८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर रोज रात्री ९.०० वा. आपल्या भेटीला
सध्या विविध चॅनेल्सवर विविध धाटणीचे विषय पाहायला मिळतात. यातील नायक-नायिका तर चाहत्यांच्या आवडीच्या असतातच पण त्याचबरोबर प्रेक्षकांना खलनायकांच्या भूमिकाही आवडतात. अभिनेत्री प्रिया मराठेने अनेक गाजलेल्या मराठी, हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. प्रियाने आतापर्यंत विविध प्रकारच्या भूमिका तसेच खलनायकी भूमिकाही साकारल्या आहेत. लवकरच प्रिया मराठे सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत झळकणार आहे.
‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेच्या घोषणेपासूनच ही एआय मालिका नेमकी कशी असेल? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. मालिका विश्वात एआयवर आधारित असलेली ही जगभरातली पहिलीच मालिका आहे. ही मालिका येत्या ८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर रोज रात्री ९.००वा. आपल्या भेटीला येणार आहे. मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर आहेत.
या मालिकेत प्रिया मराठे खलनायिका साकारणार आहे. ‘रागिणी अग्निहोत्री’ असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. प्राध्यापिका असणारी रागिणी अभिमन्यू राजेशिर्केच्या प्रेमात पडते आणि त्याला मिळवण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असणारी रागिणी काय आणि कशाप्रकारे षडयंत्र रचते ? ते मालिकेत पहाता येणार आहे. रागिणीच्या येण्याने अभिमन्यू आणि गौरीच्या आयुष्यात काय उलथापालथ होणार? गोड बोलून रागिणी आपला डाव कसा साधणार? हे दाखवताना प्रेमाच्या कसोटीवर कोण कसं खरं उतरणार? याची रंजक कथा मालिकेत पहायला मिळणार आहे.
‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत काम करायला, त्यातही निगेटिव्ह रोल करायला प्रिया मराठे खूपच उत्सुक असून आपल्या या भूमिकेबद्दल प्रिया सांगते कि, जर त्या भूमिकेचं कथेतील महत्त्व जास्त असेल तर ती भूमिका करणं मला आवडतं. माझ्यासाठी त्या भूमिकेचं कथेतील स्थान जास्त महत्त्वाचं असतं, जेणेकरून मला तिथे अभिनयासाठी जास्त चांगला वाव मिळेल. भूमिका स्वीकारताना ती भूमिका काय आणि किती महत्त्वाची आहे याकडे माझं लक्ष असते. मालिकेत मी साकारत असलेली भूमिका खूप अनपेक्षित वळण घेऊन येणार आहे. या भूमिकेबद्दलची हीच गोष्ट मला जास्त आवडली.
“नातं जपण्यासाठी सोबत हवी असते फक्त निरंतर प्रेमाची..! कारण, जगायला श्वासाची नाही तर, प्रेमाची गरज असते!” ‘तू भेटशी नव्याने’ या शीर्षकाप्रमाणेच नव्या रूपात नव्या वळणार होणारी ही भेट नेमकी कशी असेल? या प्रेमकथेचे रंग कसे बहरणार? हे सर्व अनुभवण्यासाठी येत्या ८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर रोज रात्री ९.०० वा. प्रसारित होणारी ‘तू भेटशी नव्याने’ ही मालिका नक्की पहा.
‘बाई गं’ हा चित्रपट १२ जुलैला प्रदर्शित होणार
प्रत्येक कपलची लव्ह स्टोरी खास असते पण जेव्हा त्या लव्ह स्टोरी मध्ये एखादी बायको रुसते तेव्हा नवऱ्याला दिवसात पण तारे दिसतात ह्यात काही शंका नाही. वाघाचा डॉगी या गाण्यातसुद्धा अभिनेता स्वप्नील जोशीची हालत अशीच काहीशी झाली आहे. लग्नानंतरच्या रुसवारुसवीनंतर एकाद्या नवऱ्याची कशी तऱ्हा होते हे ह्या गाण्यात आपण पाहू शकतो. बसल्या जागी तो बिचारा पूर्णपणे फसलाय. जय अत्रे ह्यांनी लिहिलेलें हे गाणं नकाश अझीझ आणि वृषा दत्ता ह्यांनी गायलं आहे.
‘बाई गं’ या चित्रपटात स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत असून त्याच्या सोबत इतर कलाकार जसे प्रार्थना बेहेरे, सुकन्या मोने, अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान, सागर कारंडे सुद्धा आहे. नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘बाई गं’ हा चित्रपट १२ जुलैला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.
‘एक दोन तीन चार’ चित्रपटाचं पहिलं गाणं ‘गुगली’ झाले रिलीज
निपुण धर्माधिकारी आणि वैदेही परशुरामी ही आगळीवेगळी जोडी पहिल्यांदाच मुरांबा SONG फेम दिग्दर्शक वरुण नार्वेकरच्या एक दोन तीन चार या चित्रपटातून लवकरच
प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकतंच चित्रपटाचे गुगली हे पहिले गाणे रिलीज करण्यात आले असून, हे गाणे जणू तरुण पिढीला गुगली गुगली गुगली, पडली का? उडले उडले स्टंप का ? म्हणत आव्हान देतय अस जाणवतंय.
हे देखील वाचा: नवी मालिका: ‘तू भेटशी नव्याने’; 8 जुलैपासून सोनी मराठीवर; एआयच्या माध्यमातून खुलणार अनोखी प्रेमकहाणी
गुगली ह्या अप्रतिम गाण्याला टी यांनी आपला आवाज दिला आहे. तर संगीत दिग्दर्शन सौरभ भालेराव ह्यांनी केलं आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तूत, या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे, रणजित गुगळे, केयूर गोडसे, निपुण धर्माधिकारी आणि नीरज बिनीवाले यांच्या बहावा एन्टरटेन्मेंट आणि १६ बाय ६४ यांनी केली आहे. एक दोन तीन चार १९ जुलैला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शनास सज्ज झाला आहे.
‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटात स्वप्नील जोशीसह सिद्धार्थ जाधव
मराठी चित्रपटप्रेमींचा अत्यंत आवडता चित्रपट ‘नवरा माझा नवसाचा’ २००५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सचिन पिळगावकर, अशोक सराफ आणि सुप्रिया पिळगावकर या दिग्गज कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. आजही या चित्रपटातील संवाद, गाणी आणि विनोदी प्रसंग प्रेक्षकांच्या मनात कोरलेले आहेत. सचिन पिळगावकर यांनी जेव्हा ‘नवरा माझा नवसाचा २’ची घोषणा केली, तेव्हा प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. ‘नवरा माझा नवसाचा २’मध्ये अभिनेता स्वप्नील जोशी महत्त्वाची भूमिका साकारणार असून, त्याच्यासोबत आणखी एक स्टार कलाकारदेखील असणार आहे.
हे देखील वाचा: हमिंग बर्ड: जगात तीनशेहून अधिक प्रजाती आढळतात; हा पक्षी एका सेकंदात 80 वेळा पंख फडफडावतो
नुकतेच स्वप्नील जोशीने या चित्रपटासाठी डबिंग पूर्ण केले आहे. त्यामुळे हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे सरकले आहे. स्वप्नील जोशीसह अभिनेता सिद्धार्थ जाधव ‘नवरा माझा नवसाचा २’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. अलीकडेच सिद्धार्थने सोशल मीडियावर डबिंग पूर्ण झाल्याची बातमी शेअर केली. त्याने ‘नवरा माझा नवसाचा २’चे पोस्टर आणि सचिन पिळगावकर यांच्यासोबतचे काही फोटोदेखील पोस्ट केले आहेत. डबिंग पूर्ण झाल्याचे सांगताना सिद्धार्थने या चित्रपटासाठी खूप उत्सुक असल्याचे मत व्यक्त केले आहे.