३४ किलो ५०५ ग्रॅम वजनाचा ८,७२,५०० रू. किंमतीचा गांजा जप्त
आयर्विन टाइम्स
सांगली,(प्रतिनिधी):
ओरिसा राज्यातून तस्करी मार्गाने गांजा आणून विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीला जेरबंद करण्यात सांगली जिल्ह्यातील तासगाव पोलीस ठाण्याला यश आले आहे. त्यांच्याकडून तब्बल १४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. १) मनोज संभाजी नागणे (वय ३६ वर्षे रा. महूद बुद्रुक ता. सांगोला जि. सोलापूर) २) ज्ञानेश्वर महादेव काळे (वय ३० वर्षे) ३) वैष्णव नाना लावंड (वय २१ वर्षे) ४) अजय हणमंत काळे (वय ३० वर्षे – आरोपी क्र. २ ते ४ रा. नरसिंगपूर ता. इंदापूर जि. पुणे ) या आरोपीना अटक करण्यात आली आहे.
गांजाची तस्करी करणारी आंतरराज्य टोळी
आरोपींकडून ८ लाख ७२ हजार ५०० रुपयांचा एक प्लॅस्टिकचे पिशवीमध्ये काळपट हिरवट रंगाचा गांजा वनस्पतीचा पाला त्याचे वजन ३४ किलो ५०५ ग्रॅम असलेले, प्रति किलो २५,०००/- रुपये विक्री दराने, ४०,००० रूपये एक देशी बनावटीचे मॅग्झीन असलेले स्टिलचे पिस्तुल, १६००/- दोन पिवळसर धातुचे पिस्टलमधील राऊंड, ४ लाख ५० हजार ००० रुपये किंमतीची एक हयुन्डाई कंपनीची पांढ-या रंगाची एक्सेंट चारचाकी गाडी ( एम.एच ०१ सी. व्ही ४४१८), ४५ हजार ००० रु. किंमतीची एक बजाज कंपनीची विना नंबरची डिस्कव्हर मोटरसायकल असा एकूण १३ लाख ९९ हजार २२५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यातील तासगाव पोलिसांची कारवाई
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, गोपनीय बातमीदारा मार्फत गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदार अमरसिंह सुर्यवंशी पोलीस हेडकॉन्स्टेबल यांना माहीती मिळाली की, मनोज संभाजी नागणे वय ३६ वर्षे रा. महूद बुद्रुक ता. सांगोला जि. सोलापूर हा विना नंबरच्या मोटरसायकलवरून गांजा विक्री करण्याकरीता तासगांव ते भिवघाट जाणारे डांबरी रोडचे बाजूस बिरणवाडी फाटा येथे येणार आहे. तात्काळ अमरसिंह सुर्यवंशी पोलीस हेडकॉन्स्टेबल यांनी बातमीची माहिती पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांना दिली.
चारचाकी, मोटारसायकल आणि पिस्तूल जप्त
त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. वाघ यांनी बिरणवाडी फाटा येथे वॉच केला असता मनोज संभाजी नागणे हा त्याचेकडील मोटरसायकलला पांढ-या पिशवीत गांजा घेवून उभा असलेला दिसला तसा त्याचा संशय आल्याने त्यास छापा टाकुन जागीच पकडले, त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात मिळुन आलेली पांढ-या रंगाची पिशवी उघडुन पाहता त्यामध्ये पिशवीत काळपट हिरवट रंगाचा ०४ किलो १० ग्रॅम वजनाचा गांजा वनस्पतीचा पाला व मोटरसायकल मिळुन आली.
सर्व आरोपी सोलापूर, पुणे जिल्ह्यातील
अधिक तपास केला असता त्याने त्याचे मित्राचे घरी महूद बुद्रूक येथे आठ किलो गांजा ठेवला असल्याचे सांगितले. छापा टाकून तो जप्त करण्यात आला. तसेच त्याचेकडील गांजा हा अंमली पदार्थ ज्ञानेश्वर महादेव काळे रा. नरसिंगपूर ता. इंदापूर जि. पुणे याचेकडून आणलेबाबत सांगितलेने सदर आरोपी यास मुहूद बुद्रूक ता. सांगोला जि. सोलापूर येथून ताब्यात घेवून त्याचेकडे अधिक तपास केला असता त्याने मी व वैष्णव नाना लावंड रा. नरसिंगपूर ता. इंदापूर जि. पुणे असे मिळून गांजाची विक्री करीत असतो असे सांगितले.
तासगांव पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील कर्मचारी यांनी तपासी अधिकारी राजू अन्नछत्रे यांचे मार्गदर्शनाखाली अकलूज पोलीस ठाणे हद्दीत पंचवीस चार लवंग या गावी सापळा रचून वैष्णव लावंड व त्याचा साथीदार अजय हणमंत काळे यांना त्याचेकडील चारचाकी गाडी नं. एम. एच ०१ सी. व्ही ४४१८ सहीत ताब्यात घेतले असता वैष्णव लावंड याचे अंगझडतीत त्याचे कमरेला गावटी पिस्टल व त्याचे ताब्यातील चारचाकी गाडीत २२ किलो ४५० ग्रॅम गांजा हा अमली पदार्थ मिळून आला आहे.
रिव्हॉल्व्हरच्या धाकाने खंडणी मागणाऱ्यास अटक
खुनाची सुपारी घेतल्याचे सांगून रिव्हॉल्व्हरचा धाकाने १२ लाखांची खंडणी उकळणाऱ्या टोळीतील पसार संशयित बंडू उर्फ फिरोज शेख (धावडवाडी, ता. जत) याला संजयनगर पोलिसांनी अटक केली. त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. पोलिसांनी सांगितले, की उद्योजक अख्तरमिया शेख यांची आणि संशयित यासीन खलील इनामदार ( हडको कॉलनी, सांगली) याची ओळख होती. इनामदार याने शेख यांना दि. १० मे रोजी ‘तुला ठार मारण्याची सुपारी पुण्यातील एका पार्टीकडे देण्यात आली आहे’ असे सांगितले.
घाबरलेल्या शेख यांनी पुण्यातील पार्टीला भेटून चर्चा करू या, असे सांगितले. त्यानंतर सुपारी घेतलेल्या पुण्यातील चौघांनी शेखकडे ६० लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर १७ मे रोजी जीवे मारण्याची धमकी देऊन पाच जणांनी तुरची फाटा येथे त्यांच्याकडून १२ लाख रुपयांची खंडणी उकळली. संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली. त्यानंतर अटक करण्यात आली.