पालेभाज्या

पालेभाज्या आणि फळभाज्या

आता पावसाळा आहे. ऋतुमानातील बदलानुसार आहारात बदल करणं आवश्यक आहे हे अनादी अनंत काळापासून सत्य आहे. उन्हाळा सारून पावसाळा सुरू असल्याने खायचं काय? असा प्रश्न काहींना पडला आहे. कारण सध्या हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध असतात. महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्यात आपल्याला गरम, चमचमीत खायला आवडते. मात्र अशा बदललेल्या वातावरणात काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.

हवेतील दमटपणामुळे आणि पाण्यातील अशुद्धतेमुळे बरेच संसर्गजन्य आजार पसरतात. त्यामुळे कोणताही पदार्थ खाताना विशेष काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात महत्वाचं असतं ते पाण्यामुळे होणारे आजार न होऊ देणं. उन्हाळ्याच्या दिवसात आपली पचनशक्ती थोडी संथ होते आणि त्यामुळेदेखील रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते.

पावसाळ्यात प्रथिनांचं प्रमाण मोजकं ठेवावं लागतं. पावसाळ्यातील भाज्या कोणत्या खाव्यात हा प्रश्न पडणं साहजिक आहे. पावसाळ्यात शक्यतो काकडी, मुळा, भेंडी, तोंडली, गाजर, बीट यांचे आहारातील प्रमाण वाढवावे. पालेभाज्या चोखंदळ निवडाव्यात. शक्यतो कांद्याची पात, फ्लॉवर, कोबी यासारख्या भाज्या कमी खाव्यात. यातील पाण्याचे प्रमाण संसर्गजन्य रोगांचे प्रमाण सोबत घेऊन येतं. त्यामुळे या भाज्या न खाणे उत्तम.

आणखी एक पावसाळा आणि मक्याचे कणीस, भजी यांचे वेगळे नाते जनमानसात रुजलेले आहे. एखाद्या दिवशी तळलेल्या पदार्थांचा बेत असेल तर मुळात प्रमाणात खाणं आणि पुढच्या जेवणात भाज्यांचं सूप किंवा भरपूर भाजी असणारा आहार घेणं महत्वाचं आहे. पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हळदीचे दूध पिणे उत्तमच. असे असले तरी विशेषकरून पालेभाज्या अन् फळभाज्या खाताना काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत कोणत्या भाज्या खाणे आरोग्यासाठी अपायकारक असते हे जाणून घेऊ.

पालेभाज्या

पालेभाज्या पाहून घ्या

■ पावसाळ्यातील ओलाव्यामुळे हिरव्या पालेभाज्यांमध्ये जंतू वाढण्याचा धोका असतो. सामान्य दिवसांमध्ये, हे जंतू कडक सूर्यप्रकाशात मरतात किंवा निष्क्रिय होतात. परंतु, पावसाळ्यात ते अधिक सक्रिय असतात.

■ वांगी : पावसाळ्याच्या दिवसांत वांग्यामध्ये किडे होण्याची शक्यता असल्याने या काळात वांगी खाणे टाळावे. या काळात वांगी खाल्ल्याने खाज सुटणे, त्वचेवर चट्टे उठणे, पोटातील संसर्ग अशाप्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.

■ फ्लॉवर : पावसाळ्यात कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, ब्रसेल्स स्प्राउट यांसारख्या भाज्या खाणेसुद्धा टाळायला हवे. जास्त दमटपणामुळे विषाणू झपाट्याने वाढतात. तसेच भाज्यांची स्वच्छता नीट केली जात नाही. त्यामुळे त्या दूषित होतात.

■ कच्च्या भाज्या खाणे टाळा: पावसाळ्यात कच्च्या भाज्यांऐवजी वाफवलेल्या किंवा उकडलेल्या भाज्या खाणे फायदेशीर ठरेल; कारण कच्च्या भाज्यांमध्ये बॅक्टेरिया आणि विषाणू असतात. ज्यामुळे पोटाची समस्या होऊ शकते.

■ मशरूम : ओलसर जमिनीत वाढतात आणि त्यात बॅक्टेरियाची वाढ होऊ शकते. ज्यामुळे एकदा खाल्ल्यानंतर संसर्गाचा धोका वाढतो, विशेषतः पावसाळ्यात. त्यामुळे पावसाळ्यात मशरूमला नाही म्हणलेलेच बरे.

भाज्या

■ टोमॅटो : टोमॅटो खाताना काळजी घेणे गरजेचे आहे; कारण हवेतील जास्त आर्द्रतेमुळे टोमॅटोला लवकर बुरशी लागते. बुरशीजन्य संसर्गाचा धोकाही जास्त असतो. त्याच्या सेवनाने कफ दोष वाढू शकतो. त्यामुळे जर टोमॅटो खायचेच झाले तर टोमॅटो चांगले धुऊन खावेत. शक्य असेल तर कीटकनाशकांचा प्रभाव दूर ठेवण्यासाठी ऑरगॅनिक पद्धतीने पिकवलेल्या टोमॅटोचा वापर करावा.

पावसाळा आणि आजार यासंबंधी विचारले जाणारे प्रश्न

१. पावसाळ्यात संसर्गजन्य आजार कशामुळे पसरतात?
२. पावसाळ्यात कशा-कशाचं एक वेगळं नातं जनमानसात रुजलेलं आहे?
३. हवेतील जास्त आर्द्रतेमुळे कोणत्या फळभाजीला लवकर बुरशी लागते?
४. पावसाळ्यात कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, ब्रसेल्स स्प्राउट यांसारख्या भाज्या खाणेसुद्धा टाळायला हवे का?
५. पावसाळ्यात कच्च्या भाज्यांऐवजी कशा पद्धतीने भाज्या खाणे फायदेशीर ठरेल?
६. कशामध्ये बॅक्टेरिया आणि विषाणू असतात, ज्यामुळे पोटाची समस्या होऊ शकते?
७. पावसाळ्यात वांगी खाल्ल्याने कोणकोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात?
८. पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी काय पिणे उत्तमच?

हे देखील वाचा: Shocking! महाजन आयोगावरील धडा कर्नाटकातील 7 वीच्या अभ्यासक्रमात; कर्नाटक सरकारकडून दिली चुकीची माहिती: जत, अक्कलकोट म्हैसूर राज्याला जोडण्याचा दिला होता अहवाल  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !