सांगली LCB ची धडाकेबाज कारवाई

🚨 धुळगाव येथे झालेल्या खून प्रकरणाचा सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने फक्त 4 तासांत उलगडा करत चार आरोपींना अटक केली. वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि पोलिस पथकाच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे हत्या प्रकरणातील सर्व आरोपी गजाआड.

सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):

तासगाव तालुक्यातील धुळगाव येथे २६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी झालेल्या धक्कादायक खून प्रकरणाचा सांगली जिल्हा पोलिसांनी केवळ ४ तासांमध्ये छडा लावत चारही आरोपींना ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (L.C.B.) धडाकेबाज कारवाईचे संपूर्ण जिल्हाभरात कौतुक होत आहे.

धुळगाव खून प्रकरणाचा 4 तासांत उलगडा


🔴 घटनेचा तपशील

२६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास धुळगाव–सांबरवाडी रोडवरील घोलाचा ओढा भागात काही अनोळखी व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून राजीव गौतम खांडे (वय ३८) यांची निर्घृण हत्या केली. हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.

तासगाव पोलिसांनी गुन्हा क्र. ५५०/२०२५, BNS कलम १०३(१), ३(५) नुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.


👮 वरिष्ठांची तत्परता, पथकाची रणनीती

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन
🔹 पोलीस अधीक्षक —  संदीप घुगे
🔹 अपर पोलीस अधीक्षक — श्रीमती कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली
🔹 उपविभागीय अधिकारी — अशोक भवड
🔹 तासगाव पोलीस निरीक्षक — संग्राम शेवाळे
🔹 स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक — सतीश शिंदे
या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले.

याला प्रतिसाद देत सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.

सांगली LCB ची धडाकेबाज कारवाई


🔍 गुप्त माहितीला पुष्टी – आरोपींची शिताफीने धरपकड

पथकातील पोहेकॉ सागर लवटे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हत्या करणारे चार आरोपी सिद्धेवाडी खण येथील नागपूर–रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाखाली लपून बसले आहेत.

पथकाने तातडीने निगराणी ठेवत चारही संशयितांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले.

हेदेखील वाचा: 2025: सांगली जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी शिगेला; आरोप–प्रत्यारोपांचा भडिमार, नेत्यांची प्रतिष्ठेची लढत कोण जिंकणार?


👤 आरोपींची नावे

  1. आनंद उर्फ विनोद लोखंडे (वय १९) — सोनी, मिरज
  2. आयुष परशुराम कांबळे (वय २२) — जांभळी, शिरोळ / सध्या धुळगाव
  3. गिरीश उर्फ मारी गुंडाराज चंदनशिवे (वय १९) — सोनी, मिरज
  4. विशाल माणिक धेंडे (वय २७) — धुळगाव, तासगाव

💥 खुनामागील कारण उघड

कौशल्यपूर्ण चौकशीनंतर आरोपी विशाल धेंडेने कबुली दिली की —
मृत राजीव खांडे यांच्यासोबत मागील वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादाचा राग मनात धरून चारही आरोपींनी मिळून खून केल्याचे सांगितले.

याप्रकरणी आरोपींना २७ नोव्हेंबर २०२५ रोजी अटक करण्यात आली असून पुढील तपास तासगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.

सांगली LCB ची धडाकेबाज कारवाई


🏆 पोलिसांच्या पथकाचे नाविन्यपूर्ण कामगिरीबद्दल कौतुक

फक्त ४ तासांत खुनाचा उलगडा करून आरोपींना ताब्यात घेणे ही सांगली पोलिसांची कौतुकास्पद आणि जनतेत विश्वास निर्माण करणारी कामगिरी ठरली आहे. गुन्हेगार आणि अंमली पदार्थांच्या विरोधातील पोलिसांचे मोहिमेप्रमाणेच, सांगली जिल्हा पोलिसांचा तपासाचा वेगही पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *