सोन्याळ विठुराया देवस्थान

सोन्याळ विठुराया देवस्थानच्या ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र मान्यतेसाठी महत्त्वपूर्ण सहकार्य केलेल्या उमदी पोलीस स्टेशन व एपीआय संदीप कांबळे यांचा समितीतर्फे सत्कार करण्यात आला.

जत,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी)
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ग्रामीण यात्रास्थळ विकास योजने अंतर्गत जत तालुक्यातील सोन्याळ विठुराया देवस्थानला मिळालेल्या ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राच्या दर्जा प्राप्ती प्रसंगी महत्त्वपूर्ण सहकार्य केलेल्या उमदी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे आणि त्यांच्या पथकाचा देवस्थान समितीतर्फे गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.

देवस्थानाच्या उन्नती प्रक्रियेदरम्यान उमदी पोलिसांनी केलेल्या कायदेशीर मार्गदर्शन, सुरक्षा व्यवस्थापन आणि प्रशासकीय प्रक्रियेतील सक्रिय सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देवस्थान समितीतर्फे उमदी पोलीस स्टेशनला १० खुर्च्यांचा सप्रेम भेट संच देण्यात आला. या उपक्रमामुळे प्रशासन आणि धार्मिक संस्थांमधील समन्वय आणि सहकार्याचे मूल्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

सोन्याळ विठुराया देवस्थान

सत्कार कार्यक्रमात देवस्थान चेअरमन शिवानंद पुजारी, सोमनिंग बसवंत पुजारी, पांडुरंग पुजारी, सोमेश पांढरे, कलमेश पुजारी, हुनूरसिद्ध पुजारी, विठ्ठल हणमंत पुजारी यांच्यासह देवस्थान समितीतील मान्यवर उपस्थित होते. तसेच माजी पंचायत समिती सदस्य सोमन्ना हाक्के, माजी उपसरपंच चिदानंद तेली, उटगीचे आमसिद्ध पांढरे शेठ, माजी उपसरपंच सिदाप्पा पुजारी, माजी ग्रामपंचायत सदस्य संगप्पा पुजारी, नंदेप्पा पुजारी आदी मान्यवरांनी उपस्थित राहून उमदी पोलिसांचे अभिनंदन केले.

देवस्थान कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की,
“उमदी पोलिसांच्या सहकार्यामुळे देवस्थानाच्या ‘ब’ वर्ग मान्यतेची प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि सुकर झाली. धार्मिक यात्रांचे व्यवस्थापन, कायदेशीर प्रक्रिया आणि सुरक्षा या सर्व क्षेत्रांमध्ये पोलिसांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.”

सोन्याळ विठुराया देवस्थान

कार्यक्रमादरम्यान बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे म्हणाले की —
“धार्मिक स्थळांचे संरक्षण, शिस्तबद्ध व्यवस्था आणि गावोगाव आयोजित यात्रांचे सुरळीत आयोजन करण्यासाठी पोलीस विभाग सदैव तत्पर राहील.”
त्यांनी देवस्थान समिती आणि ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानले.

सत्कार कार्यक्रमाला उमदी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच सोन्याळ गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिसांच्या कार्यशैलीबद्दल समाधान आणि प्रशंसेचे सूर ऐकायला मिळाले.

सोन्याळ विठुराया देवस्थान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed