राशिभविष्य

राशीभविष्य आजचं 4 जुलै 2024: आज वार गुरुवार दि. ४ जुलै २०२४ ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी १९४६. नक्षत्र: मृग चंद्ररास : मिथुन सूर्योदय: ६ वाजून ८ मिनिटांनी सूर्यास्त: ७ वाजून ७ मिनिटांनी उत्तर रात्री ४:५९ नंतर अमावास्या राहू काल: दुपारी १:३० ते दुपारी ४:५९ कन्या आणि कुंभ राशीच्या व्यावसायिकांचे नशीब उजळेल, या दिवशी दोघांना भरपूर नफा मिळेल. इतर लोकांनीही जाणून घ्याआपले आजच्या राशीतील भविष्य (Horoscope Today 4 July)

राशीभविष्य

मेष (Aries) राशीभविष्य आजचं

4 जुलैच्या आजच्या राशीभविष्यानुसार भावनिक नात्यात जवळीक वाढेल. पात्रतेनुसार नोकरी न मिळाल्याने तरुण दु:खी राहतील. रखडलेल्या कामांना गती मिळेल. विरोधक पराभूत होतील. धनलाभ संभवतो. दूरदृष्टीने विचार करून निर्णय घ्यावे लागतील.

वृषभ (Taurus) राशीभविष्य आजचं

आजच्या राशीनुसार , आपल्या अधिकारांचा गैरवापर करू नका, नुकसान होऊ शकते. कोणी काय म्हणेल ते मनावर घेऊ नका, हा जगाचा नियम आहे, ज्या झाडांना फळे येतात त्या झाडांवर लोक दगडफेक करतात. सदाचाराचा मार्ग अवलंबावा, फायदा होईल. प्रवास संभवतो. आपल्या इच्छा , आकांक्षा व विचारांना योग्य दिशा मिळेल.

मिथुन (Gemini)

आजच्या मिथुन राशीनुसार अनुकूल काळ चालू आहे. पूर्ण ताकद लावून काम केल्यास यश मिळेल. परदेशात जाण्याचा देखील योग आहे. तुमच्या कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण करा. गुंतवणुकीत घाईमुळे त्रास होऊ शकतो. सल्ला घेऊन काम करा.

कर्क (Cancer)

आजच्या कर्क राशीभविष्य नुसार, दुसऱ्याचे ऐकून किंवा पाहून आपले वर्तन बदलू नका, तुम्ही जसे आहात तसे राहणे तुमच्या फायद्याचे आहे. जर तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करत असाल तर तुम्हाला यश मिळेल. विनाकारण वाद होऊ शकतात. कामाची दगदग वाढेल परंतु आरोग्यात चिडचिड निर्माण होईल.

सिंह (Leo)

सिंह राशीच्या आजच्या राशीनुसार आज विशेष अतिथीचे आगमन होऊ शकते. तुमच्या वरिष्ठांना आकर्षित करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कामावर असलेल्या सहकाऱ्यांना तुमच्याविरुद्ध राग आहे, सावध रहा आणि त्यांना तक्रार करण्याची संधी देऊ नका. पिवळ्या रंगाच्या वापरामुळे फायदे संभवतात. जुनी येणी वसूल होतील. आर्थिक अडचण मिटेल.

हे देखील वाचा: crime news: मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला मरेपर्यंत जन्मठेप; विशेष सत्र न्यायाधीशांनी सुनावला निकाल

कन्या (Virgo)

आजच्या कन्या राशीनुसार, कामात तुमची आवड तुमच्या अधिकाऱ्यांना प्रभावित करेल. मौल्यवान वस्तूची खरेदी करता येईल. मनोकामना पूर्ण होईल. भागीदारीतून लाभ संभवतो. धान्य व्यापाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. विवाहासाठी पात्र लोकांसाठी काळ अनुकूल आहे.

तुळ (Libra)

आजच्या तूळ राशीनुसार कोणतेही काम करण्यासाठी संयम आवश्यक आहे, वेळ मर्यादा पहा. आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी वेळ लागेल. वैयक्तिक संबंध दृढ होतील. मिळालेल्या संधीचा उपयोग करून घ्या अन्यथा नुकसान संभवते. अधिक राग येईल.

वृश्चिक (Scorpio)

आजच्या राशीनुसार आज संमिश्र अनुभव देणारा दिवस ठरेल. हताश होऊ नका. मित्रांसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण केल्याने आपोआप आनंद मिळेल, अधिक फायदा होईल. मन एकाग्र करण्यासाठी अध्यात्माची मदत घ्या, त्याचे आश्चर्यकारक फायदे होतील.

राशीभविष्य

धनु (Sagittarius)

धनु राशीनुसार गुरुवार दिवस विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. व्यवहारात संशयास्पद परिस्थिती उद्भवू शकते, काळजी घ्या. नोकरीच्या शोधात तुम्ही स्थलांतर करू शकता. चैनीच्या वस्तूंवर खर्च होईल. नियोजनाशिवाय कामाला सुरुवात करू नका.

मकर (Capricorn)

गुरुवारच्या आजच्या मकर राशीनुसार एका कौटुंबिक समारंभात सहभागी होईल. विरोधक तुमची प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न करतील. समन्वयाच्या अभावामुळे कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे. न्यायालयीन बाजू कमकुवत राहील. दुरावलेल्या व्यक्तीशी पुन्हा मैत्री होईल, अबोला सुटेल.

कुंभ (Aquarius)

कुंभ राशीनुसार आज उत्साह वाढण्याची शक्यता आहे. नवीन गोष्टी शिका परंतु जुन्याची कास सोडू नका. एखादे नवीन काम सुरू करायचे आहे, जे यशस्वी होईल. लाकूड व्यवसायाशी संबंधित लोकांना चांगला नफा मिळू शकतो. नवीन लोकांशी संपर्क वाढेल. काळ अनुकूल आहे.

मीन (Pisces)

गुरुवारच्या आजच्या मीन राशीनुसार कोणतेही काम करण्यासाठी आत्मविश्वास असला पाहिजे. धैर्याने पुढे जा, यश मिळेल. घरगुती खर्चात वाढ होईल. जुने मित्र भेटू शकतात. घाईगडबडीत चुकीचे निर्णय घेणे टाळा. धाडसाने निर्णय घेऊन कामे करा. चंचलता नुकसानदायी ठरेल.

आजचा दिनविशेष: जागतिक अदृश्य दिवस

युनायटेड स्टेट्समध्ये दरवर्षी ४ जुलै रोजी अदृश्य दिवस साजरा केला जातो. असे काही दिवस असतात जेव्हा आपल्याला अदृश्य व्हावे असे वाटते. आम्ही अदृश्य असल्यास आम्ही काय करू. तुम्ही इतर लोकांचे संभाषण ऐकून घ्याल किंवा कोणालाही न दिसता शहराभोवती फिराल. तुम्ही तुमच्या अदृश्यतेच्या सामर्थ्याचा उपयोग भल्यासाठी कराल की तुम्ही स्वार्थी व्हाल? अदृश्य दिवस आपल्याला बऱ्याच मनोरंजक शक्यतांसह सादर करतो! कारण काहीही असो आणि त्यामागचा मेंदू कोणीही असो, बहुधा आपण त्या दिवसांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे जेव्हा आपण थकलेले असतो.

काही दिवसांमध्ये आपल्याला आपले सर्वोत्तम वाटत नाही आणि आपली इच्छा असते की आपण सर्वकाही मागे सोडावे आणि हवेत अदृश्य व्हावे. परंतु जर तुम्हाला अदृश्य दिवशी गायब व्हायचे असेल, तर तुम्ही कामातून रजा घेऊन आणि तुम्हाला जे आवडते ते करण्यात दिवस घालवू शकता. तुम्ही छोट्या सुट्टीवर देखील जाऊ शकता आणि काही काळ जगापासून डिस्कनेक्ट होऊ शकता.

हे देखील वाचा: राशिभविष्य आजचं 3 जुलै: मेष, वृषभ राशीसह 7 राशींची आर्थिक बाजू राहील मजबूत, जाणून घ्या आजच्या राशीतील तुमचे भविष्य

अदृश्य दिवस देखील मानसिक आरोग्य समस्यांची एक पावती आहे. सेलिब्रेशन्स हे समजतात की आपण सतत काम आणि कुटुंबाशी जोडलेलो असतो अशा जगात प्रत्येक वेळी निराश होणे ठीक आहे, हायपरकनेक्टिव्हिटी देखील आपल्याला एकाकीपणाची जाणीव करून देते. जेव्हा त्यांना सतत इतरांच्या संपर्कात राहण्याची आवश्यकता असते तेव्हा लोकांना देखील चिंता वाटते. अदृश्य दिवस हे तुमच्या शेड्यूलमधून वेळ काढण्यासाठी आणि थोडा वेळ एकटे घालण्यासाठी प्रोत्साहन आहे. जेव्हा आपण ‘अदृश्य’ ऐकतो तेव्हा आपल्याला कळते की मानव प्रत्यक्षात अदृश्य होऊ शकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !