राशिभविष्य आजचं 8 जुलै 2024: आज वार सोमवार दि. ८ जुलै २०२४ आषाढ शुक्ल तृतीया १९४६ नक्षत्र: आश्लेषा चंद्ररास: कर्क सूर्योदय: ६ वाजून ९ मिनिटांनी सूर्यास्त: ७ वाजून ७ मिनिटांनी स्थावर खरेदी,विक्रीसाठी शुभ. आजचे राशिभविष्य दर्शवते की 8 जुलै रोजी मेष, मीन राशीसह 4 राशींना आर्थिक लाभ होऊ शकतो. इतरांनीही त्यांचे भविष्य जाणून घ्या… (Today’s Horoscope 8th July)
राशिभविष्य आजचं 6 जुलै मेष (Aries)
मेष राशीच्या आजच्या राशीनुसार 8 जुलै रोजी मेष राशीच्या लोकांच्या दिवसाची सुरुवात नवीन संकल्पांनी होईल. फायदेशीर योजनेत भांडवल गुंतवाल. विचारपूर्वक वचने द्या आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आर्थिक स्थिती मजबूत होईल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जावे लागेल. शिक्षण अथवा अभ्यासाविषयीसंबंधी येणाऱ्या अडचणी दूर होतील.
राशिभविष्य आजचं 6 जुलै वृषभ (Taurus)
आजच्या राशीनुसार वृषभ, 8 जुलै रोजी वृषभ राशीच्या लोकांचा जीवनसाथीसोबत लांबचा प्रवास होईल. युवकांना आपले ध्येय साध्य करण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. नवीन संपर्क तुमच्या नशिबात उपयुक्त ठरतील. मित्रांच्या सहकार्याने कामे मार्गी लागतील आणि खर्च वाढतील. नमानाप्रमाणे घडतील परंतु विलंब होईल. संयम ठेवा.
राशिभविष्य आजचं 6 जुलै मिथुन (Gemini)
आजच्या मिथुन राशीभविष्यानुसार 8 जुलै रोजी काळ अनुकूल राहील. राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. संघर्षाची परिस्थिती तुमच्यासाठी लाभदायक ठरणार नाही. भेटवस्तू आणि सन्मानाचा लाभ मिळेल. प्रवासात सामानाची काळजी घ्या, चोरी किंवा हरवण्याची शक्यता आहे. गुप्त शत्रूंवर मात करता येईल, शत्रूचे बळ कमी होईल.
राशिभविष्य आजचं 6 जुलै कर्क (Cancer)
कर्क राशीच्या आजच्या राशीनुसार 8 जुलै रोजी तुमच्यासाठी प्रगतीची शक्यता आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल. शुभ प्रवासाची शक्यता आहे. व्यावसायिक कामात प्रगती पाहून आनंद होईल. अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी तुम्हाला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. आरोग्य चांगले राहील. एखाद्याची चेश्टा-मस्करी करणे शक्यतो टाळा. मानसिक त्रास होऊ शकतो.
राशिभविष्य आजचं 6 जुलै सिंह (Leo)
आजच्या राशीनुसार 8 जुलै रोजी ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला न ऐकणे मोठे नुकसानदायी ठरेल. कामाला गती मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि बेरोजगारांना नोकऱ्या मिळतील. तरुणांना शिक्षणासाठी परदेशात जावे लागेल. भावनिक संबंध नातेसंबंधात बदलू शकतात. प्रवास शक्य आहे.
कन्या (Virgo)
आजच्या कन्या राशीनुसार 8 जुलै रोजी ऐनवेळी प्रिय व्यक्तीची साथ न लाभल्यामुळे निराशा जाणवेल. रागावर नियंत्रण ठेवा. तुमच्या असभ्य वर्तनाने तुम्ही तुमच्या प्रियजनांना नाराज कराल. नातेसंबंध सुधारण्यासाठी पुढाकार घ्याल. विवाह चर्चेत यश मिळाल्याने तरुणांना आनंद होईल. गरजूंना मदत करण्यात आनंद होईल.
तुळ (Libra)
आजच्या राशीभविष्यानुसार, 8 जुलै, सोमवारी कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण राहील. जोडीदाराशी मतभेद, वादविवाद होऊ शकतो. अपत्य सुख संभवते. चांगली बातमी कळेल आणि फायदेशीर सौदा हाती येईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या राशीनुसार वृश्चिक राशीच्या लोकांनी वेळेचा सदुपयोग करायला शिका. तुमच्या माघार घेण्याने कौटुंबिक वादविवाद मिटेल. प्रत्येकजण तुमच्या निरागसतेचा फायदा घेईल. अधिकाऱ्यांकडून तुम्हाला आश्वासन मिळेल. आकस्मिक घटना तुम्हाला त्रास देतील. वाढता खर्च भागवण्यासाठी तुम्ही नवीन काम हाती घ्याल. तुम्हाला वैवाहिक सुख मिळेल आणि तुमचे आरोग्य चांगले राहील.
धनु (Sagittarius)
धनु राशीच्या आजच्या राशीभविष्यनुसार सोमवारी काही मोठा आर्थिक लाभ होईल. पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. प्रवासात काही नवीन ओळखी होतील. आयुष्यात प्रिया व्यक्तीचे आगमन होईल. तुम्हाला व्यवसायात यश मिळेल. लेखन आणि कलेशी संबंधित लोकांना सन्मान मिळेल. तुमची वचने पूर्ण केल्याने तुम्हाला आनंद मिळेल. धार्मिक कार्यक्रमात रुची वाढेल.
मकर (Capricorn)
सोमवारच्या तुमच्या राशीनुसार 8 जुलै रोजी या राशीच्या लोकांना सकारात्मक विचार दाखवावा लागेल, यामुळे तुम्हाला पुढे जाण्यास मदत होईल. जर तुम्ही मनापासून काम केले तर तुम्ही तुमचे इच्छित ध्येय साध्य कराल. गप्प बसण्यापेक्षा आपले मत व्यक्त करा, गैरसमज दूर होतील. नोकरीमध्ये तुम्हाला चांगले पर्याय मिळतील. तुमचे आरोग्य ताजे राहील. वैवाहिक चर्चेत यश मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल. शुभ घटना घडतील. कामातील अडचणी दूर होतील.
कुंभ (Aquarius)
सोमवार कुंभ राशीनुसार 8 जुलै रोजी कामाच्या ठिकाणी वातावरण तापू शकते. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी व अधिकार प्राप्त होतील. सगळ्यांना सोबत घेणे चांगले. बिझनेस ट्रिप होईल. वेळेवर मदत मिळाल्याने कामे पूर्ण होतील. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल.
मीन (Pisces)
मीन राशीनुसार, तुम्हाला असे वाटते की तुमच्या आयुष्यात एक दिवस चमत्कार घडेल आणि तुम्ही श्रीमंत व्हाल. मात्र तुम्ही कठोर परिश्रम केले तरच तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने घरातील कामे पूर्ण कराल. काळ चांगला जाईल, तरुणांना रोजगार मिळाल्याने आनंद होईल. आलेल्या परिस्थितीला संयमाने हाताला, न्याय मिळेल.