक्रमांना हजेरी लावाल घराच्या सजावटीवर पैसा खर्च होईल. अर्थप्राप्ती चांगली असेल. कामातील उत्साह वाढेल.
राशिभविष्य आजचं 6 जुलै वृषभ (Taurus)
आजच्या वृषभ राशीनुसार शक्यतो चुका करणे टाळा मोठी मानहानी होऊ शकते. तुम्हाला तुमच्या सवयींमुळे आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल आणि मुलांशी संबंधित समस्या असतील. वडिलांच्या प्रकृतीची चिंता राहील आणि व्यवसायात प्रगतीच्या नवीन संधी मिळतील.
राशिभविष्य आजचं 6 जुलै मिथुन (Gemini)
आजच्या मिथुन राशीनुसार अडलेली कामे मार्गी लागतील, कार्यात यश मिळेल. तुमच्या बोलण्यात गोडवा आणा, बोलण्यापूर्वी विचार करा. तुमच्या जीवनसाथीच्या आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील. कुटुंबासोबत प्रवासाची शक्यता आहे. व्यवसायाच्या विस्तारासाठी तुम्हाला कर्ज घ्यावे लागेल.
राशिभविष्य आजचं 6 जुलै कर्क (Cancer)
कर्क आजच्या राशीनुसार कुटुंबात शुभ कार्ये आखली जातील. विवाहासाठी अनुकूल काळ आहे. धार्मिक कार्यात रस वाढेल. आर्थिक गुंतवणूक लाभदायक होईल. न्यायालयीन बाजू भक्कम असेल. स्पर्धा परीक्षेत मनाप्रमाणे यश मिळेल. वरिष्ठ खुश असतील.
राशिभविष्य आजचं 6 जुलै सिंह (Leo)
सिंह आजच्या राशीनुसार, तुमच्या सवयींमुळे तुम्ही अडचणीत येऊ शकतात. मित्रांच्या माध्यमातून प्रलंबित कामे पूर्ण होतील; प्रेम प्रकरणात अपमानित व्हावे लागेल. आर्थिक लाभ मिळेल. मनाप्रमाणे खरेदी करता येईल, मौल्यवान वस्तूंचा लाभ.
कन्या (Virgo)
आजच्या कन्या राशीनुसार तुमच्या गोड बोलण्याने लोक प्रभावित होतील. तुमच्या घर आणि जमिनीशी संबंधित प्रकरणांमध्ये गती येईल. प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी काळ अनुकूल आहे. आपल्याला पेलणारीच कामे हाती घ्या, अन्यथा मानसिक त्रास होईल.
तुळ (Libra)
आजच्या तुला राशिनुसार कामाचा तणाव जाणवेल, दगदग वाढेल. संयमी राहा. कोणाशीही बोलण्यापूर्वी विचार करा. वडिलांच्या तब्येतीची चिंता राहील. जोडीदारासोबतचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील, कौटुंबिक समारंभात सहभागी व्हाल. प्रवास संभवतो.
हे देखील वाचा: राशिभविष्य आजचं 8 जुलै: मेष, मीनसह 4 राशी आर्थिक लाभ होईल, करिअरमध्ये यश मिळेल, जाणून घ्या इतर लोकांनी आजच्या राशीत तुमचे भविष्य
वृश्चिक (Scorpio)
वृश्चिक आजच्या राशीनुसार, जवळील व्यक्तीकडून धोका संभवतो. सावध राहून कामे करा. वडिलधाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे धार्मिक कार्यात रुची वाढेल. मुलांशी संबंधित बाबींमध्ये तुम्ही चिंतेपासून मुक्त व्हाल.
धनु (Sagittarius)
आजच्या धनु राशीनुसार तुमच्या वागण्याने लोक प्रभावित होतील. कोणाचेही नुकसान करण्याचा विचार करू नका. कुटुंबातील हालचालींवर लक्ष ठेवा, अंदाज खरे ठरतील. तरुणांसाठी काळ चांगला आहे, त्यांना प्रेमप्रकरणात यश मिळेल. व्यवसायात लाभ होईल.
मकर (Capricorn)
आजच्या मकर राशीनुसार, करत असलेल्या अभ्यासाला महत्त्व द्या, भौतिक गोष्टीत रमू नका. दीर्घकाळ चाललेल्या समस्या संपतील, लोक तुमच्या वागणुकीला दाद देतील. व्यवसायात प्रगती होईल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. वेळ योग्य आहे.
कुंभ (Aquarius)
मंगळवारच्या राशीभविष्यानुसार दैनंदिन व्यवहारात बदल होईल. आरोग्यात लाभ होतील, मुलांच्या वागण्याने तुम्ही आनंदी व्हाल. तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीत सुधारणा होईल. प्रवासाची शक्यता आहे. वादविवाद टाळा, गॉड बोलून कामे करून घ्या. हिताचे ठरेल.
मीन (Pisces)
मीन राशीनुसार आज खूप काम असेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या, धावपळ होईल. लांबच्या प्रवासाची शक्यता आहे, धार्मिक कार्यात वेळ जाईल. वाहन आणि जमिनीशी संबंधित कामे पूर्ण होतील, मुलांच्या लग्नाची चिंता राहील.
आजचा दिनविशेष: मुंबई शेअर बाजाराची सुरुवात
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजची इमारत असो किंवा शिंग उचलून वर उडवायला तयार असलेल्या बैलाची प्रतिमा… शेअर मार्केट म्हटलं की आपल्या सर्वांच्या डोळ्यांसमोर हे चित्र येतं. एकेकाळी शेअर बाजार हा फक्त श्रीमंत उच्च वर्गाने विचार करण्याचा विषय आहे, असं मानलं जाई. मुंबई शेअर बाजारचा इतिहास अत्यंत रोचक आहे. कधीकाळी झाडाखाली शेअर बाजाराचे सौदे होत होते. गेल्या १५० वर्षांत मुंबई शेअर बाजार पार बदलून गेला आहे. सध्या बाजारात सुगीचे दिवस आहे. देशातील शेअर बाजाराची ओळख अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने होते. बीएसई केवळ भारताचा नाही तर आशियाचा पण जुना स्टॉक एक्सचेंज आहे.
हे देखील वाचा: Good news! मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा अध्यादेश जारी; शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कमध्ये 100 टक्के लाभ
मुंबई शेअर बाजाराची सुरुवात एका वडाच्या झाडाखाली ९ जुलै १८७५ रोजी झाली होती. केवळ ५ लोकांनी बीएसईचा पाया घातला होता. १९८० मध्ये बीएसईचे कार्यालय पीजे टॉवर्समध्ये शिफ्ट करण्यात आले. बीएसईची स्थापना कॉटन किंग वा बिग बुल प्रेमचंद रॉयचंद यांनी केल्याचे मानण्यात येते. शेअर दलाल ओरडून गुंतवणूकदारांना सौद्याची माहिती देत होते. येथेच सगळं व्यापार होत होता. दलालांची संख्या सातत्याने वाढत गेल्यावर या परिसराला दलाल स्ट्रीट असे नाव देण्यात आले.
९ जुलै, १८७५ रोजी दलालांनी द नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन या नावाने कामाला सुरुवात केली. ऑ गस्ट १९५७ मध्ये बीएसई सिक्योरिटीज कॉन्ट्रक्टस रेग्युलेशन अॅक्ट अंतर्गत भारत सरकारने मान्यता दिली. सरकारने मान्यता दिलेला हा पहिला स्टॉक एक्सचेंज आहे.